Saturday, 3 November 2018

दिवाळी डंक -२०१८

ज्याला क्षण साजरा करायला अवडत त्याला सण खोटे वाटतात. एकतर मिश्किल माणूस मुश्किलिने सापडतो, खट्याळ स्वभावाचा माणूस घड्याळात अडकलेला असतो, अनेक मनुष्य प्राणी वर्किंग अव्हर्स मधे chat करायला फ्री असतात आणि वीकेंड ला बिज़ी. हे अस का असेल?

आपण ज्या जातीत जन्माला आलों उदाहरणार्थ मुस्लिम , पण त्यासाठी बूंदी भर देखिल कर्तुत्व कोणाचच नाही. सुट्ट्या मिळतात म्हणून धर्म साजरा केला जातोय नाहीतर धर्मा ने गाजरा शिवाय दिलेच काय आहे? तर फक्त एक अदृश्य लेबल.  ते लेबल प्रत्येकाच्या दृष्टिकोणात दिसते, ऐकू येते, बोलले जाते, रुजवले जाते, मिरवले जाते... तरीही उरते ते गाजरच आणि गाजरा चा होतो, हलवा.

धर्म जर गाजर मानले तर माझाच हलवा श्रेष्ठ, चविष्ट... मग खा किंवा वाटा भांडता का? नाही म्हणजे कसय मस्त पुस्तकांच्या डोंगरातून कथा, कविता यात मनसोक्त भिजायचे, डुमबायचे, अंग पुसायचे,  व्यवहार करायचे, जेवायचे,ज़ोपायचे वैगरे पण मग येतात कुरान, बायबल, भगवद्गीता आणि मग येतो टीव्ही. धर्मग्रंथ ही व्यक्तिमत्व वृद्धिंगत करण्यासाठी आत्मसात करावी, एवढच. टीव्ही मनोरंजन व्हावे इतकाच पहावा, एवढच. होतय मात्र सगळं वेगळं. प्रमाण म्हणून काही नाही. अधुन  मधून आठ मित्र चार दू चाकी वाहनावर किंवा 9 मित्र 3 दु चाकी वाहना वरुन रस्त्याने चालले असले की बोंबलत जातात, का?  याला उत्तर नाही. ही बोंबलत जाणारी मूल ओरडत असतात अनेकांना हा आवाज ऐकून भीती वाटते, का? यालाही उत्तर नाही. बहुदा हीच स्वतंत्रा असावी, बोंबलत जाणे.

इतर सगळ्यांवरचे नियम शिथिल करुन फक्त राजकारणी आणि धर्म प्रसारकांवर इतके कडक नियम लादले पाहिजेत की... भ्रष्टाचार सोडाच. 24*7 त्यांच्यावर कैमरे, टेप केलेले कॉल्स, रस्त्यावर मोठ्या फ्लेक्स वर त्या भागातील मुखिया चा पत्ता, त्याचे टाइम टेबल... इनकम, गाड्या, गाड्यांचा नंबर... आणि सगळ्यावर नजर ठेवायला कॉम्प्यूटर. माणूस देवा पेक्षा कॉम्प्यूटर ला घबरतो. तशी दूसरी बाजु ही देखील आहे की  zee मराठी वरील तुला पाहते रे मधल्या ईशा चे बाबा तिला लाडाने काय म्हणतात हे सर्वांना पाठ असते पण वर्षों वर्षे एकाच ठिकाणी राहत असलो तरी आपला वार्ड नंबर काही पाठ नसतो. 

भारत हे एक मोठे हॉस्पिटल आहे... राज्य, जिल्हा, तालुका, महानगर पालिका, पालिका, पंचायत आणि वैगरे काही असल्यास... शेवट मात्र वार्ड. आपण भारत या हॉस्पिटलच्या ह्या ह्या वार्ड मधे त्रस्त नागरिक म्हणून जगत आहोत. राजकरण्यांना शिव्या, भारताला नाव ठेवणे आणि तुमचा वार्ड नंबर काय असे विचारले की प्रश्न चिन्ह. 

"नाही रे अस नाही". "हो स्टेटस स्टोरी मधे पाहिलं की तुझ्या". "मला महितीये सगळ. तूला काही कळत नाही". हे असे वाक्य ना संवादांचा मर्डर करत आहेत. तोंडाच्या मसल्स ला पण द्या की जरा व्यायाम... करा की जरा बिनबुडाची बडबड... बघा की उगाच हसुन... कुठेही पैसे न देता. 

