Monday, 25 November 2019

YOU NAILED IT...


दुकानातून बिस्कीट, दूध सारख्या ठरलेल्या गोष्टी,  ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या गाडीला उचलून नेण्याधी विकत घेऊन परत गाडी पर्यंत येण्याच्या स्पर्धा आपण जिंकल्या  आहेत. अनेकदा या स्पर्धेत गाडी ते दुकान आणि दुकान ते गाडी हे अंतर पार करताना अगदी नाकेनऊ येतात... पांथस्थ, भिकारी, शेपटी हलवणारे कुत्रे, झाडाखाली अतिक्रमण करून अधिराज्य गाजवणारी मंडळी... अख्खं ब्रह्मांड येतं हो या रेस मध्ये, मध्ये मध्ये करायला. 

अंगचोरून आपण दुकान गाठतो, वस्तू घेतो, हिशोब करतो परत फिरतो... मनात एकच अर्धी रेस संपली, परत अंगचोरुन झपं झप चालू लागतो, दुरूनच गाडी उचलणारी टोळी येताना दिसते आपण अजून वेग वाढवतो आणि एका अवाढव्य झाडाच्या जवळून जाताना त्याला लागलेला खिळा कापड आणि मांस फाडून रक्त चाखतो... अर्थात आपण आपली गाडी कडे पाळतो आणि किक मारून निघून जातो. झालय का कधी असं, तुमच्या सोबत? तुमच्या समोर? 

प्रश्न असा आहे की झाडाला खिळे येतात कुठून? तर मला मिळालेलं उत्तर म्हणजे स्पर्धेतून. जाहिरातबाजी ची स्पर्धा...  आपल्या व्यवसायाच्या एका फ्लेक्ससाठी त्या झाडाला एक खिळा ठोकला तर काय होणारे? असे अनेक, असाच एक विचार करतात... आणि निसर्गाची ऐशीतैशी करायला आपण छोट्यातली छोटी जागा देखील शोधून काढली आहे हे यातून लक्ष्यात आलेच आहे. 

रस्त्याच्या आजूबाजूला इतके फलक लावलेले असतात की माणसाचा कळप वडाप ची वाट बघत आहे असं मला अनेकदा वाटतं, काही फ्लेक्स झाडाला लटकलेली असतात ती मला माकड वाटत. मुळात म्हणजे झाडाला ज्यास्तीत ज्यास्त डोरा बांधावा, झोपाळा बांधावा, त्याची फळं, तुटायला आलेली फांदी तोडावी पण झाडाला असे खिळे ठोकून ख्रिस्त यातना देण्यात काय अर्थ आहे? कारण त्याचा सगळा परिणाम माणसावर होतच आहे. 

लहान शहर इतके नाही पण मोठ्या शहरात जाहिरातीचे भले मोठे फलक पडून माणसाचे मृत्यू झालेले आहेत पण छोटे फलक या झाडांना मारतच आहेत की... 
मुळात म्हणजे सध्या जोरात असेलेला Start Up भिडूंना हे असले प्रकार करावे लागतातच, बहुदा अश्या प्रकारे जाहिरात करून देण्यासाठी देखील एखादा स्टार्ट अप असेल, पण...एखाद्या झाडाच्या आधारे जगणारे पक्षी, माणसे, सवलीतील प्राणी व वाहनं यांना आणि निसर्गाला अश्या प्रकारे हा छोटासा खिळा लवकरच दात खिळ बसवेल... 

साधी एक सुई टोचली तर आपण खडबडून जातो... मग या झाडांना का शिक्षा? तुम्ही म्हणाल इथे गळ्यावरून सुरा फिरवला जातो, अरे कॉलनी मधील झाडे पाडली जातात त्यावर कोणाचा अंकुश नाही... तर या खिळा च काय घेऊन बसलास?... तर माझा एक लाडका शर्ट असाच फाटलेला आणि निसर्गाची होणारी दैना पाहून आता माझी फाटत आहे. यापृथ्विवर आपण एक टिंब आहोत... बहुदा तो देखील नाहीच आणि त्याउपर एक टिंब मोठा की खिळा तर बेशक खिळा... त्यामुळे झाडं पडायच्या विरोधा पेक्षा हि खिळे ठोक बंद करू शकलो तर नक्कीच आपण उद्या झाडे पडायला नकाराची यशस्वी झुंज देऊ शकू असे मला वाटते... चला निसर्गाला मोकळा श्वास घेऊ देऊ. 

