कुछ मोहल्ले ,
मेहेखानो से होते है
जो हर प्यास बुझाते है ...
मनपा कडून सरळ शनिवार वाड्या कडे जाताना ... भूतकाळा चा वर्तमानाशी बराच संबंध येतो ...रुग्णाला भेटायला त्याचे नातेवाईक आलेले आहेत अश्या थाटात ... अवाढव्य पसरलेल्या म्हाताऱ्या शनिवार वाड्या कडे ...सगळ्या नवीन उंच इमारती दाटी करून पाहताना दिसतात ... लोकांच्या आणि इमारतींच्या गर्दीतून वाट काढत ... शहराची वाहतूक वाहत असते ... आणि पुढे लागतो तो आप्पा बळवंत चौक !
आप्पा बळवंत चौक म्हणजेच आता चा ... A B C किंवा अ ब क चौक ... विद्ये च्या माहेर घराची ही अधिकृत बाजारपेठ ... विद्यार्थी , वाचक यांसाठी नवीन ,जुन्या पुस्तकांनी भरलेलं आणि तत्सम साहित्यानि गजबजलेलं ... ज्ञान इथे रस्त्यावर भाव करून विकत घेता येतं ... एखादं महागडं पुस्तक काचेतून आपल्या कडे तुच्छ नजरेने पाहताना दिसत आसत ... किंवा विक्रेत्यान कडून कमीत कमी शब्दात फुकट च ज्ञान बरच मिळत , अश्या इथे , एक कागद दुसऱ्या कागदाला विकत घेतो .
दुचाकी असेल तर न्यू पुना बेकरी जवळ गाडी लावावी ...( चार चाकी असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्या) ... रस्ता नीट पार करा ... जोगेश्वरी च मंदिर लागेल ... लगेच डावी कडे वळून , वेळ असल्यास आतून किंवा बाहेरूनच पुण्याच्या लाडक्या दगडूशेठ गणपती च दर्शन घ्या ... मूर्ती हस्ते .. असं मला वाटतं ... मूर्ती आशीर्वाद देते ... असं सर्वांना वाटतं ... पण ती मूर्ती फक्त माती ने बनलेली आणि सोन्याने सजवलेली फक्त आणि फक्त एक मूर्ती आहे हे मला माहित आहे ... ! त्याच्याच जवळ बालाजी च हि मंदिर आहे ... अगदी तसच ... श्रीमंत मूर्ती तीही मला बघुन हसत असते बास ! बहुदा माझ्या दुबळे पनावर हसत असावे !असो ...
देव श्रीमंत झाला की गरिबांची रांग तिथे वाढते ... म्हणून मंदिरच मंदिरं असलेल्या ह्या ठिकाणी ...भिकारी आहेत ... फसवणारे आहेत ... अधून मधून कोणाच तरी पाकीट चोरणारा चोर ... 'त्याच असून नसलेलं' अस्तित्व दाखवतो ... एक पोलीस स्टेशन आहे ... जे बहुदा पूर्ण पणे देवावर सगळा भार टाकून मोकळा झालेलं आहे ... त्यालाच लागून ... माथाडी कामगारांची जागा आहे कारण , करोडोंचा व्यवहार होतात तिथे हातावर पोट असणारे लोकं असतातच, त्यांच्याशिवाय काही हलत नाही ...आणि तिथेच ट्राफिक पोलिसांचा मिटवामिटवी चा व्यवहार चालतो !
गाड्यांचा आवाज , विक्रेत्यांची आरोळी आणि अरे रावी ... शिट्या ... हाका.. मंदिरातल्या आरत्या ... घंटे चा नाद ... शिव्या शाप ... बरच काही शांत पणे ... कानावर पडत राहत ...पण आपण ऐकून न ऐकल्यासारखा करावं … परवडत असेल तर काका हलवाई कडे जाऊन काही खाऊ शकता … नाहीतर त्यालाच लागून … फुलां चे दुकानं आहेत … त्या फुलांचा वास घेऊन पोट भरून घ्यावं . संसारात लागणाऱ्या सर्व गोष्टी तुळशी बागेतुन स्वस्तात घेयला काही हरकत नाही … बायकांना विकत घेयच असतं ते मिळतं … पुरुषांना हवं ते सगळ बघयला मिळतं !
बाजार म्हणाल की तिथे सगळ मिळतं … भर चौकातल्या दत्त मंदिरात फुलं वाहावी आणि त्या फुलांच्या दरवळी चा पाठलाग केला तरी … भक्ती मंदिरातून वासनेच्या जाळ्यात येउन अडकाल … इथून देह विक्री साठी प्रसिद्ध असलेला बुधवार पेठ सुरु होतो … हजारो दरिद्री लक्ष्म्या डोक्यात गजरा माळून , पावडर लाली करून … उभ्या असतात … हसत असतात … जसं ती दगडूशेठची श्रीमंत मूर्ती हसत असते … संध्याकाळी ही वैश्य वस्ती चमकू लागते … तेव्हा तुळशी समोर दिवा लावावा तसं ,अगदी मधोमध असलेली पोलिस चौकी चमकू लागते . तरीही मला राग आणि आकर्षण दोन्ही हि नाही … गरज आहे म्हणून विक्री आहे … सर्वांनाच संसार नाही आवडत पण शरीर लागत असत … कोणाला पगार मिळतो तो त्याच्या वेळेचा ,बुद्धी चा , मेहेनातीचा तर कोणाला सुंदरतेचा आणि शरीराचा … परिस्तिति सर्वांचीच सारखी नसते … पण आपण सगळेच विकाऊ आहोत हि वस्तु'स्थिती आहे .
ज्ञान , भक्ती , संसार , शरीर याची तहान भागली की थकल्या सारख होईल … समोरच प्यासा दिसेल … तिथे भूक तहान सगळच भागेल … अगदी हाता वर पोट … असणार्यांसाठी हाथभट्टी ची देखील मिळेल … तर पैश्यात बुडालेल्यांसाठी मुरलेली देखील मिळेल … शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मिळेल ....
म्हणून म्हणतो …

पुणे तिथे काय ऊणे....अगदी चपखल आणि नेमके भाषय केले आहे...hatzz offf...आणि आज बहुधा परत दगडुशेटला याव लागेल....
ReplyDeleteThank you
DeletePunyacha ABC cha descriptive accurate,ani mishkil titkach khara ASA punha punha vachnya sarkha blog lihila aahes.keep it up!
ReplyDelete"dev shrimanta zahla, ki garibanchi raang tithe wadhte"..
ReplyDelete" baikana vikat ghaicha asta te milte, ani purushana je sagle pahaicha aste te sagle diste" kadaak shabdaa end.. Manus durgya u are..!
Thank you
Delete"dev shrimanta zahla, ki garibanchi raang tithe wadhte"..
ReplyDelete" baikana vikat ghaicha asta te milte, ani purushana je sagle pahaicha aste te sagle diste" kadaak shabdaa end.. Manus durgya u are..!
Thank you
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteMast ahae keep writing n good luck for ur next blog.......

ReplyDelete