Sunday, 28 August 2016

Reality and my diary

When you are out of a dream and when i close my diary after daily writing ... only thing we come across together is  REALITY !


Hi readers 
You know only thing about yourself in this world is Reality !
Thank you

Freedom Writer's Mood - Bored / frustated / doesnt matter 

Well freedom Writer never lives his dreams , he lives his diary ... for many who requested to see a glance of my diary ! 
here it is !

Diary from 24th August to 28th august 2016 

Well well Well ... i am a bird with no wings but with two feathers  ... one is mother and another is father ... is it sufficient to fly ? 

Some people need people ... some people need not many but some people ... some people need only someone ... but some people need only themselves ... which kind are you ? 

i never think about how i will survive ... i just have plans towards/about my death (natural) ...  why some see it as wierd thing ? 

There is tension  to everyone but then tension gets our attention which is distructive ... so being busy at work you like is bliss !

when you get egnored ... just go to the mirror ... after a hour or more ... you get to know ... you cant ignore you !

Alcohol is medicine manysay !  but no one is seem to be interested / courageous / genuine / loyal  to know what is reason behind having that medicine ... means in simple words ... no one wants to know the pain ! 

i like to be gathered with friends (good one) but i make sure i am getting enough time for myself ... i want a camera to follow me ... a cegerrate in left hand  ... a jaguar to get out from ... a applaud for my writing ... a big amount check for my poem ... but but but ... i will need sleep ... which i cant buy ! 


When you are out of a dream and when i close my diary after daily writing... only thing we both come across together is  REALITY !

from last 4 days i dint write my diary ... many of readers wanted to read my diary ... not a total i can share with you ... but a little one ! 





Saturday, 13 August 2016

आज्जी ची डायरी

लहानपणी तिच्या हाताला हत्ती , घोडे , मोबाईल , बाहुल्या , पैसे काहीही लागायचं ते ती फ्लॅट च्या खिडकीतून खाली फेकून देयची , खाली खेळणाऱ्या पोरांना तर सवयच लागली होती , कोणतंही खेळणं खाली पडलेलं दिसलं की ते आणुन देयचे , किंवा तिच्या बाबाला आणावं लागत असे , पण तिची आई मात्र शिस्तशिर ,सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे . त्या लहान पोरीने पण कधी आई च अनुकरण करून सगळं नीट नेटकं ठेवायला सुरुवात केली समजलंच नाही . 
लहान आहे तरी ती सगळं खाते ,पण फक्त शाळेत , घरात सगळे नखरे असतात .आजकालच्या मुलांना पोलीसा चा धाक दाखवण्यात काही अर्थ नाही , “ अ ग त्या पोलीसा ची ढेरी बघ कशी सुटली आहे मेथी ची भाजी खाऊन खाऊन ” असा काहीतरी निरागस युक्तिवाद लढवुन नावडती भाजी खायचं टाळते . 
‘ बाब्बा - आई  ’ शिकणारे बोबडे बोल कधी नकळत 
-“ आई ही कोण आहे ग फोटो मध्ये ? ”
-“ काय सांगतेस आई तुच आहेस ? इय्यो ! तुमच्या लग्नाचे फोटो आहेत का हे ...तू ह्या मोबाईल मधून फोटो काढलेले का ?  अ ग तुझ्या शेजारी हा कोण माणूस उभा आहे ग ?”
-“ हा आपला बाबा आहे ?बाबो !  मी तेर ओळखूच नाही शकले !”
- “ आई पण माझा एकही फोटो नाहीये मी कुठे होते ? ” 
अशे प्रश्न विचारून वकील आणि शिक्षक पेश्याला लाजवतील अशी निरूत्तर परिस्तिथी निर्माण करतात . 
पाहुणे आले की .आवाज अनोळखी म्हणून त्यांना ती दाराबाहेर तिष्ठत ठेवते ओळख पटली कि आत घेते ,  त्यांना पाणी देते . शाळेत शिकवलेली इंग्रजीतली कवीता म्हणून दाखवते , टी .व्ही वर चालू असेल त्या गाण्यावर नाचून दाखवते . पण ते निघताना त्यांचे पायापडून आशीर्वाद हि घेते . 
स्वता भातुकलीचा खेळ खेळते पण पाळण्यातील लहान भाऊ रडायला लागला कि “ आई त्याला भूक लागली आहे ” हे मातृत्व तिला कुठून आलय देव जाणे . 
तिला हवी ती सिरीयल एकटीच पाहत बसते , हातात मोबाईल लागतो , जेवताना गाणी ऐकायला आवडतात , तिचा बाबा बाहेरगावी गेला असेल तर skype करते , “ आजीला technology मधलं काहीच कळत नाही ” म्हणून माझी तक्रार आई कडे करते . पण आईंने तिची तक्रार केली कि स्वारी माझ्या कडेच येते . 

गृहपाठ , खेळ , दंगा - मस्ती , मित्र मैत्रिणी , आई - बाबा येण्याच्या वेळा , चांगला अभ्यास , चांगले मार्क्स , सगळं लागतं हे सगळं कसकाय हा लहान जीव सांभाळतो काय माहित ? 