समाजाला यावर उपाय, पर्याय, punishments, amendments,  झाडांवर होणारे पडसात याविषयी खूप कमी माहित आहे पण आंघोळीची गोळी  हे भन्नाट शीर्षक असलेलं फेसबुक पेज जरुर लाईक करा आणि वर्षापूर्वी लिहिलेला लेख आज पोस्ट करतोय.   

खाली लिंक देतोय... 

अवश्य भेट द्या...

https://www.facebook.com/AngholichiGoli/

...............

ही पोस्ट या माझ्या ब्लॉगची ७५ वी पोस्ट आहे...
नुकतीच या ब्लॉगला १०००० वाचकांनी भेट दिल्याचे समजते आहे. 
सर्वांचे धन्यवाद. 

सध्या कथा असलेले पुस्तक लिहितोय...
लवकरच पूर्ण करीन.
लवकरच पूर्ण करीन.
लवकरच पूर्ण करीन.

Monday, 18 November 2019

family man

फॅमिली मॅन 

होता माझा एक बाप 
होता डोक्याला मोठा ताप 
सतत म्हणायचा अभ्यास कर 
स्वतः होता अंगुठा छाप 

राग उगवायचा त्याच्या मनात 
जैसे जंगली गवत...
नोकरी त्याची वाट आईला 
आहे तिची सवत...
रात्री असायची खुश स्वारी
मस्त येयची झुलत 

नकार नव्हता कश्याचाही 
सतत होकाराची मान डुलत...
श्रीमंतच होता वाटतं तो 
आम्ही पडलो बहुतेक कमी
शिकवले त्याने अजून दोघे 
भाऊ आमचे चुलत...

आठवते मला नेले होते 
आम्हाला एकदा दर्यावर 
सारे होते आनंदात 
बाप एकटाच होता रडत...

डोळे पुसले, ओठ हसले 
पेटवली त्याने बिडी 
तेव्हाच कळाले होते मला 
आयुष्य म्हणजे अंतहीन सापशिडी 

उद्योग केले, धंदे केले 
कधी फसले कधी फसवले...
त्याने आयुष्य ठीक उसवले
आमचा फॅमिली मॅन आधी कधीतरी 
मुलगा होता बाप झाला
बाप होता म्हातारा झाला 
होताचा ही नव्हता झाला...

आणि आमच्या तारुण्यात चर्चा होती 
ऐकल होत लग्न झाल्यावर 
बाप झालं की,
 व्हावं लागतं
 superman आधी...
आता व्हावं लागतं 
superman आधी...    

— दुर्गेश विवेक निसळ

Sunday, 27 October 2019

Bonus

Bonus

पगार माझा चिमूटभर
स्वप्न घरच्यांची मुठभर

ससा कासव शर्यत जशी
पगार आणि खर्चाचीही तशी

त्यात आली ही
नेमकी दिवाळी...

कॉल आला मुलीचा
हवे तिला फ्रॉक चार...

मुलाचाही आला
त्याला हवे फटाके फार

बायको मागते बरच काही
परवडण्यासारखं सगळंच नाही

आईला लागतात औषधं भरपूर
गाडीही म्हातारी मारते धूर...

छुपे खर्च तर विचारूच नका
अन् रुपया बोनसची चाहूल नाही

मालक आमचा चिकट फार
धंद्याला त्याच्या मंदीची धार

त्यात आला बॉक्स समोर
ज्यात नुसतीच मिठाई?
मालक बोलले हातात देऊन
मित्रा हॅपी दिवाळी...

