Writers Mood - Crazy
योद्धा की बुद्धा ?
(A fighter or a Happy man ?)
जीभेची तलवार आणि शब्दांच्या धारीने ... जो समोर येईल ... जो अडवा जाईल ... त्या सर्वांना संपवून पुढे जायचं ? की तोंडाचा दरवाजा बंद ठेवुन ... ओठांची चंद्रकोर करून ...हसून जगाला आपलंसं करावं ? …
तुम्ही कोणाच्या आनंदाचे कारण असाल … तर कायम त्यांच्या आठवणीत रहाल … पण रागाचे कारण असाल … तर डोक्यात रहाल त्यांच्या हृदया मध्ये तुम्हाला कधीच जागा मिळणार नाही ! जिथे योद्ध्याला लाल रक्त आवडतं … तिथे बुद्धा ला लाल गुलाब …जरी परस्पर विरोधी तरी … स्थैर्य मिळवणं हाच एक हेतू दोघांचाही ! पण आजकाल सेनापती होण्याच्या स्पर्धेत सैनिक' एकमेकांचेच पाय खेचत आहेत … आणि कोणी प्रेमाने ,आनंदाने ,हास्याने … जगाला शांततेत पुढे नेऊ म्हणतोय तर …हसवणारा म्हणजे फसवणारा … एका हास्य मागे हजारो रहस्य लपलेले असतात … याच अविचारी विचाराने त्यांची टर काढुन , ते बावळट ठरवले जात आहेत … !
सध्या योद्धा फक्त इतिहासाच्या पानात सापडतो … पण बुद्धा माणसांच्या मनात अजूनही सापडतो … दोघांची प्रवासात … योध्या च्या आयुष्यात कुठेतरी रक्त असेल तर बुद्ध कुठेतरी सगळ्यातून विरक्त असेल … योध्या च्या आयुष्यात सक्ती असेल तर बुद्धा कडे आसक्ती असेल … पण तो अश्रू … हो ….
आश्रूच ! … सुखचा असो की दुख्खा च्या डोंगराची …उतरताना आणी चढताना आश्रुंचीच पाऊल वाट आहे ! पोट दुखे पर्यंत हसलो तरी … डोळ्यातून पाणी येतं आणि साधी टोकदार टाचणी जरी टोचली तर … बोटातून निघणार्या रक्ता प्रमाणे … डोळ्यातून आश्रु वाहू लागतो ! त्यात काही भेदभाव नाही !
आता एका साध्या हसमुख पैलवानाने कोणाचा अनुयायी व्हावं ? सध्या जे चाललाय त्यावर राग येतोय … म्हणून त्याने चिडून उठून … योद्धा व्हावं ... की सध्या जे चाललाय त्यावर हसू येतंय म्हणून बुद्धा व्हावं ?
- Freedom Writer
Amazing! Good start! :)
ReplyDeleteAmazing eloquent writing. Keep it up!👌
ReplyDeleteThank you aditi and abhijeet !
ReplyDeleteAmazing! Keep On Writing ;-)
ReplyDeleteThank you ... Keep on reading ... Its much more to come
Delete@kaustubh saner. Thank you ... Keep following posts ... Its much more to come
ReplyDeleteAmazing wordings!!! Great Durgesh!!!
ReplyDeleteThank you very much
DeleteKadak durgya..
ReplyDeleteThank you very much shete
Delete