भारत देश विकासा कडे वाटचाल करत आहे यावर काहीच वाद नाही, पण विकास कुठेतरी हरवलाय या माझ्या अंदाजावर, 'स्क्रिनशॉट' एवढा भरवसा आहे. त्यामुळे भारत देश सैरवैर धावतच सुटलाय, शेतातून धावताना पीक नष्ट होईल की काटा पायात रुतेल, एखादा साप डसेल याची तमा देश बाळगत नाहीये, त्यामुळे सध्या च्या माध्यम (मिडिया) वर तर इतका भरवसा बसला आहे की मंगळावर पाणीच काय ? उसाचा रस देखील मिळतो. याविषयावर देखील मी रस घेऊन तास न तास दुरचित्रवाणी समोर बसून घालवतो .
प्रत्येक जण स्वताला विकासात शोधत आहे. जणू विकास हा आरसा सिन्द्रेल्ला च्या गोष्टी प्रमाणे आपल्याला सर्वात सुंदर ठरवणार आहे. असे अनेक 'जगात एक नंबर' ठरवणारे आरसे प्रेमात पडल्यावर फुटतात त्यामुळे स्वविकास आता गरज होऊन बसला आहे. असो. जिथे सगळे विकासच्या मागे लागले आहेत तिथे मी मात्र 'विनोद' शोधत आहे.
हो तोच विनोद ज्यातून हास्य उमलते. निखळ हास्य निर्माण होते. मन प्रसान्न होते. नाती जोडली जातात.
जिथे संवादच बाद होत चाललाय तिथे हास्य वैगरे गोष्टी स्क्रिन पुरत्याच उरल्या आहेत. Comments, reactions आणि फिल्टर्स या मुखवट्यां मागे किती दुख आहे ते कोणीच कोणाला दाखवत नाही आणि दाखवू ही नये, कारण त्याचाच खरा विनोद होतो, पण म्हणून विनोद , विनोदबुद्धी, मस्कर्या, चेष्टा, मिश्कील कोट्या, म्हणी, उखाणे, साहित्य आणि बरेच कितीतरी हसवणारे घटक नाहीशे होत चालले आहे असे मला वाटते .
माणसाचा बैल झालाय, घड्याळाच्या काट्याला तो उसाच्या रसाच्या लाकडी घाण्याला अडकवल्या सारखा झालाय, गोल-गोल, गोल-गोल फिरायचं आणि दिवसा काठी बेचव चोथा मिळवायचा यातून काय हास्य रस मिळवायचा तो देखील दुसर्यांना विकायचा. गुगल वर सापडणारे पु.लं. देशपांडे माझ्या आयुष्यात काही गंभीर समस्या आली की कोणाच्या तरी रूपाने त्यावर वाट्टेल तसे विनोद करून जातात. प्रेम करावं तर सगळे दादा कोंडके होऊन द्विअर्थी बोलत सुटतात. प्रेमभंग झाला तर व पु काळे बनून सलगी करून विषात देखील हास्य रस मिसळून जातात. द म मिरासदार होऊन दमा वाढवतात. काय म्हणजे कोणाची गरज नसताना एकेक जण दारावर येऊन थांबतो.
विनोद हा घरी मोठ्यांना सांगायची गोष्टच नाही, मुळात घरी काहीच सांगू नये अश्या मताचा मी आहे.
तरी आई साठी माझं जे वय लहान होतं ते वय माझ्या वडिलान साठी कमवत होतं, तस वडीलधारी मंडळींना अपत्यांचे कोणतेही वय हे आता कमवायला लागले पाहिजे हेच सूर लावणारे असतात, पण खरं तर आठवी मध्ये प्रेम करता करता शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे मी लागलेलो तेव्हा मी एक विनोद घरी सांगितलेला मला आठवतो, कारण मी तेवढा एकदाच असा घाट घातलेला आणि घात झाला. न्युक्लीयर पेक्षाही काही अवघड असेल तर ते आहे 'सगळं क्लियर करणे'. त्यांनी तेच केलं. माझं वय, शैक्षणिक पात्रता, आपण उघडे(open) वर्गातले, भवितव्य, त्यांची उरलेली नोकरी वैगरे वैगरे चा पाढा आठा ने गुंवून दाखवला. त्यामुळे आमच्यातला संवाद जो आटला त्याला यानंतर हास्य, विनोदाचा वैगरे पूर कधीच आला नाही.
ज्ञाय व्यवस्थेत ज्ञायादिश कमी असले तरी देशभरात ते तुडुंब भरले आहेत. एखाद्या विषयी क्षणभरात मत कोरण आणि आयुष्यभर ते पुसत बसणं, हा फाजील उद्योग अनेक गोंन केस लोक करतात. एखाद्याच्या गोष्टीवर स्वताच्या मताचं लेबल लावायचं आणि त्याला चुकीच ठरवणं, वाढले आहे . भरीत भर म्हणजे 'शुक . त्यांच्यावर काही लिहू नको किंवा बोलूही नको हा' अश्या भीतीदायक कोपरखळ्या अधून मधून नाही तिथे गुदगुल्या करून जातात.