अरे देवा...
सारं आवसान
सारं तत्वज्ञान
सारे स्वप्न
सारं समाधान
गेलं सारं गळून

खिसा आधीच अशक्त माझा
सावकार गेला दिसून

वाटत होते मला की
जावं यातुन पळून...

तेव्हढ्यात आली हाक मालकाची
अरे तुला पाकीट देयचं गेलं राहून

मालक आमचा देव माणूस...
म्हणत घेतला बोनस मोजून
मिठाई मिळाली
कमाई मिळाली
च्यायला काय हव आजुन?

आता जरा कुठे रिलॅक्स वाटलं
जराशी का होईना पण दिवाळी साजरा होईल...
याचं समाधान वाटलं!

- दुर्गेश विवेक निसळ

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...



Monday, 7 October 2019

Navratra stories 2019

२०१९ नवरात्रीच्या कथा

कमीत कमी शब्दात एखाद्या विषयी खरे भाष्य करणे काळाची गरज आहे... महिलांच्या विषयी लिहिणारे अनेक आहेत पण ते टिकांचे धनी झाले, पण आई भवानी जगदंबेची कृपा आहे कि माझ्या लिखाणाला कोणीही विरोध न करता... मोठ्या मानाने ते स्वीकारले आणि माझ्या मते हीच बदलाची पहिली पायरी आहे असे मला वाटते.  

जय जुमांजी

कथेची पहिली माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
डोक्याचा डॉकटर — मग मला सांग तुला भीती कशाची वाटते ग?
ती— त्या प्रसंगा नंतर, आरसे, कॅमेरा, अंधार, लख्ख उजेड, नजरा आणि दिवसेंदिवस यादी वाढतच चाललीये...
तरी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची दुसरी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
‘तो’ वय वर्ष १८...
बाबा— हे बघ दादा... तुला हवं ते कर, आम्ही काय तुला अडवणार नाही.
‘ती’ वय वर्ष १८
बाबा– हे बघ ताई... तुला काही कळत नाही, आम्ही काय सांगतोय ते कर...
तरी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची तिसरी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
ती– मला बोर होतंय यार...
तो– यार किती ते तुझे moodswings!
मी नाही handle करू शकत यार...
ती– k. Let's break up then...
(शांतता)
ती– Or lets have chicken momos, cheese cake, french fries.... Panipuri and then break up...
तो– (हसत) अच्छा means you are hungry!
You crazy girl...
तरी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची चौथी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
स्वतःच्या बहिणीची त्याला खूप काळजी होती...
पण
दुसऱ्याच्या बहिणीन बाबत मात्र कधीच काळजी नव्हती.
तरी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची पाचवी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
घर मालक – डिक्रा, बॉयफ्रेंड allowed नाही हा... म्हणजे personally don't mind हा... नेवर एवर ... पण सोसायटी मंदी चर्चा होते ना सो...बाकी मला काही प्रॉब्लेम नाही.
त्या दोघी एकमेकांकडे आत्मविश्वासाने पाहून हसल्या... आणि घर मालकाला म्हणाल्या “sure अंकल... नो बॉयफ्रेंड never ever. That's a deal”.
तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची सहावी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
वेळ रात्री ९:५० मिनिटे– ती येते
आई – ही काय वेळ झाली का ग घरी येयची?... Blah blah blah blah... आता तूच अन्न गरम कर आणि जेवून घे...
........................................
वेळ रात्री ९:५८ वाजता– तो येतो
आई– उशीर झाला रे आज! अन्न गरम करून देते, लगेच जेवून घे...
तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची सातवी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
स्वीकाराची जादू मोठी असते...
सर्वांना जमते असे नाही.
जन्माला ती आली
जगताना तो झाला.
तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

कथेची आठवी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
No one
Literally No one
पूर्षांच बर असत,
कुठेही कडेला उभा राहता येतं...

तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...