एकतर आयुष्य म्हणजे, रॅक मधे ठेवलेले डबे. आपल्याला तिखट लागले म्हणून लाडू शोधावा तर लसणाची शेव सापडते. मटकीच्या भाजी वर  बारीक शेव टाकावी म्हणले तर सुपरीच काय सापडते, नको त्या वेळी लाडु, करंज्या, अनारसे कुठे जातात? अगदी सापडलेच तर लाडु बोटांत धरुन तिला लाडाने भरवावा म्हणून तिच्या ओठांपर्यन्त न्यावा तर त्याचा भुगाच काय होतो. 

माणूस कश्या चाही गुलाम होऊ शकतो. एखादी आठवण, प्रेम, पैसा, पद, pubg कश्याचाही. मनातल्या विचारांना ना.... पार्क करता आलं पाहिजे होत किंवा घरात मांजरीच्या पिलांची संख्या वाढली की जंगलात सोडून देत तसच जर या विचारांना लिहून ठेवायचे. व्यक्त व्हायच. विचार मांडले नाहीत तर त्या सारखे जड काहीच नसावे. तुम्ही हसले नाहीत तर इस्त्री सारखे दिसता. पडदे देखील बगडतात मोकळी हवा सुटली की, आपणच आपले गुलाम होतो, इतरांचे होतो, संसारचे होतो, सवयी, व्यसन आणि काय नाही? 

"अड्यात नाही तर परसात कसे येणार?" याला आता अपडेट करुन "मनात नाही तर पुतळ्यात कसे येणार?" असे म्हंटले पाहिजे. भावनांचा खेळ आहे सारा हे पुतळे माणसांच्या सोबत खेळतात . परंपरे पेक्षा नियम पाळण्याला महत्त्व मिळाले की कल्याण होईल. मातीचा किल्ला बांधायचा आणि नंतर फोडायचा त्यापेक्षा पुस्तकांचा किल्ला बांधायचा, वाचायचा, प्रगल्भ व्हयचं, वाटायचा. मग का नाहीं प्रत्येक क्षण सणच असेल...






