गर्दी हा अजबच कारभार आहे ... अनेकांतुन बनणारी ही गर्दी ‘एक’आहे जी red light भागातून संथ जाते पण red सिग्नल होताच झुंबड उडाल्या सारखी करते आणि रस्त्यात कोणाचा अपघात झाला असेल तर खूप घाईत असल्याचे भासवून तिथून पळ काढते नाहीतर “ आपण काय करणार ना ” म्हणून हतबल झाल्यासारखी बघत बसते ! ही गर्दी चालता चालता आपले मुखवटे बदलत राहते !
गर्दीचा वेग अनेकांना मोठ्या शहरां कडे आकर्षित करतो पण हीच गर्दी ट्रॅफिक मध्ये अडकून बसल्यावर नको नकोशी होते आणि ह्याच मोठ्या शहरांना बदनाम देखील करते ! “कुठून येते हि गर्दी ?” हा प्रश्न तुम्हाला आला असेलच तर त्याचे उत्तर ... “ तुम्ही स्वतः जिथून आलात तिथूनच तुम्ही गर्दीचा भाग झालाय ” असा आहे !
आपल्या “चांगल्या” गाडीला पार्किंग न मिळणं म्हणजे आजकाल आपल्याला राहायला जागा नसण्या पेक्षा मोठा झाला आहे . पण असं खरंच आहे का ? गर्दी फक्त गाड्यांची , लोकांची एवढीच आहे का तुमच्या आयुष्यात ? नको असलेला व्यक्ती , नको असलेला मनातला विचार तुम्हाला तुमच्या वयक्तिक स्तरावर घालवता येत नाही !(?)... तर हि शहरातली गर्दी कुठे ... नेऊन ठेवणार ?
मुळात म्हणजे तुम्हाला गर्दीचा त्रास होतो कि कंटाळा येतो ... हेच तुमच्या लक्ष्यात येत नाही ! म्हणजे कसं , आईच्या हातचं खाताना आयुष्य भर खायला कंटाळा येत नाही ... कारण त्यात त्रास काहीच नसतो , पण खानावळीत जाऊन फळ्यावर असलेला मेनू वाचला की , तोच त्या भाजीची चव जिभेवर येऊन रेंगाळते आणि जेवताना देखील ती भाजी अस्सल तशीच लागते याचा त्रास होतो आणि कंटाळा येतो ! कधी कधी समोरच्या व्यक्ती आपल्याला काय बोलेल याचा अंदाज येतो ... आणि जेव्हा अंदाज खरे ठरू लागतात तेव्हा ... तुम्हाला आता बदल हवा आहे हे समजून घायची वेळ आलेली आहे हे समजून घ्या !
एकदा रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल वर शिस्तीत ( zebra crossing मागे ) थांबलेलो ... तर ... डाव्या बाजूला बुलेट होती ... त्याच्या मागे रिक्षा ... उजव्या बाजूला टम टम ... त्याच्या मागे बस आणि माझ्या मागे ट्रक ... हे सगळं ... मी माझे डोळे लाल चा हिरव्या होणाऱ्या सिग्नलची ... डोळे त्यावर रोवून वाट पाहताना ... समजू शकत होतो ! म्हणजे आता मला अन्दाज येऊ लागला होता , ह्या गर्दीचा सर्वात प्रथम कानांना त्रास होतो ... सुरुवात तिथून होते ... पण त्याच वेळी जरा हवा पालटाची गरज आहे तेव्हा हे कळून चुकलं !
हाच काय तो गर्दी पासून लांब जायचा पर्याय , पार्किंग ला जागा नाही तर मग रिक्षा किंवा बस ने प्रवास करा ... नको असलेली व्यक्ती सारखी समोर येत असेल तर तिला दूर करा , मनातले विचार नव्या विचारांना गर्दी ठरत असतील तर ते विसरून जाण्याचा प्रयत्न करा ... गर्दीचा त्रास किंवा कंटाळा येत असेल तर तुम्ही स्वतःला बदला ... आपल्या सवयी , वेळी , रस्ते , ठिकाण , काम , संगत ... बदलून तर पहा !
कुठेतरी स्तिर होण गरजेचं आहेच , म्हणून सारखं शहरं बदलत राहणं पटण्या सारखं नाही ... म्हणून सर्वात सोप्पं आपण आपली गर्दी बदलत ठेवावी !
मग ना त्याचा त्रास होईल ना कंटाळा येईल !