कथेची नववी माळ...
लेखक—दुर्गेश निसळ.
अगं उद्या तर बँक हॉलिडे...
...बायकांना कसली आली मेली सुट्टी?
तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...


#Navratri2019 #navratri #Dasara #dasara2019 #woman #womanism #marathi #writer  

Navratra Stories 2018

२०१८ च्या नवरात्री निमित्त ९ छोट्या कथा लिहिल्या... महिलांचे प्रश्न यावर लिहायला जणु आई भवानी जगदंबेनेच मला आशीर्वाद दिला, तुम्हा माता बहिणींनी याविषयी चांगला प्रतिसाद दिला... लवकरच महिलांचे प्रश्न संपोत आणि मी हे सदर लिहिण्याचे बंद होवो...

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...

जय जुमांजी


#नवरात्री निमित्त रोज रात्री एक छोटीशी कथा पोस्ट करनार आहे. आजची कथा...

पहिली माळ 

तिला दरवर्षी पैठणी नमागता मिळायची पण पिरिएड्स
आलेकी पॅड मात्र तिलाच धावत जाऊन
आणावे लागायचे.

दूसरी माळ 
सकाळी भोळा भक्त होऊन त्याने सर्वशक्तिशाली माते च्या चरणावर डोके टेकवले मंदिरात जाऊन आणि
रात्री मात्र मदीरा पियून शक्तिप्रदर्शन करताना घरातल्या देवीचे डोके फोडले.
- दुर्गेश विवेक निसळ

तिसरी माळ... 

"काय करणार ग छकुले, आमच्या येळी नव्हतं ग #metoo वैगरे" आजीने तिच्या यातना, 'हे' येताना दिसताच थांबवल्या आणि नववारीचा पदर डोक्यावरून घेतला. ते समोरुन स्वयंपाकघरातून बैठकीत गेले कळताच तिने उरलेलं वाक्य पूर्ण केलं "तो माझा मुलगा असला तरी तू माझी नात आहेस. तु ही विकृती सहन करू नकोस... घाबरू नकोस... मी आहे तुझ्या सोबत.".

दुर्गेश विवेक निसळ

चौथी माळ 

'थायरॉइड ची टेस्ट करुन घे एकदा'
असे तीच्या मैत्रिणी, बहिणी अश्या अनेक देव्या तिला सांगत होत्या पण तिला ऐकावे लागले कोणाचे तर, राक्षस बेवड्या नवऱ्याचे...'काही नाही झालेलं तुला'... नंतर काहीच झालं नाही पण घरातली लहान लेकरं आई बिना वाढली.
- दुर्गेश विवेक निसळ

पाचवी माळ 

वासना, मोह आणि गिधाड.

ब्रेक अप नंतर प्रथमच ती इतकी नटुन थटून, घरच्यांच्या संमतीने तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीं सोबत पब ला गेली...
ती सोडुन सगळे घरी परतले तरीही तिचा पत्ताच नाही. तिचा मोबाइल बंद.
"तिची एका मुला सोबत तिथे ओळख झाली, ती त्याच्याच सोबत रमली, आमच्यात टाइमच स्पेंड नाही केला तिने, तो तिला सोडणार होता असे तीनेच त्याच्याच समोर ठरवले, ती काही समजवून घेण्याच्या मनस्थितित नवती, मग मी काही समजवु शकले नाही" असे तिच्या बेस्ट फ्रेंड कडून हिच्या घरच्यांना समजले.

खुप उशीरा ती घरात परतली, पण फक्त कोमजलेल्या, ओरबाडलेल्या फुला सारखी.

- दुर्गेश विवेक निसळ


सहावी माळ 

प्रत्येक पार्टी, भिशी, कॉन्फ़्रेन्स, पत्रकारपरिषदेत तीचे सोन्याने सजणे सर्वांच्या नजरेत भरायचे.
पण जणू कमी वेळेत बरच काही 'मिळालेल्या' तिला, प्रत्येक व्याभिचार, नकोसा स्पर्श, बलात्कार... यातून झालेल्या जखमा झाकायला एक एक अलंकार हा, तिला पारितोषिका सारखा मिळत अलेला होता , हे सत्य मात्र तिलाच माहीत होते.