Tuesday, 2 October 2018

पु.* चि.* मा*



पु.
जखम भरली जखम भरली असे वाटताच मस्त अंघोळ केली जाते आणि तिथेच घोळ होतो. जखमेचा भाग टम्म फुगतो आणि त्यावर वजन पडल्यास ठणकतो. बलुतं वाचताना असच वाटलं.जिवंत वस्त्या, कसबे, खेडी, गावं यांचे लचके शहरांनी गिधाड होऊन मोडले. रोजगार मिळवण्यासाठी ओसंडून चाललेली शहरे एका बाजूला तर गावांत निर्माण झालेली निर्मनुष्यता, आहेत तेव्हड्या माणसां मध्ये असलेले हेवे दावे, दारिद्रय, अशिक्षितपणा, अविश्वास...आणि पाणी नसलेली शेतं, अंगाला आलेला घाम व माळरानावरचं मोकळं वारं. या सगळ्या मध्ये जखमा आहेत, जखमा भरत आल्या असल्या तरी, अविचारी माणसात विकृतींचा 'पु' व्हायला वेळ लागत नाही. शेतकरी, गरीबी, शिक्षण, गरजा, भूक, वासना, व्यसन याविषयी ४० वर्षां आधी दया पवार यांनी लिहून ठेवले आहे आणि अजूनही ते लागू आहे. बलुतं हे आत्मकथन आहे, पण असे काही लिहिले गेले आहे की मी त्याला 'अत्माकथन' म्हणेन. माणसानेच माणसाला केलेल्या जखमा माणूसच माणुसकीने ठीक करू शकतो, असे मलम कळत न कळत तुम्हाला, मला, आपल्याला असलेल्या जखमांवर हे पुस्तक लाऊन जाते. हिंदी, जर्मन, फ्रेंच, इटालियन... या चार भाषेत हा मराठी 'पुस्तकपट' अनुवादित झाला आहे.
..............................................................................................................
चि.
खोली, हा बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मंडळींसाठी हृदयात खूप खोलवर जाऊन बसलेला विषय असतो. अश्या भाडेतत्वावर राहण्यार्या मुला मुलींना या साखर लावलेल्या जमान्यात पेयिंग गेस्ट असे आता म्हंटले जाते, म्हणजे आधी व्यवहार आणि नंतर नाते असो. खोलीला बायको प्रमाणे जपावे लागते आणि खोली मालकाला सासर्या प्रमाणे. एका खोलीत आधीच आपण दोन असताना अजून दोन गरुजू मित्र 'एडजेस्ट' करायचे आणि कधीतरी रात्री टांगा पलटी होऊन आल्यावर दुसर्या दिवशी किंवा त्याच रात्री मालका कडून "खोली खाली करा" असे अजूनही ऐकू येते. विद्यार्थ्यांना अभ्यास, नोकरी, स्थैर्य, प्रेम, लग्न स्वताचे घर असे प्रश्न  काही कमी असतात का? तरीही असा काहीतरी वैय्यादपणा त्यांना कायम करावा वाटतो. काहीही असले तरी पुण्यातील हा खोलीचा मुद्दा, खोली मालकाचा खवचट पणा, खोलीत राहणारी गावरान इरसाल पोर... यांचा 'जबरदस्त विनोदी टायमिंग' असलेला हा चित्रपट खरोखर ३० वर्षांपूर्वी बनवला गेलाय, असे जरा कमीच वाटते. अगदी ३-४ वर्षा पूर्वी मी देखील बालगंधर्व समोरून असाच, खोलीच्या शोधात चाललो होतो, असे अनुभव अनेकांना आहेत. माझ्यावरच ही कथा लिहिली आहे आणि नंतर मनोरंजनासाठी काल्पनिक गोष्टी त्यात ओतल्या आहेत असे... पुण्यात शिकणाऱ्या अनेक  मुला मुलींना अचानक डोक्यावरून छप्पर गायब झाल्यावर वाटते. आता फेबु ग्रुप्स आहेत, साईट्स आहेत, एजेंट आहेत... पण अशीही बनवा बनवी... कायम राहणार आहे.
........................................................................................
मा.
बलुतं आणि अशी ही बनवा बनवी या  नंतर हॉलीवूडच्या फ्रेंड्स या विषयी थोडे लिहावे वाटते. आधीही मी याविषयी ब्लॉगवर नुकतेच लिहिले आहे. न्यू-योर्क शहर, त्यात असलेले मध्य विशीतले ६ अतरंगी मित्र, ३ मुली आणि ३ मुलं. दर दिड ते दोन वाक्या नंतर प्रेक्षकांना हसवण्याचे सामर्थ्य असणारे संवाद, २४ वर्षां आधी लिहिले गेले आहेत असे मला तरी वाटत नाही. माझे मित्र असेच आहेत. माझा मोठा भाऊ असाच आहे. माझी बहीण देखील अशीच वागते. मी असाच आहे. कायम असेच वाटायला लावणारी ही मालिका आहे. देश बदलला म्हणून विशेष काही बदलते असे मला वाटत नाही. संस्कृती बदलते म्हणून समस्या बदलत नाहीत, फक्त त्या कडे पाहण्याचा स्वभावसंस्कार वेगळा असतो. बलुतं मध्ये प्रेम झाल्यास लपवून ते ठेवणे हे भाग आहे. अशीही बनवा बनवी मध्ये प्रेमासाठी काहीपण तर फ्रेंड्स मध्ये प्रेम म्हणजे... नदीतून पाईपात, मग हौदात, मग टाकीत, मग नळात, मग पोटात, मग संडासात आणि मग परत नदीत. असा हा प्रवास मैत्री, प्रेम, स्वमग्नता आणि वासना याविषयी विनोदी शैलीने साकारले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
ता.क-
तीन तीग्डा काम तगडा, असा मी डोळस आहे.
हे तीन, म्हणजे पुस्तक, चित्रपट आणि मालिका मला विलक्षण वास्तवादी, विनोदी व विषारी वाटतात. सप्टेंबर २०१८ म्हणजे या तिघांचा 'वाढमहिना', बलुतं ४०, अशीही बनवा बनवी ३० तर फ्रेंड्स २४ वर्षांचे झाले आहेत. या अजरामर कलाकृतींना साकारणाऱ्या कलावंतांना , स्वीकारणाऱ्या प्रेक्षकांना आणि यातीन्ही दृस्तीकोनांचा आस्वादचं न घेतलेल्या अश्यांना देखील सुभेच्छा.  

बलुतं हे दुखात वाहून नेणारे वारे आहे, जिथे शेवटी सुखच सापडते.
अशी ही बनवा बनवी हे परिस्थितीच्या विरोधात जायला शिकवणारा आहे.
फ्रेंड्स मात्र एक असे वारे आहे की मैत्री घट्ट असली की परिस्थितीने कितीही वादळे आणले तरी टकून राहणारी आहे.

पु- पुस्तक
चि- चित्रपट
मा- मालिका
..............................................................................................     

Friday, 21 September 2018

फ्रिज है हमारा...