केसांच्या ठेवणीवरून जिथे जात ठरवली जाऊ शकते तिथे एकमेकांवरील विनोद देखील दंगली घडवू शकतो आणि नैसर्गिक आपत्तीत ओढवणारे दुखः या देशवासियांना एकत्र आणत आहे, हा ही एक भारताविषयीचा गर्व विनोद म्हणावा ! प्रेम आणि विनोद दोन जीवांना आजकाल दूर लोटू शकतो तर वैर आणि भांडण एकमेकांना सामोरा समोर अणू शकतो हि एक गमतीदार गोष्ट आहे.
घरात येणारा वर्तमान पत्र रक्तात नाहिलेला असतो, रस्ता रोको मध्ये जळणाऱ्या टायरचा वास घेऊन येतो , जखमा , गरिबी . अत्याचार , तहान , भूक आणि बर्याच काही जड गोष्टी शब्द रूपाने या हलक्या कागदावर हा वर्तमान पत्र हमाला सारखा धरून असतो तेव्हा ' आपलं बरय बाबा ' असा हसरी षड्ज आपण मनात ते मथळे वाचून म्हणतो आणि कोपर्यातल्या एका व्यंगचित्र नजरेत येतं तेव्हा मात्र हसू येत नाही, कारण जसं गोडावर गोड खाल्लं की बेचव लागत असत तसाच स्वतावर एकदा हसून घेतलं की दुसर्या सार्या गोष्टी भकास वाटतात, पण साखरे वर साखर अपवाद हा .
आत्ताजर सावरकर असते , गांधी असते तर त्यांच्या सोबत सेल्फी काढायला धडपडणारेच जास्त असते.
स्वीकारणे, समजणे, समृद्ध होणे असे # tags मनाला पटत नाहीत. सोशियल मिडिया सोसली नाही म्हणून माणूस जगाशी जोडला गेला आणि आपल्याच माणसांशी दुरावला, वर मस्करी पेक्षा मत्सरी भावनाच वाढल्या. व्यवहार,संसार आणि मित्र परिवारात सोशियल मेडिया आली आणि खेळ खल्लास झाला असं अनेकांच मत आहे माझं नाही. पण तरीही मोबाईल च्या पद्यातून मनातले भाव ओळखता येत नाहीत तिथे चेहराच लागतो पण हा मोबाइल उजेड चहेर्यावर पडतो डोक्यात नाहीं. पाणावलेले डोळे, कडकडीत मिठी , कानठळ्या बसणार्या गप्पा , हास्य , निर्मळ मन आणि विनोद बुद्धी ... अमूल्य आहे .
दुसर्याचा अपमान करून व्यंग करून हशा पिकवणे हे दुर्बलांचे शस्त्र आहे, तर शाब्दिक कोटी, काव्य , शब्दफेक, अभिनय यातून निर्माण होणारा विनोद आता सापडतच नाही. कसाय, तिकीट लावून विनोदी नाटक पाहता येतं पण त्यातले विनोद कळायला अमूल्य विनोद बुद्धीच लागते तिथे श्रीमंतीचा पास दाखवून चालत नाही. भुताच्या सिनेमाला चित्रपटगृहात पाहण्यासारखा विनोदी आणि हसवणारा कार्यकम मी कुठेच पाहिला नाहीये, इथे मात्र घाबरव वाटत ते कुठे कोणाच्या बोलण्यावर हसू येईल यावर.
२०१८ च्या मानाने , गुगल, युट्युब, वर्तमानपत्र , मालिका आणि पुस्तक यातून विनोद शोधायचा प्रयत्न केलाय पण हवा तसा काही सापडला नाहीये. समाजात जाऊन लोकांसोबत गप्पा 'टाकणं' मला योग्य वाटत नाही, उगाच आपल्या एखाद्या विनोदाला त्यांनी खरच हसून दाद दिली तर नेमकं काय करायचं असत याचा मी विचार करत आहे. जिथे चेहऱ्यावर फुग्या सारखं गांभीर्य फुगत चाललेलं असत तिथे हास्यची सुई टोचल्यावर रागाचा लावा येईल की हास्याचे कारंजे वाहतील हे खरच मला लेखकाला कळत नाही.
बिनचूक, वक्तशीर, कामाशी काम होत चाललेल्या मानवाला यंत्र व्हायचं असेल तर दगडाच्या काळजा ऐवजी स्टील किंवा अल्युमिनियमच काळीज लावावं पण अशे मानव देखील केळ्याच्या साली वरून घसरून पडल्यावर माझ्या सारखा तरी दिलखुलास हसेल , त्याला मदत करेल , त्याची विचारपूस करेल.
मला तरी विनोद , विनोद बुद्धी किंवा तत्सम काही सापडलं नाही, त्यामुळे मीच माझं मन प्रसन्न ठेवतो, हसत राहतो, स्वताच्या दुनियेत असं काही सापडत बसतो, दुसर्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो आणि शोध चालू ठेवत आहे.
टीप- विनोदी लेखन हा एक गंभीर विषय आहे.
नुकताच ७००० वाचकांचा पल्ला Freedom Writer या Blog ने ओलांडला. आपले धन्यावाद.
मराठी भाषा टिकवणं ही खरी तर अभिजात समस्या आहे. प्रत्येकाने तसा प्रयत्न, पाठपुरावा करावा. इतर सर्व भाषा सुंदर आहेतच कमी सुंदर अशी कोणतीच भाषा नसते, आपल्याला बोलायला, लिहायला आणि ऐकायला जी आवडते ती अभिजात होते.
Happy Reading
Like, comment, share and Enjoy life .