- दुर्गेश विवेक निसळ

सातवी माळ

अगदी लालबागच्या राजाची दर्शन रांग नसली तरी त्यात तिस्थट असताना, एकाही देवीचं 'दर्शन' घेयचे सोडायचे नाही, तेच अनेक महिलांचे तर पुरुषांना scan करणे चालु होते.
मूर्ति समोर... “चूकलं माकलं क्षमा करा”, मिटवून घ्या आणि दानपेटित  मात्र वडापाव जेमतेम मिळेल येवढीच रक्कम पडते पण तेव्हड्या वर मात्र देवाने आपल्याला अंबानी बनवावे अश्या मागण्या आणि
परत निघताना घंटी वाजवणार्या पुरुष आणि स्त्रीयांच्या 'शरीरा' कडे नजरा...
- दुर्गेश विवेक निसळ


#Navratri #Dasara #Women #womenism #Marathi #Maharashtra
आठवी माळ 

चांगली ऐटीतली नोकरी तिची आणि तसलसच राहणीमान. प्लेट मधे नसले तरी  तीचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम नेहमी सारखा चालु होता. ती खिन्न, बरीच अस्वस्थ. कार्यक्रम उरकला. रात्री... "मॉम डैड मला तो मूलगा नाही आवडला"
आई "तुला आवडत तरी कोण?"
बाबा " कोण आहे तो तरी सांग एकदाचं"
ती मोठा श्वास घेऊन "Actually ती व्यक्ती तो नाहीं ती आहे" ... बराच वेळ शांतता.
- दुर्गेश विवेक निसळ


शेवटची कथा... 

आई म्हणते "काय रे तू डब्बा खाल्ला नाहीस आणि तू ग...पाणी का पीली नाही ?"

तो म्हणतो "अ ग मम्मा तिथे खायला दिलेलं तेच खाऊन पोट भरलं पण मी बहेर च पाणी नाही पीलो बरका"

ती म्हणते "मंमा अग पिकनिक च्या ठिकाणी गर्ल्स टॉयलेटच  नव्हते...मग मी पाणीच नाही पीले"
आई सुन्न.

- दुर्गेश विवेक निसळ

आता सिमोलंघन.
वाचकहो धन्यवाद !

Thursday, 26 September 2019

Rain rain

ओळख
............................................................................
इतकी  वाट पहायला
लावणाऱ्या पावसाचा
थाट काही वेगळा असतो...
कारण पब्लिकली पडणारा पाऊस
आपल्याला पर्सनली चांगलाच ओळखत असतो
Thousands Stranded In Mumbai After Waterlogging On Tracks Due To Rain

तो काही वेळेवर येऊन,
दिवसभर घाम गाळून
सातच्या आत जाणारा सूर्य नव्हे

सिजन आला की नित्य नियमाने
 सर्दी, खोकला, ताप वाटून जाणारी थंडी नव्हे

या पावसाचा वेगळाच कारभार सारा...
कधीही येतो ऑनलाईन
कधीही ऑफलाईन जातो
कधी डोकावतो दिवाळीत
कधी संक्रांतीत भेटतो.

खोडकर आहे हो मेला...
ठाऊक आहेत त्याला
आपल्या ऑफिसला जायला वेळा
माहित आहेत त्याला कधी आपण
छत्री आणि रेनकोट विसरतो
कारण पब्लिकली पडणारा पाऊस
आपल्याला पर्सनली चांगलाच ओळखत असतो

जेव्हा outdoor, onfield काम निघतात
तेव्हा हा होतो गायब...
आपल्या घरी परताय च्या वेळी
मात्र हा होतो खलनायक...

गाडी पुसायचं कापड
जसं होत नाहीस
तसाच हा अचानक
हरवून बसतो...

