Sunday, 16 October 2016

Random Writings

Freedom Writer's Mood  - make a new way writing !

This is 30th post ... i know many wait to read every week ...Thats very happy thing for ...Thank you for  support and live . Though words are mine you are one who give them a meaning by reading . Happy reading ... Thank you !


घर ये अजीब  है।


सीमेंट के जंगल में 
ऊँचे किसी पेड़ पे 
घर ये अजीब  है।  
बच्चे जैसे तितलियाँ 
और बाप जैसे गिद्ध है।  
बूढ़े जैसे खूसट कौए 
और माँ रानी मधुमक्खी है।  
सीमेंट के जंगल में
ऊँचे किसी पेड़ पे 
घर ये अजीब है। 

----------------------------------

            Small Story 

             Save Trees 

School bell rang and ...“ you have two days of holidays ... but while coming on monday you have to bring a project on ‘Saving Trees' ... you are free to express your talent ... dont be afraid to ask me any doubts ” teacher while gathering his teaching stuff ... she announced ... for which every student yelled negatively ...

“guyz ... no yelling ... you all have too ... and you really have to ! " she said and left class for her next lecture to other room . 

On monday ... all students got ... bunches of project paper ... with pretty fine attractive and informative things in and on it ... except on boy ! 
Teacher cought that boy and asked “Dint you get your project boy ”while getting her spectacles behind towards eyes which rolled towards tip of nose . 
“ i got it mam ... just you have to come with me ... ” a second grade student with a great confidence ... hold her hand and took her to the school garden and showed watered plants and trees , also , a small hand painted  “Save trees” on them . 
Teacher seemed happy and amazed  ! 
“who helped you ?” she asked him . 
tiny rosy lips said “ no one ” 
“but why like this ?” she asked to him in curiosity . 
Rising his eyes and eyebrows and clearing his throat he answered “ writing save trees on papers might have killed many many trees uptill now ... aaaaa .... so ”
Teacher smiled and gave A+ to his love and sharpness about nature ! 


----------------------------------------------------------------------------------

Writers life SOMETIMES 

There was a little life left in a soldier
after getting attacked by swords . 

just like , 
there was still some ink for words 
in a pen , who is in a pain . 

-------------------------------------------------------------------------------------
TemporaryNess Nowadays 


Boy - Hi
Girl - What ? 
          i am in middle of 
Boy - ?
           ? 
            ? 
             Cooking ??? 
              but you cant cook i know 
           ?????????
          Driving ? 
         ( calls her )
         pick up call 
         Danger ?????
         i know you are alone tonight 
         i am getting worried yaar 
         are you in middle of danger ? 
         please reply 
         REPLY 
         ( calls again ) 
         ( calls again )
         ( calls again )
          I am coming to see you now ! 
        ( About to call again )

Girl - Sleep 
          i am in middle of sleep 

Boy -  (Drastically) ok 
           lets sleep together ...i am                
           about to leave 
Girl   - k f9 Bye 

Boy  - Love you lots 

Girl -  Hmm 

Boy - you dont love me ? 

Girl - i will sleep again ha ! 

Boy - no no coming wait  dont sleep !

-------------------------------------------------------------------------------------

Wierd 

-Hi
  Hi 
  Hi 
i want to talk to you
-about what ? 
- Sex ! 
- what about that ? 
- Fuck off ! 
   Thats it . 

-------------------------------------------------------------------------------------

Looking at school now a days is like ...

I completed my school fortunately , but i still imagine that a cricket bat and ball , a painting brush , a sthetoscope , a tool , a pen , a book , a camera ,a aeroplane , a ship , a gun , a sheff cap , some expensive cloths and many other are seating in a classroom on benches and a teacher ... a teacher for forever teaching them ... a useless Alzebra ! 









Monday, 10 October 2016

Weekend

Freedom Writers Mood  - Exploring Mankind .


दगडात देव शोधणारे त्यांचं कुळच वेगळं , पण ह्या ब्रह्माण्डाच्या गदारोळात स्वतःला शोधून , शाबूत करून , स्थिरावुन ... शांत झालेले , त्यांचा एकच कुळ म्हणजे ‘व्याकुळ’ .  
काहीतरी बोलावं , काहीतरी करावं , काहीतरी लिहावं , काहीतरी वाचावं ... काहीच नाही करता आलं तरी ते व्याकुळ ... पण ... सगळं करून देखील २ वेळच्या भाकरीची भ्रांत असणारे पण शेवटी व्याकुळच !


