बाहुली
लहानपणी म्हणजे शाळेत असताना आमचे एक 'शिक्षा'क होते. हो! शिक्षाक कारण ते काय शिकवायचे हे मला खडु भर देखील आठवत नाही. आठवतात त्या त्यांनी दिलेल्या शिक्षाच. एक म्हणजे ऐन थंडीत उजव्या कानाची बाजू लोखंडी बाकावर टेकवायची आणि तसच तासभर बसायचे. दूसरी म्हणजे ते ज्या विद्यार्थ्यावर खडू फेकून मारतील त्या माकडाने बरोब्बर आधी जो वाचत असेल त्याच्या पुढच्या शब्दा पासून सुरुवात करायची ते चुकले तर... त्यांनी मारलेले खडु झेलायचे नाहीतर हुकवायचे. तीसरी शिक्षा म्हणजे मार खायचा. गार बेंच, चॉक चा गोळीबार आणि छडी किंवा हाताचा मार... टाळण्या साठी आम्ही चुकाच केल्या नाहीत.
फेसबुक वर अल्बर्टरावांच्या पोस्ट वाचुन ऊर्जित झालेलो मी नाही... मी घातलेल्या विज्ञानाच्या चष्म्यामुळे माझा दृष्टिकोण बदलला. मी अभ्यास न करता पास होईल... ही शिक्षणातली अंधश्रद्धा आहे. मी वाचेल तरच मी वाचेल ही माझी श्रद्धा आहे मग कॉपी हे कर्मकांड आहे असे मला वाटते. शाळेत मार आणि घरातल्या शाळेत मोठ्यांचे वटारलेले डोळे... आत्ता पर्यंत मी वयाने मोठ्या असलेल्या मनुष्य प्राण्याच्या पाया पडत आलो, का तर फक्त मला पैसे मिळतील म्हणून. पैसे मिळतात म्हणून आपण काहीही करतो...मी देखील त्याला अपवाद नाही.
आता वाटते की शाळेत प्रश्न न-विचारणे आणि चुका नकरता मार्क मिळवणे हा मोठा गुन्हाच घडला. प्रत्येक जन वेगळा आहे हे माहीत असून सर्वांना एकच शिक्षण?... प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात...असतील... त्यातली एक बाजु द्या त्यातला तुम्हाला परवडेल तितका तरी भाग विज्ञानाला द्या. लहान मुलांच्या प्रश्नांना प्रोत्साहन द्या... हाच विज्ञानवाद आहे. जर तुम्ही प्रश्नच विचारु देत नसाल तर तुम्ही त्यांना परंपरेत ढकलत आहात. सगळे लहाने मग तुमच्याच विचारांच्या बाहुल्या बनतात. बाहुल्या कश्या आपल्या लाडक्या असतात कारण आपण सांगु ते त्या ऐकतात. जर कोणी प्रश्न विचारत आहे म्हणजे तर तो जिवंत आहे, नाहीतर मग शनिवारी तुमच्या गाडीला जेव्हा लिंबु मिर्ची लावली जाते तेव्हा त्यातल्या बाहुलित ते दिसतात.
समजा
समजा मला जुळ्या मुली आहेत. एकीचे नाव श्रद्धा आहे आणि दुसरीचे आहे अंधश्रद्धा. तर समाजाला म्हणजे मी सोडून सर्वांना असे वाटते की मला माझ्या दुसऱ्या मुलीवर प्रेमच नाहीये म्हणून!... मी तिचे नाव अंधश्रद्धा असे ठेवले. त्यामुळे सर्वांचा तिच्यावर जीव जडला, तिचे लाड झाले. ती सर्वांना आपलीशी वाटू लागली.
श्रद्धा मात्र तिच्या वया पेक्षा प्रगल्भ होती. निरागस, संयमी आणि चिकित्सक होती... त्यामुळे तिच्या नादी कोण लागणार म्हणून तिच्याशी खेळायला, बोलायला, आपलीशी करायला कोणीच नव्हते. बाकी सगळे अंधश्रद्धे भोवती गराडा घालत. त्यामुळे ती डामरट झाली, गरज संपून हाव सुरु झाली.
तिच्यात कर्मकांड आले. बळी, कुर्बानी, जादू-टोना आला आणि काळी शक्ती म्हणून ती प्रसिद्ध झाली. तिकडे श्रद्धा जितकी तर्कशुद्ध होत चालली होती तितकीच... समाजा मध्ये बावळट ठरत होती. भक्ताने तिला विचारलेल्या प्रश्नाचे खूप वेळा नंतर ती अस्पष्ट पणे उत्तर देत होती पण गम्मत म्हणजे त्यावर जरा विचार केलं की ते उत्तर खरे होते असे काही भक्तांना वाटायचे. श्रद्धा लोकांच्या मनात इतकी रुजली... की तिच्या आधारा शिवाय भीती वाटायला लागली.
आता माझ्या दोन्ही मुली "मोठ्या" झाल्या आहेत... त्या मला देखील विचारात नाहीत... समाज माझ्या मुलींच्या बाबतीत सांगायला, प्रश्न विचारायला, खोड्या, धटिंगबाजी, त्यांची प्रगती, त्यांचे समाजावरचे वर्चस्व... या सगळ्याचे वर्णन करायला अग्रेसर आहे... पण त्या दोघी, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यांच्यात इतका कमी फरक राहिलाय ना... की... कोणी काही सांगायला लागले तर दोघीं पैकी तुम्ही नेमकं कोणाविषयी बोलताय हे समजतच नाही...असेच समजा.