भामटा आहे पाऊस करतो भेदभाव
श्रीमंतांच्या घराचा ओलांडत नाही उंबरठा...
आणि गरिबाच घर मात्र सोडतच नाही
ना कसलेच नाद त्याला ना कसलीच हाव...
शेतकऱ्यांच्या जीवाचा मात्र रंगतो डाव

कसाही वागला तरी, आपलाच वाटतो
हा खेळ मात्र त्यालाच जमतो
कारण पब्लिकली पडणारा पाऊस
आपल्याला पर्सनली चांगलाच ओळखत असतो
– दुर्गेश निसळ

(शब्द्यात्री- या कार्यक्रमात 27/7/19 रोजी  सादर केलेली कविता)

Follow us on -
Instagram - @shabdayatri
Facebook - shabdayatri



New Show Coming Soon...

************************************

Thursday, 19 September 2019

Bookaholic

अगर शराब पिने वाले को शराबी कहते है... तो किताबो को पढ़ने वाले पागल को 'किताबी' क्यों नहीं?


किताबियत

जब घर पर पढ़ने खातिर 
किताब न हो... 
तो लगता है जैसे आखिर 
माँ घर पर आयी नहीं...

फिर अनजान चीजों को ढूंढ़कर
बेमंज़िल टहलकर
फिर पढ़ लेता हु.... 
बासी ठंडा अखबार 
सुबह जो थी जल्दी बड़ी... 
पढ़कर अखबार लगता है जैसे
खा लिए नूडल्स मैदे के   
पर पेट अभीभी भरा नहीं

पुरानी जो किताबे 
अब जिनमे मुझे दिलचस्पी रही नहीं 
नहीं बची है कहानी उनमे 
लगती है जैसे खाली 
बोतलें है शराबकी

अब पढ़ने की प्यास कहो 
या कहो भूक शब्दों की... या ये है लत मेरी।
जल्द थमा दो किताबे हाथो में मेरे 
नहीं तो मुझसे कोई बुरा नहीं

चढ़ गयी है रात अब 
मदिरालय है भरे हुए... 
ग्रंथालयो में लगा है ताला
...  पापा की लायब्ररी से 
चुराली एक किताब मैंने 
पढ़लिया मैना अफ़साना
अब शांत लग रहा है... 
माँ की आहट आ रही सुनाई

अब रख देता हूँ किताब 
जहाँ से थी उठाई
किसी अपनों या दुश्मनो को भी 
ये लत ना लगे कभी ...
की कोई उसे कहे... ए किताबी...  ए किताबी!

- दुर्गेश 



Monday, 12 August 2019

Remote

REMOTE

ऑफिस मध्ये असू तेव्हा डब्या खाली पेपर लागतो, हॉस्टेल मध्ये तर जेवताना समोर मोबाईल किंवा लॅपटॉप लागतो आणि घरी जेवत असताना ताटात काहीही असो पण समोर टीव्ही व एका हातात ‘रिमोट’ लागतोच...

यंत्र स्लिम झाली आणि माणसं lazy बॅग, या परिवर्तनाला पुरेशी मदत केली ती एकाच गोष्टीने... माणूस आणि यंत्र या दोघां मध्ये भरपूर बदल झाला पण मधल्या मध्ये ज्याच्यात फारसा बदल झाला नाही, तो दुआ म्हणजे 'Remote'.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी माझ्या हिच्या सोबत बाजारात गेलेलो. अर्थात ती माझा खिसा मोकळा करून माझ्या हातातल्या पिशव्या आणि घरात पसारा वाढवत होती... तेव्हा तिला एका दुकानात ठेवलेला 'रिमोट' आवडला ... पण आधी एखादं यंत्र घेतल्यावर ते यंत्र एका जागी बसून वापरायला, रिमोट मिळत. हे कळल्यावर, तिने काही दिवासांनी मला परत बाजारात नेऊन रिमॊट असलेला उपकरण घेयलाच लावले. गणपती आणावा तसा रिमोट असलेला टीव्ही मिरवत आणला.

