फोटो
शेजारीण (थेट स्वयंपाक घरात शिरुन) - काय ग तुझा मुलगा किती वर्षाचा ?
ती - आठ वर्षाचा ... का ग ?
शेजारीण - अगं बघ तो कसा जोरात गाडी चालवतोय ( स्वयंपाक घरातल्या खिडकीतून तो गाडी चालवताना दिसत होता ) त्याला आवर घाल ...
ती - अगं त्याला ना जन्मापासून गाड्यांची भारी हौस ... (मोहरीत हाथ धुवून ) थांब तुला ना त्याचे फोटोच दाखवते ... सगळे गाड्यां सोबतचेच आहेत ... म्हणजे खेळण्यातल्याच त्या पण गाड्याच ना !
शेजारीण - आत्ता चालवतोय ती तर खेळण्यातली नाहीये ना पण ... सायकल चालवायचं वय आहे त्याचं ... कश्याला उगाच जीवाशी खेळ स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही ?
ती - नको काळजी करू ग ... घरात गाड्यांची कमी नाहीये त्यामुळे चालवतो ... चांगली चालवतो आणि मदतही होते घरात .
(शेजारीण बाई काही तरी काम काढून निसटते कारण ‘तिचं’ ऐकण्यात काही तथ्य नव्हतं !)
आणि काही दिवसांनी तिच्या मुलाच्या नवव्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये तिच्या मुलाचा अपघातात चेंदामेंदा झालेल्या गाडी सोबतचा शेवटचा फोटो येतो , तेव्हा शेजारीण तिच्याकडे सावरायला आणि मदत म्हणून परत तिच्या कडे जाते, पण ‘ती’ नजर स्वयंपाक घरातल्या खिडकीतून बाहेर टाकते , तिला सगळा संवाद आठवतो आणि तिला रडणं आवरता येत नाही ,कारण ती आता कुठेही पाहते तरी तिला दिसतो तो तिच्या मुलाचा शेवटचा फोटोच !
लेखक - दुर्गेश विवेक निसळ
(Freedom Writer)
9049434370
P.S. - 25th post to the blog,
Silver Jublee it is now !
3k+ Pageviews
yet just Half way
Thank you Readers
Good Work Durgya
This calls for a party now !
No comments:
Post a Comment