बाहर की गर्मी घर में घुसपेठ कर रही थी। 
दोपहर का समय था, गली जैसे सुस्थ थी। 

घरों की दीवारें मुझे काफ़ी लुभाती है। डिग्रियाँ, चित्रकलाए, मरे हुए लोगों की तस्वीरें, भगवान और महात्माओं की तस्वीरें, इन इतनीसारी असंबंध चीज़ों की फ़्रेमो को एकसाथ एकही दीवार लटकता देख अलगसा अहसास होता है।
किसी दुकान में आया हूँ जैसे, पर कुछ ख़रीद नहीं सकता। 

घर में बस एक बूढ़ा रहता है, एक हादसा हुआ और बाक़ी तो सब तस्वीरों में जाकर बस गये। घर की काफ़ी चीज़ों की उम्र बूढ़े बाबा के आसपास ही है। हमेशा एक अच्छी चलने लगती है तो दूसरी परेशान करने लगती है। घरवालों की याद आती है तो रिश्तेदार या दोस्त आता है बूढ़े की मरम्मद करने। मशीन अगर तकलीफ़ दे तो बाबूलाल को ये बूढ़ा बुला लाता है। 

इस बार घर में फ्रिज ने 'काम बंद आंदोलन' छेड़ा है। घर में कम सिखा हुआ बाबूलाल फ्रिज ठीक कर रहा है और बूढ़ा वही पर किचेन में बैठकर बकेती कर रहा है। 
-मेरे देश और मेरे फ़्रीज़ में जैसे मुक़ाबला छिड़ा है के कौन ज़्यादा बार बंद पड़ेगा। 
-तो बापसाहब आगे कौन है
-आगे तो मेरा देश है, इस साल मेरे फ्रिज, टिवी और स्कूटर के आगे निकल गया है। 
-बेच क्यूँ नहीं देते? ये चीज़ें अब पुरानी हो चुकी है। 
-पुराना और बूढ़ा तो में भी हो गया हूँ बे... 
-आपको कोई नहीं ख़रीदेगा जी... 
-भोसडिके अपना काम कर... 
-बापसाहब देखो गाली देने का काम नहीं, अभी कामगारों के नेताओ को बुलाकर आपको लटका दूँगा। 
-हाँ भाई क्यूँ नहीं, ककड़ी खाएगा? क्या ये भी उन्हें पुछकर करता है?... साला यहाँ यही तो मांजरा है जो जितना ज़्यादा सिखा हुआ होता है वो उतना ही शांत होकर सहता रहता है... नमक ले।
-हाँ, पर चलो सॉरी और ककड़ी के लिए थैंक यूँ। 
-हाँ अब तुम मेरे दोस्त तो नहीं, तो ये कह सकते हो। 
-आप कितने सिखे हो
-काफ़ी, बोहोत ज़्यादा सह सकता हूँ इतना पढ़ा लिखा हूँ। इलेक्ट्रिशियनही बन जाता तो अच्छा होता... 
-बापसाहब आप हो पैसे वाले बाबू, तो तुम्हें ग़रीब होने की चाह है, हम जैसे ग़रीबों का निवाला हाथों से छिन लिया जाता है तो एक पल कुछ भी सेहनेकी फ़ितरत नहीं रहती। 
-और ककड़ी चाहिए
-नहीं, आप फ्रिज में क्या जलता कोयला रखते हो? पूरा जल गया है कंप्रेसर... 
-बस ककड़ी जैसी सब्ज़ियाँ रखता हूँ... 
-ठीक है ठीक है। 
-यार बाबूलाल तुम कोई नक़ाब नहीं पहनते, अच्छा लगता है। 
-ऐसा है के में ग़रीब हूँ बेरोज़गार नहीं इसलिए हर वक़्त फटा हुआही हूँ। या तो फिर नक़ाब कब का उतर गया होगा नहीं तो वो नक़ाब ही मेरा चहरा है।

फ़्रीज़ तो चलो दुरुस्त हो गया। काम होते ही तोलमोल हुआ और एक ग़रीब अपना स्वाभिमान लेकर चला गया और एक अमीर अपनी तोंद जैसी अक़्ल को लेकर बंद-चालु-बंद होता हुए देश में सहता रहा। 

मेरे, तुम्हारे, हम सबके घरका फ्रिज इस साल अपने देश से कमबार बंद हुआ होगा। ज़ाहिर है दर्द, तकलीफ़, नुक़सान सभी को हुआ है... अपना देश सच में एक फ्रिज है, फ़्रीज़र माने कश्मीर बेहद ठंडा, सबसे नीचे कन्याकुमारी काफ़ी गरम, ड़ाए और बायें गुज़रात और कोलकाता जिनके सिवा दिन नहीं गुजर सकेगा... बस ये धर्म, राजकारन और बेरोज़गारी का कोयला, आग और रोटी बनकर ये फ़्रीज़ तबाह हो रहा है।

कैसे था के पहले हाथ, पाव, सिर दुखा करता था मलम लगातेही सुकून मिलता था... अब भावनाएँ दुखा करती है और दवा ही नहीं हैइसपर। Thank you और sorry की गुंजाईश है ही नहीं, मगर, क्या हम दोस्त है? वैसे तो देश हमारा फ्रिज है मगर oven सा झुलस रहा है अंदरही अंदर।

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...