‘तो अवाढव्य टीव्ही म्हणजे गणपती आणि रिमोट म्हणजे उंदीर...’ असं ती आमच्या आणि जवळपासच्या मुलांना सांगायची. किती लांबून रिमोट ऑपरेट होतो यावर तिची पि एच डी आहे. सेल लागल्यावर वेड्यासारखी साडी खरेदी आणि गावाला जाताना रिमोट मध्ये सेल उलटेसुलटे करून बचत करणे... हा विचार माझ्या डोक्याच्या Remote area मधला नाही.

अनेकदा हाच रिमोट हिच्या अंगा खाली ऊब घेत लपतो...आणि त्या तिच्या आळसावलेल्या शरीराला पाहून त्या आमच्या स्लिम स्क्रीनच्या टीव्हीला कीव येते. रिमोट सापडला नाही या सबबी खाली ती टीव्ही चालूच ठेवते, बिचारा 4-5 तासाने स्वतःने बंद होतो.

राजकारणात आणि आमच्या घरात पाहुणे आल्यावर मुलाच्या लग्नाची फिल्म दाखवताना... कोणता रिमोट कधी आणि कसा वापरायचा हे फार अवघड प्रकरण आहे. मग कधी ती फिल्म पाहताना, आवाजच मोठा... तर रुखवतातल्या गोष्टी वर नजर ठेवणारा मामा, बुके पळवणारा आचारी... नारळ शबनम मध्ये टाकणारे पेन्शनर काका, त्या स्क्रीन वर गारठतात, तर कधी कधी... अनोळखी पाहुणे बचावाचा जेवताना वेग धरतात... सगळंच कॉमेडी होऊन बसतं.

आमच्या मुलांनी इतका मार नसेल खाल्ला तेवढा या रिमोट ने खाल्ला असेल... याला हातावर आपटल्या शिवाय तो भानावरच येत नाही. प्रत्येकाच्या घरात एका पिशवीत इतर अनेक पिशव्या भरून दाराच्या कडीला टांगल्या जातात... तसेच आता एकाच रिमोट मध्ये सगळे रिमोट एकत्र करावे, कारण त्यांचे सेलही आता स्वस्त राहिले नाहीयेत. हाताबाहेरच्या गोष्टी यंत्रणात ठेवण्याच्या हेतूने तयार झालेल्या remote ने मात्र मोबाईल च स्वरूप घेऊन... सारं जग मुठीत आणलं पण कधी कधी असं वाटत की आपणच आता हाताबाहेर जाऊन बसलो आहोत.

अचानक एकदा हा रिमोट खूप शोधल्यावर आमच्या सोफाच्या फटीत सापडला... त्याची छाती दाबून त्याला जागं करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो गेला... काही दिवस मग बिना रिमोट चे गेले, पण नातवाने मोबाईलचा लळा लावला. सगळ्या सिरीयल त्यावर दिसतात आणि मान देखील वर करावी लागत नाहीत. आता तर दिवस दिवस वायफायच्या अदृश्य लक्षमन रेषेत ती आणि मी अजगरासारखे पडून असतो... मुठीत नाजूक जग सांभाळत... मोबाईल काही रिमोट प्रमाणे धडधडकट नाही.

Sunday, 21 April 2019

Happy World Book Day

On account of World Book Day...  

Screen saver

It was long time ago that
I have never  slept without watching digital screen,
It was long time ago that
I have slept while talking, staring stars or even risen up with morning sun shine.

Aren’t we a CCTV  at day time
& owl at a time of sleep.
So many screens,
Which were king of one day story.
Which is now a history,
Torned jeans are not cool now
They give abnormal tan on my knee.

Let me love myself, oh dear
Let me fight my anxiety…
Its too boring to pretend in each post
& to go to cry on some unknown coast.   

Lets not sleep with screens now
Lets have some humans besides too

Or why not open bookshelves
Try to read a page or few
And try to help yourselves… 


Happy world Book Day...   


