Monday, 30 May 2016

Advertisement 1

 Advertisement 1


 Freedom Writer's mood - Relaxed and Naughty !


" आलोच दोन मिनटात " हा माझ्या मित्रांचा गुण , टी . व्ही . वरील जाहिरातींनी देखील घेतला आहे , सरकारी कचेरीत आपलाच क्रमांक आला की कर्मचाऱ्यांची मधली सुट्टी होण … अश्या वेळी जे तुम्हाला वाटत तेच मला जाहिरात लागला की  वाटतं  … 

आताश्या पूर्वी सारख्या जाहिराती राहिल्या नाही …" हेमा रेखा जया और सुषमा  …. सबकी पसंद … " होय 'निरमा' ! किंवा " पेहेले इस्तमाल करे फिर विस्वास करे " ह्या जाहिराती आधी फक्त सकाळ च्या वेळी आणि संध्याकाळी  दिवे लागणीच्या आधी लागायच्या कारण त्या नंतर  गृहिणी खरेदी साठी बाहेर पडायच्या पण  ऐकायला , बघायला , बोलायला , सांगायला किती प्रांजळ होत्या त्या जाहिराती  . आणि आता मात्र जेवणाचं ताट संपवण्याच्या विचारात असतानाच समोर … तोंडात दातांमध्ये झालेल्या आळ्या साफ करणारं दंतमंजन , दोन मांड्यान  मध्ये  खाज खुजली नष्ट करणारे क्रीम , अपचन झालेली छाती च धौतीयोग  आणि बऱ्याच जाहिराती चुकीच्या वेळी मला दिसतात .
मी लहान होतो तेव्हा चा एक प्रसंग सांगतो … माझ्या घरच्यांना सांगू नका !
kingfisher आणि  Tuborg  हे सोडा असलेल्या बाटल्या आहेत अस जाहिरात बघुन वाटायचं आणि मित्रांनी सांगितल  …पण  वेगळ्याच काहीतरी असलेल्या ह्या बाटल्या आहेत  हे मला … एकदा पोट दुखत असताना … औषधे च्या दुकानात … अश्या बाबतीत दुकानदाराने जमेल तितकी माझी चेष्टा करून झाल्यावर कळालं . तेव्हापासून  मी मित्रान वर आणि जाहिरातीन वर विश्वास ठेवायचा टाळतो !
 " आलोच आत्ता " , " १०० रुपये दे तुला २०० करून देतो " "माझा काहीच अभ्यास झालेला नाही " आणि  " ती तुझ्या कडेच पाहत होती " ह्या गोष्टी  म्हणजे रात्री ११ नंतर ढेरी कमी करणाऱ्या यंत्रा  च्या जाहिराती सारख्या असतात … ज्यात आपण कधी कधी भर दिवसा उघड्या डोळ्याने फसतो !
अजून एक खंत म्हणजे … चार चौघात दिसू नये त्या जाहिराती … घरातल्या सगळ्या पिढ्या समोर असतानाच सुरु होणे  … ते म्हणजे कस माहितीये  ?   प्रवासात … आपण स्वताच्या गाडी मध्ये बसून आपल्या समोरच्या प्रत्येक  गाडी वर च सगळ मोठ्याने वाचून काढणे … आणि मागून S T चा लाल डब्बा येणे ! अनुभव कधी बोलू नये हे शिकवतो … पण एखादा लहान आगाऊ कार्टा नाही नाही ते प्रश्न  "काय जब जब ? " आणि "काय  तब तब ?" असा विचारून सतावून सोडतो !



बास  आज  एवढच !
 To be continued ...

