प्रिय बाबा ,
सा . न . वि . वि .
बाबा , मला शिक्षणाने जेवढ घडवायचं आणि बिघडवायचं होतं ते आता पुष्कळ झालं . माझं मन त्यात रमत नाही हे तुम्ही जाणून आहात .
मला तुमच्या बांधकाम क्षेत्रात काही आवड नाही , पण मला , विकत घेणाऱ्याच्या खिश्यातून विकणाऱ्याच्या खिश्यात पैसा कसा नेता येईल , यामधला पूल , म्हणजेच जाहिरात बनवायला/बांधायला आवडतं .
मला जाहिरात क्षेत्रात जाऊ द्या ! मला खूप कला येतात … हे तुम्ही जाणून आहात , मला त्यांचा वापर करू द्या . प्लिज बाबा , माझी विनंतीचा स्विकार करा !
आता तर आपण दोघं , काही फरकाने “बांधकाम” वालेच . मी मात्र जाहिरात मात्र !
कळवावे .
तुमचाच ,
सुर्यकांत
कार्यालयात आलेले हे स्वताच्या मुलाचे मोत्यासारखे दाणेदार आखीव रेखीव अक्षरातल्या पत्राला वाचून झाल्यावर लगेच मोबाईल वरून वसंतरावांनी सुर्याकांत ला बोलवून घेण्यासाठी कॉल केला … आणि फोन वाजल्या चा आवाज दारा अडून येऊ लागला … म्हणजे सुर्यकांत वसंतरावांनी पत्र वाचून होण्याचीच बाहेर येऊन , वाट पाहत होता .
वसंतरावांच्या कॅबीन मध्ये येताना त्याने रीतसर “ अत्त येऊ का ?” विचारले !
“ घरातल्या घरात पत्र व्यवहार व्हावा असं कधी वाटलेलं नाही ” वसंत रावांना पत्रा चा प्रकार आवडला नव्हता !
उजव्या खांद्यातला बॅडमिनतन रेकेट आणि डाव्या खांद्यावरून गिटार खाली ठेवून , डोळ्याचा गोगले माथ्यावर स्तीरावून , खुर्ची वर बसून , कुरळ्या केसांशी खेळू लागला आणि म्हणाला “ बाबा , दारावर सेल्सMAN आला की … तो काय विकतोय हे जाणून न घेता आपण कधी कधी दारही उघडत नाही … पण दारा खालून pamplet ढकललेलं असलं की … त्याला वाकून उचलून कचऱ्यात टाकण्य आधी एक नजर त्यावर काय आहे ते तरी वाचतो ... म्हणून ! ”
वसंतरावांचा राग जरा नमला … “ युक्तिवाद आवडला … मला तुझ्या आयुष्यात आता अडथळा बनायचं नाही … तू , तुला हवा ते कर !"
“ thank you … मला माहिती असत तर हे मी आधीच केलं असतं .... आई ला पटवाल ? ”
खुषीत सुर्यकांत ने विचारले .
“ तुझ्या आईला तर मी केव्हाच पटवले आहे … आमचा लग्न हि झालं आणि तू देखील आलास … तू आजपासून तुझं आयुष्य जगायला मोकळा आहेस !” वसंतराव शांत चित्ताने हसून म्हणाले .
“ धन्यवाद बाबा ” असा म्हणून सुर्यकांत ने वसंतरावांना मिठी मारली … आणि धडकन कोणीतरी त्याच्या डोक्यात काही तरी मारलेलं त्याला जाणवलं .
“ मिश्तर सुर्यकांत देशमुख …. झोपाच काढायच्या होत्या तर … सिविल इंजिनियरिंग ला अडमिशन का घेतली ? "
सुर्यकांत वर भ्याड हल्ला झाल्या नंतर अश्या शब्दांचा एका शिक्षका कडून भडीमार झाला … तो बाबांना मिठी मारत नसून स्वतालाच कवटाळून गाढ झोपेत स्वप्न पाहत होता हे त्याला कळलं , पाय सरळ करावे म्हणून हलवले तर … डस्टर खाली पडल्याचे दिसले … डस्टर ने मात्र कधीच खरे न होणारे स्वप्न पुसून … काळं भवितव्य लखलखीत करून ठेवलं होतं ... आयुष्यात बरेच स्वप्न फक्त जाहीरात मात्र राहतात ... खरे होत नाहीत !
P.S. -
Pudhil Akarshan - Samdan Valley ( Pravas Varnan )
Yo man
ReplyDeleteKharach apratim......maturity vadhatey
ReplyDeleteKharach apratim......maturity vadhatey
ReplyDelete