Monday, 25 November 2019

YOU NAILED IT...


दुकानातून बिस्कीट, दूध सारख्या ठरलेल्या गोष्टी,  ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या गाडीला उचलून नेण्याधी विकत घेऊन परत गाडी पर्यंत येण्याच्या स्पर्धा आपण जिंकल्या  आहेत. अनेकदा या स्पर्धेत गाडी ते दुकान आणि दुकान ते गाडी हे अंतर पार करताना अगदी नाकेनऊ येतात... पांथस्थ, भिकारी, शेपटी हलवणारे कुत्रे, झाडाखाली अतिक्रमण करून अधिराज्य गाजवणारी मंडळी... अख्खं ब्रह्मांड येतं हो या रेस मध्ये, मध्ये मध्ये करायला. 

अंगचोरून आपण दुकान गाठतो, वस्तू घेतो, हिशोब करतो परत फिरतो... मनात एकच अर्धी रेस संपली, परत अंगचोरुन झपं झप चालू लागतो, दुरूनच गाडी उचलणारी टोळी येताना दिसते आपण अजून वेग वाढवतो आणि एका अवाढव्य झाडाच्या जवळून जाताना त्याला लागलेला खिळा कापड आणि मांस फाडून रक्त चाखतो... अर्थात आपण आपली गाडी कडे पाळतो आणि किक मारून निघून जातो. झालय का कधी असं, तुमच्या सोबत? तुमच्या समोर? 

प्रश्न असा आहे की झाडाला खिळे येतात कुठून? तर मला मिळालेलं उत्तर म्हणजे स्पर्धेतून. जाहिरातबाजी ची स्पर्धा...  आपल्या व्यवसायाच्या एका फ्लेक्ससाठी त्या झाडाला एक खिळा ठोकला तर काय होणारे? असे अनेक, असाच एक विचार करतात... आणि निसर्गाची ऐशीतैशी करायला आपण छोट्यातली छोटी जागा देखील शोधून काढली आहे हे यातून लक्ष्यात आलेच आहे. 

रस्त्याच्या आजूबाजूला इतके फलक लावलेले असतात की माणसाचा कळप वडाप ची वाट बघत आहे असं मला अनेकदा वाटतं, काही फ्लेक्स झाडाला लटकलेली असतात ती मला माकड वाटत. मुळात म्हणजे झाडाला ज्यास्तीत ज्यास्त डोरा बांधावा, झोपाळा बांधावा, त्याची फळं, तुटायला आलेली फांदी तोडावी पण झाडाला असे खिळे ठोकून ख्रिस्त यातना देण्यात काय अर्थ आहे? कारण त्याचा सगळा परिणाम माणसावर होतच आहे. 

लहान शहर इतके नाही पण मोठ्या शहरात जाहिरातीचे भले मोठे फलक पडून माणसाचे मृत्यू झालेले आहेत पण छोटे फलक या झाडांना मारतच आहेत की... 
मुळात म्हणजे सध्या जोरात असेलेला Start Up भिडूंना हे असले प्रकार करावे लागतातच, बहुदा अश्या प्रकारे जाहिरात करून देण्यासाठी देखील एखादा स्टार्ट अप असेल, पण...एखाद्या झाडाच्या आधारे जगणारे पक्षी, माणसे, सवलीतील प्राणी व वाहनं यांना आणि निसर्गाला अश्या प्रकारे हा छोटासा खिळा लवकरच दात खिळ बसवेल... 

साधी एक सुई टोचली तर आपण खडबडून जातो... मग या झाडांना का शिक्षा? तुम्ही म्हणाल इथे गळ्यावरून सुरा फिरवला जातो, अरे कॉलनी मधील झाडे पाडली जातात त्यावर कोणाचा अंकुश नाही... तर या खिळा च काय घेऊन बसलास?... तर माझा एक लाडका शर्ट असाच फाटलेला आणि निसर्गाची होणारी दैना पाहून आता माझी फाटत आहे. यापृथ्विवर आपण एक टिंब आहोत... बहुदा तो देखील नाहीच आणि त्याउपर एक टिंब मोठा की खिळा तर बेशक खिळा... त्यामुळे झाडं पडायच्या विरोधा पेक्षा हि खिळे ठोक बंद करू शकलो तर नक्कीच आपण उद्या झाडे पडायला नकाराची यशस्वी झुंज देऊ शकू असे मला वाटते... चला निसर्गाला मोकळा श्वास घेऊ देऊ. 

समाजाला यावर उपाय, पर्याय, punishments, amendments,  झाडांवर होणारे पडसात याविषयी खूप कमी माहित आहे पण आंघोळीची गोळी  हे भन्नाट शीर्षक असलेलं फेसबुक पेज जरुर लाईक करा आणि वर्षापूर्वी लिहिलेला लेख आज पोस्ट करतोय.   

खाली लिंक देतोय... 

अवश्य भेट द्या...

https://www.facebook.com/AngholichiGoli/

...............

ही पोस्ट या माझ्या ब्लॉगची ७५ वी पोस्ट आहे...
नुकतीच या ब्लॉगला १०००० वाचकांनी भेट दिल्याचे समजते आहे. 
सर्वांचे धन्यवाद. 

सध्या कथा असलेले पुस्तक लिहितोय...
लवकरच पूर्ण करीन.
लवकरच पूर्ण करीन.
लवकरच पूर्ण करीन.

Monday, 18 November 2019

family man

फॅमिली मॅन 

होता माझा एक बाप 
होता डोक्याला मोठा ताप 
सतत म्हणायचा अभ्यास कर 
स्वतः होता अंगुठा छाप 

राग उगवायचा त्याच्या मनात 
जैसे जंगली गवत...
नोकरी त्याची वाट आईला 
आहे तिची सवत...
रात्री असायची खुश स्वारी
मस्त येयची झुलत 

नकार नव्हता कश्याचाही 
सतत होकाराची मान डुलत...
श्रीमंतच होता वाटतं तो 
आम्ही पडलो बहुतेक कमी
शिकवले त्याने अजून दोघे 
भाऊ आमचे चुलत...

आठवते मला नेले होते 
आम्हाला एकदा दर्यावर 
सारे होते आनंदात 
बाप एकटाच होता रडत...

डोळे पुसले, ओठ हसले 
पेटवली त्याने बिडी 
तेव्हाच कळाले होते मला 
आयुष्य म्हणजे अंतहीन सापशिडी 

उद्योग केले, धंदे केले 
कधी फसले कधी फसवले...
त्याने आयुष्य ठीक उसवले
आमचा फॅमिली मॅन आधी कधीतरी 
मुलगा होता बाप झाला
बाप होता म्हातारा झाला 
होताचा ही नव्हता झाला...

आणि आमच्या तारुण्यात चर्चा होती 
ऐकल होत लग्न झाल्यावर 
बाप झालं की,
 व्हावं लागतं
 superman आधी...
आता व्हावं लागतं 
superman आधी...    

— दुर्गेश विवेक निसळ

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...