Saturday, 14 October 2017

दिवाळी डंक

दुसऱ्यांना समजून घेण्याचा मक्ता ... आपणच उचललाय असा गैरसमज ... सर्वांनाच असतो ! पण ज्या ज्या क्षणाला आपला अपमान ... आपली गैरसोय होत नाही  ... त्या क्षणाला कोणाचा ना कोणाचा प्रामाणिकी पणा , चांगुलपणा त्या क्षणा मागे लपून असतो ... म्हणजे उदारणार्थ ... आपण जेव्हा रस्त्याने जाताना खड्ड्यातून जातो ... तेव्हा नक्कीच कोणाचा तरी भ्रष्ट , बेईमान , कामचुकारपणा त्यात पोकळी निर्माण करून गेला असतो !

घर बांधताना ... गवंड्या कडून करून घेतलेली एखादी सोय ... पुढे ती वास्तू असे पर्यंत टिकते ... आणि आठवणीत तर त्याहून ज्यास्त ... पण त्या गावड्यांने उगाचच त्रास देयचा म्हणून आपण त्याला केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं तर ... पुढे कायमस्वरूपाची गैरसोय होऊन बसते ... त्यामुळे प्रत्येकाने प्रयेक क्षणी प्रामाणिक राहून ... जगण्याची सोय करत राहावी स्वतःची आणि इतरांची सुद्धा  ... गैरसोय मात्र कोणाचीच करू  नये  ! 

स्वप्नांच्या महालाला ... कष्टाचा , प्रामाणिकपणा चा पाया असणं गरजेचं आहे ... वीट , वीट रचून जशी भिंत बनते ... तसच ... क्षणो क्षणी ... आपली स्वप्न पूर्ण करण्या कडे कल असावा ... त्यात हृदयाची धक धक आणि स्वशाचे मिश्रण सिमेंट म्हणून वापरावे  ... काहींचे महाल बनतात ... काहींचे अर्धवटच राहतात ... काही फक्त आपल्या भवती कुंपण बनवून थांबतात ... काहींच्या महालाच्या भिंती पडतात  ... त्यामुळे आपल्याला इतरांची  मदत देखील लागते हे विसरू नये ... एकट्याकडून आपली स्वप्न तर काय ... साधं ... एक खोलीचं बांधकाम देखील पूर्ण होणार नाही ! 

आपण घरं स्वच्छ करतो ... तसच मन देखील स्वच्छ करायची सोय असायला हवी होती ... त्याला पर्याय एकच ... नवीन काहीतरी करावं ... नवीन कुठेतरी जावं ... नवीन लोकांना भेटावं ... आता हि दिवाळीच घ्या ... वर्षोनुवर्षे एकच आहे ... तरी ती बदलत चालली आहे म्हणून त्या विषयी चं नावीन्य टिकून आहे ... ' फराळ ' आधी फक्त दिवाळीच्या काळातच बनत असत ...पण आता मात्र कायम उपलबध होतो ... पण दिवाळी अंक मात्र फक्त दिवाळीलाच ' बनत ' असल्याने ... त्याविषयी कुतुहूल असतं ... 

दिवाळी अंकाबाबत तर तुमच्या आईला नाही ... चितळेंना नाही ... तितक्या लवकर ... दिवाळी अंक लिहीणार्या ... लेखकांना कामाला लागावं लागतं .... शेव पाडल्या सारखी कविता पडतात ... शंकर पाळ्या सारखे लेख तळतात ... काहीकाही उगाच लिहिताना तिखट मिठाचे शब्द वापरून ... चकली करायचा प्रयत्न करतात ... पण ती जमत नाही आणि मधेच तुटते ...  तरीही  ... ग'चकली म्हणून खपते ... याचे नवल वाटते . 

आता हे सगळं सांगायचं कारण कि ... प्रमाण वाढतंय पण दर्जा घसरतोय ... नातं , मैत्री , पटकन बनते , पण टिकत नाही ... 'संवाद' होण्या ऐवाजी वादच होतोय ... समोरच्याचं बोलणं टोचणं वाटतंय ... शब्द शस्त्र असतात म्हणून काय ... सर्वांना त्या शब्दात च पकडत राहायचं काय ? ज्यांना पकडून ... आत टाकावं ... त्यांच्या शब्दाला किंमत आहे ... आणि प्रामाणिक राहणाऱ्याला ... ना घरात ना दारात असलेला आकाश कंदील करून ठेवलय ... 

राजकारण्यांवर लिहिताना कलम साखरेच्या पाकात बुडवून लिहायचं आणि ***हो ... देशावर बोलताना , लिहिताना ... तुमच्या गावच्या ... तुम्हालाच आवडणाऱ्या मिसळीच्या तिखट तर्रीत शब्द बुडवून तुम्ही वापरता  ... हा कोणता न्याय ? हसताना तोंडावर रुमाल ठेवायचा आणि शिव्या मात्र भर चौकात उघड देयच्या ... हि कसली दिवाळी  ... सत्य झोंबायला लागलं कि ... फटाक्यांच्या आवाजाने ... घाबरून कोपऱ्यात बसणाऱ्या ... कुत्र्या प्रमाणे ... लपून  बसायचं  ... आणि निरव शांतता पसरली कि " संपलं का युद्ध ? " म्हणत छाती पुढे करायची ? हि कसली दिवाळी ... ? 

मुळात  दुसऱ्यांचीच (पाश्चात्त्यांची)  स्वप्न आपली म्हणून खपवायची ... पोट भरायचं आणि झोपायचं ... स्वतःची बघा कि स्वप्न ... त्याला सत्तेत उतरावा कि ... त्याच्या साठी भक्कम पाया रचा कि ...  प्रत्येक क्षण ... स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगतोय अशी दिवाळी प्रामाणिक , हसून खेळून , सर्वांना भेटून ... त्यांच्या हातचा बनवलॆला फराळ खाऊन ...  साजरी करा की किती दिवस त्या ... घराच्या दारासमोरच्या तुळशी सारखे आपल्या आपल्यातच रमणार आहात  ? 

दिवाळीच्या शुभेच्छा ! 





गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...