Saturday, 18 June 2016

संधान Valley

संधान Valley

नेहा चा कॉल आला की काही तरी थ्रिल नक्कीच असतं “  आज रात्री ११ वाजता सनधान valley ला आपण जातोय ” ती बोलली “ चालेल मे तयार राहतो ”असं सांगुन ते थ्रिल मी स्वीकारलं . 

   ११ चे साडे अकरा झाले ... आणि १७ सीटर  निघाली ... त्यातले ५ जण माझ्या ओळखीचे होते ... पण साडे बारा वाजेपर्यंत सगळे १७ लोकं ओळखीचे झाले ! त्यात १४ जण म्हणजे आम्ही संदान ला चाललो होतो ,२ जण आमचे मार्गदर्शक होते आणि एक वाहन चालक होता . 

रोहित च रोह्या , अपूर्वा च अप्प्या , धनराज च धुव्वा सिंग ... अश्या प्रकारे सर्वांचं पुन्हा बारसं झालं ! रोहन लाड यांचा वाढदिवस साजरा करण्या मध्ये गाडी पुण्यातून कोणत्या दिशेने बाहेर पडली आणि कोणत्या दिशेने चालली आहे  हे मला कळालं नाही ... ! 
गप्पा , गाणी ,गोष्टी च्या नादात पुण्यातून बरेच पुढे गेलो . रात्री चा प्रवास ... छान प्रवास . ‘बोटा’ नामक गाव ह्या ब्रह्मांडात आहे ... हे रात्री ३ ला चहा पेयला गाडी थांबवल्यावर कळालं . 

तरुण थकतात पण स्वीकारत नाही ... दंगा करत करत पहाटे ५ ला मला झोप लागली आणि ६ ला जाग ही आली ... वाहनचालक मात्र गाडी सरावाने हाकत होता ... 

साडे सहा च्या सुमारास उजाडलं ... सारे तेव्हा जागे झाले ... तेव्हा निसर्गा च्या बराच जवळ पोहचल्याचं जाणवलं . साम्रद गावात शिरलो तेव्हा देहधर्म आठवला पण मोकळ्या वावरत कोणाची पोटं काही मोकळी झाली नाहीत ... त्यातून एकच हापसा असलेल्या गावात पाणी कमी वापरावं हे धोरण आम्ही अवलंबलं ! 

भारतीयांना त्यात तरुणांना त्यात माझ्या सोबत च्या वानर सेनेला कायम भूक लागते ... आणि ते काहीही , कधीही खाऊ शकतात ह्यात मला शंका नव्हती . गावातल्या एका घरातुन पोह्यांचा अस्वाद घेऊन ... ठीक सकाळी ७:३० ला आम्ही चालायला सुरुवात केली ... आम्हाला ‘ हारनेस ’ नामक सामग्री दिल्याने भरलेलं पोट आणि पाठी वर बरच ओझं होतं ... 

पठारावरून ... चारी बाजुने डोंगरांनी वेढलो होतो ... ज्यांच्या सहयोगाने म्हणजेच  Explorers च्या दोन तरुण मार्गदर्शकांनी त्यांची नावं सांगितली ... अलंग , मलंग आणि कुलंग  ही  त्या खट्याळ भावांची नावं होती ... 

सपाट जमिनीवरून कधी उताराला लागलो आणि मुंग्यांप्रमाणे भिंत आणि कपाटाच्या मधल्या फटीतुन म्हणजेच दरीत शिरलो हे कळालंच नाही . 

दगड दगड म्हणता ... निसर्गाने त्यांवर सुद्धा बरीच कलाकारी केलेली होती ... आकार , विकार , चेहेरे , नक्षी ची किमया त्यांवर करून वर्षोनुवर्षे तिथेच ठेवून कोणी कलाकार विसरून गेलेला असावा असं वाटलं ! संधान दरीत फक्त १२ ला दुपारी उन्हं येत ... त्याला येईला वेळ होता ... उतरून उतरून ही दमछाक झाली पण बराच अंतर पार झालेलं . थांबा असायचा की मागचे पुढे , पुढचे मागे ... अदलाबदल व्हायचे . छायाचित्रकार अजब असतात ... कधी कोणता फोटो काढतील म्हणुन मी कायम हसरा चेहेरा ठेवलेला ... 

पड- झडी चा शुभारंभ केला तो अप्पू ने आणि शेवट पर्यंत टिकवून ही ठेवला . तसं अपूर्वा दोन होत्या पण एक स्वतः रडायची आणि दुसरी सर्वांना रडवायची . स्वतः रडणारी खरंच खूप रडत रडत पुढे चालत होती ... पण जिद्द अश्रूंच्या वाटे कमी होऊ दिली नाही ... 

मागे वळून पाहिल्यावर बराच पुढे आलोय कळायचं ... आणि किती पुढे जायचंय माहीत नव्हतं ... रस्ता मात्र खडतर ...
अगदी आयुष्या प्रमाणे ! 