सिरियल्स चालू असताना मध्ये मध्ये कसे ब्रेक असतात ना , तसे आपण पण आपल्या संसारात ब्रेक घेयला हवे . saturday आणि sunday ला कधी कधी आपण कसे नाव माहित नसलेला सिनेमा पाहत बसतो तसच सुट्टीच्या दिवशी कधी कधी नाव माहित नसलेल्या गावाला जाऊन स्वतःला विसरून स्वतःला नव्याने शोधायला गरजेचं असतं . 

एकटच कुठेतरी जाऊन मस्त भटकावं .  रोजची सवयी ची सिगरेट सोडून , हफाफता श्वास घेत , मिळेल त्याने कश आत बाहेर सोडत , शांततेच्या सुरांचा नवाच राग ऐकुन आपले कान आिण डोकं  बधिर करावं ... आईला !!!!! एका जुन्या मुरब्बी लेखकाच्या कादंबरी मध्ये शहरातुन खेडेगावात आलेल्या माणसाला जे जे जाणवावं ... तसं  काही तरी जाणवायला हवं  . 

दुपारच्या वेळी मोठ-मोठ्याल्या गवत पांघरलेल्या शांत काळ्या नांगरलेल्या जमिनीवर पाठ टेकवून वर दिसणारे ढगां मध्ये एखादं चित्र शोधावं , चेहेरा शोधावा , स्वतःला हरवून द्यावं ... अगदी पुस्तक वाचताना होता तसं . पण ,
कादंबर्यां मधले विचार , व्यक्तिचित्र , ठिकाणं . भेंचोद !  सगळे मला त्या ढगां कडे पाहताना दिसणाऱ्या आकृत्यां सारखे वाटतात . म्हणजे जरा वेळ पाहावं तर बेडूक , जरा वेळाने विदूषक , जरा वेळाने अजून काही अजून काही आणि अजून काही . तसच च्यायला ! म्हणजे लेखकाला जे लिहिलेलं असतं ते असुदे ! पण सगळं भेन्चोद वाचनाऱ्यावर अवलंबून असतं . 
दिसतंय वेगळं , समजतय वेगळं , आहे ते अजून वेगळं . म्हणजे ह्या शब्दांची आणि निसर्गाची दुनियाच फसवी म्हणायची . थोडक्यात सांगायचं तर ... कधी कधी त्या धावणाऱ्या ढगाला वाचावं लागतं  आणि पुस्तकातल्या किंवा कादंबरीतल्या कागदला चिकटलेल्या लहान लहान अक्षरां मधे चित्र दिसत आसतं . 

ह्या दुनियेत रोजच्या रोज किती येतात किती जातात  ? 
आणि च्यायला आपण मारायचं तर फक्त वेळेच्या आत मस्टर वर सही करण्यासाठी , आणि रुबाब असा की  भेन्चोद आपल्यापासून अडणार आहे . 
एवढं लक्ष्यात ठेवा आपल्या वाचून आपलच अडतं !

साला झंड  जिंदगी ! ती पण आपण जगतोय कोणासाठी ? संसारासाठी ? सिरियल्स पाहण्यासाठी ? ह्या तुसड्या समाजासाठी ? स्वप्नांसाठी की कडू सत्यासाठी ? 
आनंदात असताना ज्या व्यक्तीची , गोष्टीची आठवण येत नाही , ती दुय्यम ! दुःखात ज्याची उणीव भासते ती सर्वश्रेस्ट ! मग प्रथम जागा कोणाला ? आपल्यालाच आपणच प्रथम ! 

आअह्ह्ह्हह्ह  !
हाताला लाल मुंगी चावली आणि तो दचकून तंद्रीतला पूर्ण जागा झाला ! 
मोबाईल silent चा रिंगर वर केला !  SUNDAY 5:20 PM 
पांढऱ्या कपड्यांना चिकटलेली काळी माती झटकून ...जवळ च्या बाटलीतल्या उरलेल्या पाण्याने पाणी पिउन थोडा चेहेऱ्यावर मारून ...  गोरा ढोरांना बघत ...   गाडीच्या जवळ जात बिडी पेटवत ... गावच्या म्हाताऱ्या मंडळींना हाथ करून ... हे जन्मापासून म्हातारेच तर नसतील ना ? असा विचार करून झुर्क्या सरशी सोडत . 

स्वतःशीच बोलत ... 
चला घरी जायची वेळ झाली ... घरी जायला अजून 2 तास लागतील ... आईला औषध ,बायकोला मासे 
,पोरांना गोड-धोड ... निघण्या आधी गाडीची काच पुसून घेतो ... मस्त सावकाश घरी पोहचायचं आजुन दोन पेग ढकलायचे ... मिळेल ते गरम गरम खायचं अ्न झोपायचं ...  मस्त जागा आहे यार ...   मस्त मजा आ गया ... ! चला उद्या सोमवार ... 


