Thursday, 30 March 2017

दुसर्यात


V च चिन्ह खरंतर बऱ्याच गोष्टी  दर्शवतो , जस कि V फॉर वेडे .पण  आता आपण वेडे कि समोरचे वेडे हा वेड लावणारा विषय आहे . आपण एकतर स्वतःला शहाणे आणि प्रत्येक दुसऱ्याला वेडंच समजतो . म्हणूनदेखील ते V च्या  चिन्हाला उगाच सगळे victory म्हणतात पण  त्याचा खरा अर्थ “ दुसऱ्याला वेड्यात काढलं ” असा आहे ,  जर खरंच कोणत्या V ला प्रतिउत्तर देयचं असेल तर मात्र  हाताचं मधलं बोट बरच काही बोलून जातं .

लोकं कश्यावर हसतील काही सांगता येत नाही कारण आता जोक हा नुसता वाचुन ,मनातल्या मनात हसून पुढे पाठवायची गोष्ट बनला आहे . लोकांना फक्त आजकाल ‘दुसऱ्यांवर’ हसू येतं त्यांना लाईव्ह जोकर्स आणि त्यांचे लाईव्ह जोक्स आवडतात .बऱ्याचदा  आपल्यावर ,आपल्या चुकांवर  कोणी हसू नये म्हणून आपणच आधी ‘ दुसऱ्यावर ’ हसून घेयचं ... म्हणजे ती गोष्ट ऐकण्या पेक्षा लोकं ती  सांगणार्यावरच ज्यास्त हसायला लागतात  .

एक काळ होता . “अरे तुझ्या पँटची चेन उघडी आहे” असं कोणी आपल्याला म्हणालं की आपण घाईगडबडीत कोणी बघत तर नाहीये ना पाहून चेक करायचो तर , पैसे देऊन तोंड बंद केलेल्या साक्षीदारा प्रमाणे चेन बंदच असायची  ... आपण मात्र बेचैन व्हायचो  आणि चुकीची माहिती देणारा मात्र “ एप्रिल फुल ! ” म्हणून निखळ हसू लागायचा ,मग त्यावर जरा चिडून झाल्यावर आपण पण शरमेनं मान खाली घालून नकळत  ओठातल्या ओठात हसायचो .

साखरेच्या डब्यात मीठ ठेवून आईला , सकाळी ५ चा गजर बदलून रात्री ३ वाजता आजोबा दूध घेयला निघताना , बाबांच्या बुटांमध्ये २ वेगवेगळ्या रंगाचे मोजे ठेवलेले ते घालताना  , ताईला तुझ्यासाठी काहीतरी आणलाय म्हणून सांगितल्यावर तिने हाथ पुढे केल्यावर पाल , झुरळ , किडे किंवा काहीच नाही देताना ... जो काय आनंद असायचा तो आता  १ एप्रिल ला निळू फुलें सारखा चेहेरा करून बसणाऱ्या लोकांना काय कळणार . कारण तेव्हा माणूस हसवणारा होता फसवणार नाही .

साप - साप , बॉम्ब - बॉम्ब , तुमच्या गाडीचा लाईट चालूये असं ओरडून सांगणारे कधी कधी नेमकं १ एप्रिलला दुसऱ्याला फसवताना फुल मार खातात . विनोद बुद्धी नसणाऱ्यां कडे मात्र कायम हाणामारी करायची ताकद आणि हिम्मत दोन्ही कायम असते आणि मग त्याच्यावर कोणी हसलं कि हसणाऱ्याच्या दातांची बिट्टिशीची चौसष्टी होती ... जिभेला हाड नसलं तरी शरीरातले इतर २०७ हाडं तिला वचकून असतात , जीभ उगाच कुठेतरी घसरते पण तुटतात मात्र हाडं ,  भीती पोटी कोणाशी बोलायलाच नको अशे जगणारे वाढत आहेत ... आणि मोकळ्या पोटी फक्त बडबड करून भूक भागवणारे देखील आहेत , त्यामुळेच कि काय विनोद आणि विनोदबुद्धीची  गंभीर अवस्था ( सिरीयस कंडिशन ) होत चालली आहे ...

एखाद्याच्या पाठीवर त्याच्या नकळत काहीतरी विचित्र चित्र लावायचं आणि त्याला बघून मग सर्वांनी हसायचं .
असच आपण पण  ‘ च्यु  ’ लिहिलेलं अदृश्य  लेबल दुसऱ्यावर त्याला लावायचं आणि हसायचं , असाच कोणीतरी एक आपल्याला “दुसऱ्यात” काढतो आणि च्यू लिहिलेलं अदृश्य लेबल लावून आपल्यावर  हसत बसतो .
आजकाल लोक किती हसतात ... म्हणजे ते खुश आहेत का ? असं नाही .
तो आपल्यावर हसला म्हणून आपण त्याच्यावर हसायचं त्याला काही विनोदबुद्धी नाही म्हणत सूडबुद्धी म्हणतात .
विनोद च निर्माण करायचा असेल तर बुद्धू असायची नाही पण मनाने बुद्ध असायची मात्र गरज असते , कारण दुसरा आपल्यावर हसतोय कळल्यावर  आपल्याला राग येता कामा नाही .

हा एप्रिल फूल्स डे ... जर मराठी बाण्यात लिहायचा झाला तर त्याला ‘च्यु बनवायचा दिवस’ असं म्हणलं जाईल .
मग ह्यात विशेष काय सगळेच रोज एकतर च्यु बनतात  तरी किंवा बनवतात  तरी ... जसं मी आत्ता तुम्हाला वर काहीही मनातलं लिहिलं आणि तुम्ही सगळं मन लावून वाचताय ... म्हणजेच तुम्ही “दुसऱ्यात”* निघाले आहात .

च्यु च आहोत आपण  सारे
फसणाऱ्याला पुढे वाव नाही
जमाना बावळटांचा आहे
जिथे शहाण्यांची कमी नाही .        
------------------------
*दुसऱ्यात - *त्यात .

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...