दोन्ही बाजुने डोंगर आणि समोर दरी आली आणि त्याच बरोबर आयुष्यात पहिल्यांदा रॅपलिंग करायचा योग्य आला ... ते पण तब्बल  ३ वेळा ... ७० फूट  २० फूट आणि ३० फूट  ह्या उंची वरून दोरी ,दगड आणि दम च्या सहाय्याने खाली येणं
मजेदार होतं ... तेव्हा मात्र माझी खरोखर फाटली ( पँट ) ... 

पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसताना , पाऊल खुणा नसताना , अंगातून निथळणारा घामा चा थेंब दगडावर पडताच पाऊलखुन म्हणून थोड्या वेळा साठी अस्तित्वात येयचा . पायथ्याला दुपारचं जेवण पोटात ढकलून , जरा आढवे झालो , आणि बरोबर ३ वाजता सुरुवात केली ती उभे डोंगर सर करायला . 

निसर्ग पाहुन ह्यात हरवून जावं वाटत होतं ... पण तो आनंद घेयला डोळे ... मार्गावरून हटवणं अवघड होतं ... अगदी आयुष्यातल्या ध्येया सारखं  ! 

उभी चढाई , लहान आणि चकवा देणारी पाऊल वाट ... त्यात काही हरवत होते , थकत होते , घसरत होते , पुढच्यांना आवाज देऊन थांबवत होते ... आमची वानरसेना एकत्र नव्हती मात्र एकाच डोंगरावर होती ! जवळचं पाणी संपलं आणि नैसर्गिक स्रोतातून पहिल्यांदा पाणी पेयची वेळ आली ... तेव्हा पाण्याचं महत्व कळालं !

पठारावर एक एक जण पोहोचत होता आणि आता नको नको सा  झालेला डोंगर आता सर्वांना नजरे आड जाताना हवा हवासा वाटत होता !  अलंग मलंग आणि कुलंग खट्याळपणे माझ्या कडे बघून हसत होते असं  वाटलं जणू ते बसल्या जागेवरून आमची मज्जा , भीती , फजिती पाहत होते . 

५:३० वाजता पुन्हा त्याच घरात चहा पयलो ... हाथ पाय तोंड धुतले तेही त्याच  हापश्यावर ... त्याला चिकटलेली गर्दी  मधमाश्यां प्रमाणे भासत होती ... त्याला गावकरी , आम्ही आणि अजून नवीन पर्यटक चिकटलेली आणि हापसा एक सुंदर मध देणारं फुल जाणवत होतं . 

‘हारनेस’ परत करुन ... गाडीत बसलो ... गाडी निघाली ... वारा लागला आणि ... घाम , थकवा उडून गेला , मग आम्ही एकमेकांची उडवायला लागलो ...


७:३० च्या सुमारास भंडारदारा  चा फलक दिसला ... आणि आमच्या पैके अनेकांच्या आयां चा फॉन येऊ लागला आणि माझ्या आई चा देखील आला आणि मला तिने  झाप झाप  झापलं ... कारण मी सगळं तिला हे नसांगता केलेलं ... पण नेहा कडे मोबाईल देताच तिने मला वाचवला ... त्या नंतर अनेक मित्रांचे कॉल आले ... मग गाडीत माझा चर्चेचा विषय झाला ! 

चंदनपूर ला थांबून जेवलो ... गाडीत त्यानंतर सगळे पोट भरलेलं असतानाही डुलक्या ‘खाऊ’लागले ! पण पुणे येऊ पर्यंत अश्विनी  , पहिली अपूर्वा , पूजा , ह्रीश्या आणि मी  भेसूर गाणी गाऊन सर्वांना हैराण करण्यात आणि वाहनचालकाला जागं ठेवण्यात दंग होतो ! 

पुण्यात पावसाने स्वागत केलं आणि पूर्ण प्रवासभर इतरां पेक्षा जरा शांत असलेली पूजा पुणे येण्या आधी खूप अस्वस्थ झाली . गाडीच्या काचेतून तिलाच कोण जाणे कुठून ... तिला भेटायला आलेला ओंकार दिसला आणि गाडी थांबताच तिने त्याच्या कडे  धाव घेतली आणि सांगायला नको , पण मध्य रात्री ,भर पावसात , मित्राची गाडी घेऊन आलेला ओंकार हा पूजा चा बॉयफ्रेंड आहे . त्यांना दोघांना एकमेकांना आलिंघण देताना पाहिलं तेव्हा आमच्यावर पाऊस होता पण ते एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजत होते ... ते पाहून प्रेम म्हणजे काय असतं ... ते कुठेतरी परत ह्या प्रवासाच्या शेवटच्या वळणावर ह्या दोघं कडे बघून कळत होतं . सर्वात शेवटी आलेल्या ओंकार ने खऱ्या अर्था ने प्रवासाचा एका फिल्म प्रमाणे Happy Ending केला .

“ काही राहिलं नाही ना ? ” असा उतरताना  विचारताच बरच काही राहून गेलेलं असतं  ... अगदी आयुष्यातल्या स्वप्नांप्रमाणे , तरी एकाचा मोबाइल राहिलाच कुठेतरी ... पण तो नवीन कोणता घेऊ ? ह्या विचारात हरवलेला ! 