घरट्यातील हे पिल्लू कधीतरी पंख फुटतील तेच स्वप्नां मागे उडायला लागेल , चिव- चिव करणारी आमच्या घरातली ही चिमणी कधीतरी कोणत्या तरी चिमणरावांच्या घरची कधी लक्ष्मी होईल ते कळणारच नाही ! 



Friday, 5 August 2016

“ सॉरी पापा ”

कोणत्याही कादंबरीला लाजवेल असा रविवार  , समोर पाऊस , कानात किशोर कुमार , हातात आवडत्या लेखकाचं पुस्तक , पण  इतकं छान बघवत नाही नशीब लिहिणाऱ्या लेखकाला , अचानक तिचा कॉल आला , कोणत्याही तंद्रीतुन बाहेर पडणं जितकं भयानक ,तसच तिचा आवाजही घाबरा ,रडका खोल बुडाला होता ,आत्ता २ तासा पूर्वी तर बोलणं झालेलं आमचं , काही भांडण झालेलं नव्हतं , पण आत्ता ती तोंडून फक्त हुंदके देत “सॉरी पापा ” म्हणुन फक्त भय निर्माण करत होतं  ‘ तुझी अाज्जी कुठंय तिला बोलायला दे ’ ‘ आई काही बोलली का ? कोणी पोराने कॉलेज मध्ये त्रास दिला का ?’ ‘मघाशी तर तू नीट बोलत होतीस आता काय झालं ?’ ‘आज्जी ला तर काही नाही ना झालं ? ’ उत्तर नाहीच, प्रश्न वाया जात होते मिळत होते ते हुंदके आणि एकच वाक्य “ सॉरी पापा ” , ह्याचा काय अर्थ आता ? ह्या एका नव्या कोड्याने , तोच पाऊस नकोसा झाला , ते पुस्तक निरर्थक झालं , किशोर कुमार ऐकवा वाटत नव्हता , मी मुंबईत , तिची आई दिल्लीला , ती बँगलोर ला , परिवार तीघांचाच पण हा ट्रायपॉड अस्ताव्यस्त पसरलेला , सासूबाई कुठे कडमडल्या असतील ह्या विचारात असतानाच ,  म्हातारीला तर काही नसेल ना झालं हा विचार डोक्यात येणं साजेसं , दोघी म्हणजे दोन टोकं  एक तारुण्यात झेपावलेली आणि दुसरी म्हातारपणात पडलेली खरतर,  दोघीं ची काळजी घेणारा कोणीतरी हवं , वर सासूबाई ने , कोणत्याही वयातील स्त्री ने करावा ते केलंच , मोबाईल वर केलेला कॉल उचलला नाही , मुलीचे हुंदके आणि सॉरी पापा ऐकत मी मात्र जगभरातले apps वापरून रिक्षा , मग टॅक्सी मग विमान तिकीट आरक्षीत करून पुढील ५ तासात बंगलोर गाठलं , दार वाजवलं , दार उघडलं तर ते माझ्या बायकोने ‘ तुझं  माझ्यावर प्रेम नाहीये बिलकुल , मुलगी नुसती रडते आहे  पण साधा कॉल ही केला नाहीस !’ तिने वेगळाच सूर लावला , ‘ सॉरी मी विसरलो , काय भानगड काय आहे पण ? आणि तू केव्हा आलीस ?’ नवरा आणि बाप  दोन्ही नात्याने घराच्या उंबर्यातच प्रश्न विचारले पण समोरून खूप लोकांचा गलका एकदम समोर येऊन “हैप्पी मॅरेज एनिवर्सरी ” ओरडला , म्हणजे हा सगळा बनाव होता ,  राग येत होता , पण प्रसंग एखाद्या कादंबरीला लाजवेल असाच होता , बायकोच्या मिठीतुन सुटत , सासूच्या पायापडलो , तिने माझे कान धरले “ लग्नाचा वाढदिवस विसरतोस नालायका ? ” खूप नातेवाईक होते सर्वांना एकत्र बघून डोळे भरून आले ,  समोर अली ती माझी मुलगी तेजश्री , खोटं खोटं रडत म्हणाली “ सॉरी पापा ” मग हसू लागली मला येऊन बिलगली ,आता माझा ‘राग’ ‘गार’ झाला ,थोड्या वेळाने . बायकोला आणि मला मोकळीक मिळाली ,तेव्हा मी देखील कोटाच्या आतल्या खिश्यात लपवुन ठेवलेला गुलाब ... तिला दिला ,बायको नव्या नवरी प्रमाणे लाजली , मला देखील आजचा दिवस लक्ष्यात होता बघून गहिवरून आलं , हातात ला गुलाब तिच्या डोक्याच्या केसां मध्ये माळणार ,तेवढ्यात  , दार उघडून तेजश्री ने परत भ्याड हल्ला केला , आमचा ‘त्या’ पोझ मध्ये फोटो काढला आणि खट्याळ पने आम्हाला एकांत देऊन जाताना परत म्हणाली “ सॉरी पापा ” .

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...