Lets Not be one get possessive about  screensaver
and be a Book lover instead.




Thursday, 7 February 2019

#Happy_Sunday



मला जगात 'सिद्दीकी' आडनावाचे दोनच व्यक्ती आवडतात, एक अर्थात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दुसरा म्हणजे लेखक Tanveer Siddiqui

"आईल्ला रुश्या हा तनवीर काय रसायन आहे रे? इतक स्वच्छ, सुंदर, निरागस, नितळ कोणी कसं कोणी लिहू शकतं?" असं मी एकदा Rushikesh Neeta Ramesh Wadke ला बोललो होतो. 
तर अशी माझ्या मनात ख्याती असलेला हा लेखक, एके रविवारी सकाळी  "हॅलो, मी तनवीर सिद्दिकी बोलतोय, तुम्ही दुर्गेश ना?" असं बोलून माझ्या sunday चा #Happy_Sunday करणारा आणि एकदम आइसपाइस बोलून या फेसबुक सेलिब्रेटी लेखकाला मी सर वरून कधी दादा म्हणू लागलो कळलं नाही... अशी बोलण्याची किमया असलेला शब्दांचा जादूगर माझ्याशी बोलत होता.

तर निमित्त म्हणजे 14 फेब्रुवारीला ' एक टप्पा आउट' हे दादाच पुस्तक वाचकांच्या वारीला येत आहे "या पुस्तकाचा आणि 'valentinesच्या प्रेमाचा' काही संबंध नाही" हे बोलताना तनवीर दादा चा गंभीर पण खट्याळ आवाज मला अजुनही ऐकू येतोय...
"हे पुस्तक ना दुर्गेश मी यूथ साठी लिहिलय, ते यूथ जे खुप टैलेंटेड आहे, पण कुठेतरी कमी पडते आहे, बहुदा मोठ्या शहरात असून देखील स्वता शहरी नाहिये, जे वर्चुअल जगाला आजुन परिचित झालेले नाहियेत, तर त्यांना पुस्तकाची आवड लावून या युगातील स्पर्धेला सामोरे जाण्याची इच्छा देणारं हे पुस्तक असणार आहे". दादा च्या बोलण्यातून त्याचा प्रामाणिक पणा ओसंडून वाहत होता. 

 'एक टप्पा आउट' या तनवीर दादाच्या येत्या पुस्तकाचे, नवाज्जुद्दीन चा चित्रपट आणि तनवीर दादाच्या पोस्ट, पुस्तक सहसा चुकवत नाहीत असा अस्सल जाणता रसिक मित्र वर्तुळ मला लाभला आहे... याचा मला अभिमान आहे.

दादाचे 1 लाइनर, 2-लाइनर किंवा मोठ्या फेसबुक posts देखील इतक्या जबरदस्त असतात तर हे पुस्तक किती भन्नाट असेल याची कल्पना करता येण अवघड आहे. दादा ने कॉल वर हे पुस्तकवर्णन करताना कुठेही स्वता चे कौतुक केले नाही, हे खुप कौतुकास्पद आहे. 

तुमच्या मनात येत असेल की 'हा' म्हणजे मी, या पुस्तकाचे प्रोमोशन करतोय, यांच collabration झालेलं दिसतय, तर असं काहीच नाही, आम्ही 'कला'ब्रेशन केलय ज्याचं आम्ही सेलिब्रेशन करतोय... 

अहमदनगर मधील वाचक प्रेमींना हे पुस्तक विकत घेयचे असेल तर 14 फेब्रुवारी नंतर मला संपर्क करा 9049434370 या क्रमांकावर... अतिशय कमी किमतीत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. 
वाचकांनी याचा लाभ घ्यावा. 

टिप- मी देखील हे पुस्तक विकत घेणार आहे आणि कोणासोबत share करणार नाही आहे.
पुस्तका बाबत मी जिद्दी आहे.


#Happy_Reading

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...