मी सर्वांना मिस करणार हे नक्की होतं  तरी  स्वतःच्याच रूमवर पावसाच्या घामाने भिजत पोहोचलो ... संधान valley आठवत ... झोपेचे डोंगर चढू लागलो  ! 
चांगलाच आनुभव मिळाला ! 

Friday, 10 June 2016

Duster

 प्रिय बाबा , 

सा . न . वि . वि . 

            बाबा , मला शिक्षणाने जेवढ घडवायचं आणि बिघडवायचं होतं ते आता पुष्कळ झालं . माझं मन त्यात रमत नाही हे तुम्ही जाणून आहात . 
            मला तुमच्या बांधकाम क्षेत्रात काही आवड नाही , पण मला , विकत घेणाऱ्याच्या  खिश्यातून विकणाऱ्याच्या  खिश्यात पैसा कसा नेता येईल , यामधला पूल , म्हणजेच जाहिरात बनवायला/बांधायला  आवडतं . 
               मला जाहिरात क्षेत्रात जाऊ द्या ! मला खूप कला येतात … हे तुम्ही जाणून आहात , मला त्यांचा वापर करू द्या . प्लिज बाबा , माझी विनंतीचा  स्विकार करा ! 
आता तर आपण दोघं , काही फरकाने “बांधकाम” वालेच . मी मात्र जाहिरात मात्र ! 
कळवावे . 

तुमचाच ,
सुर्यकांत 

कार्यालयात आलेले हे स्वताच्या मुलाचे मोत्यासारखे दाणेदार आखीव रेखीव अक्षरातल्या पत्राला वाचून झाल्यावर लगेच मोबाईल वरून वसंतरावांनी सुर्याकांत ला बोलवून घेण्यासाठी कॉल केला … आणि फोन वाजल्या चा आवाज दारा अडून येऊ लागला … म्हणजे सुर्यकांत वसंतरावांनी पत्र वाचून होण्याचीच बाहेर येऊन , वाट पाहत होता . 
वसंतरावांच्या कॅबीन मध्ये येताना त्याने रीतसर “ अत्त येऊ का ?” विचारले ! 
“ घरातल्या घरात पत्र व्यवहार व्हावा असं  कधी वाटलेलं नाही ” वसंत रावांना पत्रा चा प्रकार आवडला नव्हता !
उजव्या खांद्यातला बॅडमिनतन रेकेट आणि डाव्या खांद्यावरून गिटार खाली ठेवून , डोळ्याचा गोगले माथ्यावर स्तीरावून , खुर्ची वर बसून , कुरळ्या केसांशी खेळू लागला आणि म्हणाला “ बाबा , दारावर सेल्सMAN आला की … तो काय विकतोय हे जाणून न घेता आपण कधी कधी दारही उघडत नाही … पण दारा खालून  pamplet ढकललेलं असलं की … त्याला वाकून उचलून कचऱ्यात टाकण्य आधी एक नजर त्यावर काय आहे ते तरी वाचतो ... म्हणून ! ”

वसंतरावांचा राग जरा नमला … “ युक्तिवाद आवडला … मला तुझ्या आयुष्यात आता अडथळा बनायचं नाही … तू , तुला हवा ते कर !"
“ thank you … मला माहिती असत तर हे मी आधीच केलं असतं .... आई ला पटवाल ? ”
खुषीत सुर्यकांत ने विचारले . 
“ तुझ्या आईला तर मी केव्हाच पटवले आहे … आमचा लग्न हि झालं आणि तू देखील आलास … तू आजपासून तुझं आयुष्य जगायला मोकळा आहेस !” वसंतराव शांत चित्ताने हसून म्हणाले . 
“ धन्यवाद बाबा ”  असा म्हणून सुर्यकांत ने वसंतरावांना मिठी मारली … आणि धडकन कोणीतरी त्याच्या डोक्यात काही तरी मारलेलं  त्याला जाणवलं . 

“ मिश्तर सुर्यकांत देशमुख …. झोपाच काढायच्या होत्या तर … सिविल इंजिनियरिंग ला अडमिशन  का घेतली ? "
सुर्यकांत वर भ्याड हल्ला झाल्या नंतर अश्या शब्दांचा एका शिक्षका कडून भडीमार झाला … तो बाबांना मिठी मारत नसून स्वतालाच कवटाळून गाढ झोपेत स्वप्न पाहत होता हे त्याला कळलं , पाय सरळ करावे म्हणून हलवले तर … डस्टर खाली पडल्याचे दिसले … डस्टर ने मात्र कधीच खरे न होणारे स्वप्न पुसून … काळं भवितव्य लखलखीत करून ठेवलं होतं ... आयुष्यात बरेच स्वप्न फक्त जाहीरात मात्र राहतात ... खरे होत नाहीत !




P.S. - 

Pudhil Akarshan - Samdan Valley ( Pravas Varnan ) 

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...