कोणत्याही कादंबरीला लाजवेल असा रविवार , समोर पाऊस , कानात किशोर कुमार , हातात आवडत्या लेखकाचं पुस्तक , पण इतकं छान बघवत नाही नशीब लिहिणाऱ्या लेखकाला , अचानक तिचा कॉल आला , कोणत्याही तंद्रीतुन बाहेर पडणं जितकं भयानक ,तसच तिचा आवाजही घाबरा ,रडका खोल बुडाला होता ,आत्ता २ तासा पूर्वी तर बोलणं झालेलं आमचं , काही भांडण झालेलं नव्हतं , पण आत्ता ती तोंडून फक्त हुंदके देत “सॉरी पापा ” म्हणुन फक्त भय निर्माण करत होतं ‘ तुझी अाज्जी कुठंय तिला बोलायला दे ’ ‘ आई काही बोलली का ? कोणी पोराने कॉलेज मध्ये त्रास दिला का ?’ ‘मघाशी तर तू नीट बोलत होतीस आता काय झालं ?’ ‘आज्जी ला तर काही नाही ना झालं ? ’ उत्तर नाहीच, प्रश्न वाया जात होते मिळत होते ते हुंदके आणि एकच वाक्य “ सॉरी पापा ” , ह्याचा काय अर्थ आता ? ह्या एका नव्या कोड्याने , तोच पाऊस नकोसा झाला , ते पुस्तक निरर्थक झालं , किशोर कुमार ऐकवा वाटत नव्हता , मी मुंबईत , तिची आई दिल्लीला , ती बँगलोर ला , परिवार तीघांचाच पण हा ट्रायपॉड अस्ताव्यस्त पसरलेला , सासूबाई कुठे कडमडल्या असतील ह्या विचारात असतानाच , म्हातारीला तर काही नसेल ना झालं हा विचार डोक्यात येणं साजेसं , दोघी म्हणजे दोन टोकं एक तारुण्यात झेपावलेली आणि दुसरी म्हातारपणात पडलेली खरतर, दोघीं ची काळजी घेणारा कोणीतरी हवं , वर सासूबाई ने , कोणत्याही वयातील स्त्री ने करावा ते केलंच , मोबाईल वर केलेला कॉल उचलला नाही , मुलीचे हुंदके आणि सॉरी पापा ऐकत मी मात्र जगभरातले apps वापरून रिक्षा , मग टॅक्सी मग विमान तिकीट आरक्षीत करून पुढील ५ तासात बंगलोर गाठलं , दार वाजवलं , दार उघडलं तर ते माझ्या बायकोने ‘ तुझं माझ्यावर प्रेम नाहीये बिलकुल , मुलगी नुसती रडते आहे पण साधा कॉल ही केला नाहीस !’ तिने वेगळाच सूर लावला , ‘ सॉरी मी विसरलो , काय भानगड काय आहे पण ? आणि तू केव्हा आलीस ?’ नवरा आणि बाप दोन्ही नात्याने घराच्या उंबर्यातच प्रश्न विचारले पण समोरून खूप लोकांचा गलका एकदम समोर येऊन “हैप्पी मॅरेज एनिवर्सरी ” ओरडला , म्हणजे हा सगळा बनाव होता , राग येत होता , पण प्रसंग एखाद्या कादंबरीला लाजवेल असाच होता , बायकोच्या मिठीतुन सुटत , सासूच्या पायापडलो , तिने माझे कान धरले “ लग्नाचा वाढदिवस विसरतोस नालायका ? ” खूप नातेवाईक होते सर्वांना एकत्र बघून डोळे भरून आले , समोर अली ती माझी मुलगी तेजश्री , खोटं खोटं रडत म्हणाली “ सॉरी पापा ” मग हसू लागली मला येऊन बिलगली ,आता माझा ‘राग’ ‘गार’ झाला ,थोड्या वेळाने . बायकोला आणि मला मोकळीक मिळाली ,तेव्हा मी देखील कोटाच्या आतल्या खिश्यात लपवुन ठेवलेला गुलाब ... तिला दिला ,बायको नव्या नवरी प्रमाणे लाजली , मला देखील आजचा दिवस लक्ष्यात होता बघून गहिवरून आलं , हातात ला गुलाब तिच्या डोक्याच्या केसां मध्ये माळणार ,तेवढ्यात , दार उघडून तेजश्री ने परत भ्याड हल्ला केला , आमचा ‘त्या’ पोझ मध्ये फोटो काढला आणि खट्याळ पने आम्हाला एकांत देऊन जाताना परत म्हणाली “ सॉरी पापा ” .
Freedom Writer will expanding views in Marathi , Hindi and English language ... there will be no posts to hurt anyone ... characters , stories , topics and etc mentioned will have no real evidence in real world ... if so it will be mere coincidence ! thank you ... happy reading ... enjoy life !
Friday, 5 August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
गंध
प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...
-
संकेत चासकर ! … हि कोणी काल्पनिक व्यक्ती रेखा नसून … हा कल्पने पलीकडे असलेल्या अस्तित्वात्ला माझा मित्र आहे ! My 7th Blog to to person 1...
-
ज्याला क्षण साजरा करायला अवडत त्याला सण खोटे वाटतात. एकतर मिश्किल माणूस मुश्किलिने सापडतो, खट्याळ स्वभावाचा माणूस घड्याळात अडकलेला असतो, अ...
Great....
ReplyDeleteWe are releasing this film on Valentine day... :)
Ek no.khuuuuuup chan re...avadala mala
ReplyDeletekadakk ...re,,,,
ReplyDeleteAwwww ,.... Dat was sweet... :)
ReplyDeleteभारीच
ReplyDeleteएकदम समोर घडतंय असं वाटलं
ReplyDelete