Saturday, 7 May 2016

प्रेम आणि परीक्षा म्हणजे

प्रेम आणि परीक्षा म्हणजे …  जाळ अन धुर संगटच … 

Freedom Writer's मूड - सैराट झालं जी … 


परीक्षा माऊ पावलांनी जवळ आली की तोंडा समोर कधीच न उघडलेलं पुस्तक धराव लागतं   … त्याचा नवीन असल्याचा सुगंध मोहून टाकतो … बघणार्यांना वाटत आपण अभ्यास करतोय …   पण आपण ते पुस्तक खरच वाचत असतो का ?

खरतर … आपल्या डोळ्या पासून पुस्तकाच्या अंतर मध्ये आपली वेगळीच दुनिया चालू असते .  एकतर आपल्या आठवणींचा चित्रपट आपण एका अद्रुश्य पडद्यावर पाहत बसतो … नाहीतर … आपल्या येणाऱ्या भविष्यकाळा च दिग्दर्शन करत बसतो … गेलेला काय न येणारा काय … आयुष्य एक चित्रपटच होऊन बसतो … कारण आपणच त्यातले नायक असतो … आणि आपल्या आयुष्यात पण एखादी नायिका असतेच … असा काहीतरी वाहय्याद विचारात असताना … बाप खोलीत येतो … आणि त्याची नजर नायकाला , नालायक ठरवून जाते . मन पुन्हा पुस्तक वाचु लागतं 

 लहानपणी पर्यंत असते ती फक्त परीक्षा आणि तरुणपणी अजुन एक येते ती  म्हणजे प्रेमाची परीक्षा . “ तु  भीड  रे ”  हेच तीन जादुई शब्द  मित्रांचे येतात … आणि  आपला प्रेमाच्या परीक्षे चा फॉर्म आपोआप भरला जातो . प्रेमाच्या परीक्षेत असो किंवा  पुस्तकाच्या परीक्षेत … अभ्यास लागतोच .आयुष्यात आपण  नेहेमी चुकीच्या वेळी आणि चुकीच्याशी पाहिलं प्रेम केलेलं असतं (हेच कटु सत्य आहे ) आणि होते काय तर आपण आयुष्य भर प्रेमाची परीक्षाच देत बसतो . प्रेमिकेच्या गालावरून कधी आणि  पुस्तकाच्या पानावरून कधी हाथ  फिरवायचा हे आपल्या लक्ष्यात येयला हवे  पण आपण तेव्हाच पुस्तका पासुन लांब जाऊ लागतो आणि आपलं बरच काही वाया जातं  … अगदी कधी कधी आयुष्यही .

आताश्या झालय असं की प्रेम आणि परीक्षा दोन्हीही गोष्टी आयुष्यात … चौक चौकात आणि महिन्या महिन्याला समोर येतात , त्यामुळे कधी कधी लव लेटर  च्या जागी  HALL TICKET  दिलं  जातं ,लव लेटर चा मजकूर पेपरात लिहिला जातो !

काही काही नशीबवान होतात पास दोन्ही परीक्षेत … काहीही आई बाबा म्हणतील त्या विषयात हाथ आणि डोकं ( नंतर बरच काही ) घालतात , काही एकटेच आयुष्याची परीक्षा देत राहतात … पैसा नावाचं certificate गोळा करत , कारण त्यांनी  प्रेम आणि पुस्तकांना परिस्तिति मुळे नाकारलेलं असतं … तर 
काहींना पुस्तकं आणि प्रेम नाकारतात त्याच्या परिस्थिती मुळेच  !

प्रेमाच्या परीक्षेत नुसतं propose करणं ही परीक्षा नसते … समोरच्याचं 'हो' मिळाल्यावर खरी परीक्षा सुरु होते  कारण … प्रेम निभावाव लागतं आणि पुस्तकांच्या परीक्षेत नुसतं वाचून नाही आठवून पास व्हायच असत . असो !

काही कळे न झालाय  ! 
अजून किती  लव लेटर आणि किती HALL TICKET लागणार आहेत पास व्हायला ! 

तो पर्यंत आयुष्य म्हणजे … जाळ अन धुर संगटच … 

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...