P.S. -  Happy Reading . 

Saturday, 8 October 2016

वाट - The wait

वाट - The wait 

Freedom Writer's Mood -  Exploring world of words . (Random Writing)


सिमेंट च्या जंगलात एवढी झाडं झाली आहेत की सगळ्याला एक कीड लागल्या प्रमाणे वाट लागली आहे . 

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘वाट' हि पहावी तरी लागते नाहीतर लागलेली तरी असते . फक्त आपली ‘वाट’ लागण्याची वाट काही पहावी लागत नाही . 
काहीतरी करत असणाऱ्याला वाट पाहायला लागणं किंवा त्याची वाट लागणं ते चांगलं वाटत  नाही , पण जो काही करतच नाही त्याला कसली घाई असते काही कळत नाही ! 

ताटकळत बसणं फक्त माणसाच्या जन्माला आलय असं काही नाही , त्या समुद्राच्या लाटा देखील कोणाची वाट पाहत किनाऱ्यावर येर झाऱ्या घालत असतील कोणासठाऊक ?

पांढरे बर्फाळ डोंगर , हिरव्या झाडांच्या गालिच्या खाली शांत पहुडलेले डोंगर , मधेच त्यांना भेग पडावी तश्या दऱ्या ...त्यातून कोसळणारा धबधबा ... काय माहीत वाट बनवत कोणाला भेटायला चालला असेल . 

लहान बाळ शाळेतून आल्यावर त्याला बाईंनी काय शिकवलं हे त्याच्या आईला सांगायला जसा आसूसलेलं आसतं ... तसच हज्जारो ,लाखो झाडं  त्यांचं बालपण कसं होतं , ... ऐन बालपणी ... लहान छोकरे त्या वर चढून फळ तोडून खायची गोष्ट , तारुण्यात प्रेमी युगुलांनी त्यांच्या सावलीत केलेलं प्रेम ... पण माळीबुवांनी ,मालकांनी मला वाढवलं पण फळं मात्र दुसरेच खाऊन जातात ... आपल्या आजोबां च्या बोलण्यात येणार ‘त्या काळात’ ल्या प्रकारातल्या कितीतरी हकीकती सांगायला जंगलं ची जंगलं वाट पाहत आहेत . 

जगातली प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे . कारण ती पूर्णत्वाची वाट पाहत आहे  . आपला एक हि दिवस दुसऱ्याच्या संपर्कात ना येता पूर्णत्वाला गाठु शकत नाही , त्यामुळे प्रत्येक जण ,प्रत्येक गोष्ट गरजु आहे . गरज असल्या मुळे त्याला किंमत आहे ... किमती मुळे स्पर्धा आहे ... स्पर्धे मधे संधी आहे ...संधी मिळायला वाट पाहावी लागतेच ... कारण संधी म्हणजे वाट आहे ... स्वताला पूर्णत्वा कडे येण्याची . 

घडाळ्यात रुतलेल्या मुळांचं जबाबदाऱ्यांच्या बेडीं सोबत वाढणं  , घड्याळाच्या टिक टिक वर होणाऱ्या हालचाली , तहान, भूक ... सगळं काही ! दुसऱ्यासाठी थांबवा लागणारच ... पण 
स्वतःला स्वतःची वाट पाहायची वेळ देऊ नका ... स्वतःला ताटकळत ठेवायची वेळ येऊ देऊ नका . 

मी म्हणतो दुसऱ्याची  ‘ वाट ’ पाहत बसणं सोप्पं ... दुसऱ्याला ताटकळत ठेवणं अजून सोप्पं ... पण स्वतःच्या आयुष्याला ‘ ताटकळत ठेवुन वाटेला ’ लागू पर्यंत वाट पाहत बसणं फार वाट लावुन जातं  . 

कोणाची वाट पाहताना वाट लावून घेऊ नका ... मग ती वाट साध्या फालतु फडतूस माणसाकडून सही होण्यासाठी असो किंवा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी संधी असो ...कोणाची वाट पाहताना स्वताला शोधायचं , स्वतःशी बोलायचं , स्वतःला आवडतं ते करायचं . कारण आपल्या साठी ह्या जगातली सर्वात महत्वाची व्यक्ती असतो ती म्हणजे आपणच . 


नैसर्गिक जंगलं काय आणि सिमेंट चे जंगलं काय ... दोघं एकमेकांत वाट करू पाहत आहेत ... समतोल राहिला तर ... पूर्णत्व मिळू शकेल ... नाहीतर वाट लागेल ... तो पर्यंत आपण आपल्या शरीर पुरतं नाही तर मनापुरतं तरी पूर्ण होऊयात  !

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...