वाट - The wait
Freedom Writer's Mood - Exploring world of words . (Random Writing)
सिमेंट च्या जंगलात एवढी झाडं झाली आहेत की सगळ्याला एक कीड लागल्या प्रमाणे वाट लागली आहे .
प्रत्येकाच्या आयुष्यात ‘वाट' हि पहावी तरी लागते नाहीतर लागलेली तरी असते . फक्त आपली ‘वाट’ लागण्याची वाट काही पहावी लागत नाही .
काहीतरी करत असणाऱ्याला वाट पाहायला लागणं किंवा त्याची वाट लागणं ते चांगलं वाटत नाही , पण जो काही करतच नाही त्याला कसली घाई असते काही कळत नाही !
ताटकळत बसणं फक्त माणसाच्या जन्माला आलय असं काही नाही , त्या समुद्राच्या लाटा देखील कोणाची वाट पाहत किनाऱ्यावर येर झाऱ्या घालत असतील कोणासठाऊक ?
पांढरे बर्फाळ डोंगर , हिरव्या झाडांच्या गालिच्या खाली शांत पहुडलेले डोंगर , मधेच त्यांना भेग पडावी तश्या दऱ्या ...त्यातून कोसळणारा धबधबा ... काय माहीत वाट बनवत कोणाला भेटायला चालला असेल .
लहान बाळ शाळेतून आल्यावर त्याला बाईंनी काय शिकवलं हे त्याच्या आईला सांगायला जसा आसूसलेलं आसतं ... तसच हज्जारो ,लाखो झाडं त्यांचं बालपण कसं होतं , ... ऐन बालपणी ... लहान छोकरे त्या वर चढून फळ तोडून खायची गोष्ट , तारुण्यात प्रेमी युगुलांनी त्यांच्या सावलीत केलेलं प्रेम ... पण माळीबुवांनी ,मालकांनी मला वाढवलं पण फळं मात्र दुसरेच खाऊन जातात ... आपल्या आजोबां च्या बोलण्यात येणार ‘त्या काळात’ ल्या प्रकारातल्या कितीतरी हकीकती सांगायला जंगलं ची जंगलं वाट पाहत आहेत .
जगातली प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे . कारण ती पूर्णत्वाची वाट पाहत आहे . आपला एक हि दिवस दुसऱ्याच्या संपर्कात ना येता पूर्णत्वाला गाठु शकत नाही , त्यामुळे प्रत्येक जण ,प्रत्येक गोष्ट गरजु आहे . गरज असल्या मुळे त्याला किंमत आहे ... किमती मुळे स्पर्धा आहे ... स्पर्धे मधे संधी आहे ...संधी मिळायला वाट पाहावी लागतेच ... कारण संधी म्हणजे वाट आहे ... स्वताला पूर्णत्वा कडे येण्याची .
घडाळ्यात रुतलेल्या मुळांचं जबाबदाऱ्यांच्या बेडीं सोबत वाढणं , घड्याळाच्या टिक टिक वर होणाऱ्या हालचाली , तहान, भूक ... सगळं काही ! दुसऱ्यासाठी थांबवा लागणारच ... पण
स्वतःला स्वतःची वाट पाहायची वेळ देऊ नका ... स्वतःला ताटकळत ठेवायची वेळ येऊ देऊ नका .
मी म्हणतो दुसऱ्याची ‘ वाट ’ पाहत बसणं सोप्पं ... दुसऱ्याला ताटकळत ठेवणं अजून सोप्पं ... पण स्वतःच्या आयुष्याला ‘ ताटकळत ठेवुन वाटेला ’ लागू पर्यंत वाट पाहत बसणं फार वाट लावुन जातं .
कोणाची वाट पाहताना वाट लावून घेऊ नका ... मग ती वाट साध्या फालतु फडतूस माणसाकडून सही होण्यासाठी असो किंवा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी संधी असो ...कोणाची वाट पाहताना स्वताला शोधायचं , स्वतःशी बोलायचं , स्वतःला आवडतं ते करायचं . कारण आपल्या साठी ह्या जगातली सर्वात महत्वाची व्यक्ती असतो ती म्हणजे आपणच .
नैसर्गिक जंगलं काय आणि सिमेंट चे जंगलं काय ... दोघं एकमेकांत वाट करू पाहत आहेत ... समतोल राहिला तर ... पूर्णत्व मिळू शकेल ... नाहीतर वाट लागेल ... तो पर्यंत आपण आपल्या शरीर पुरतं नाही तर मनापुरतं तरी पूर्ण होऊयात !
Wow... Apratim!
ReplyDeleteMast
ReplyDeleteMast
ReplyDeleteSimple and Perfect ...Jinklas Mitraa ... Aawdla Khup !!
ReplyDeleteJabaradast re bhau .... simpy good nd loved it very very much.... keep it bro ...😀😀😀
ReplyDeleteआयुष्याची वाट लागणार नाही अशी वाट आपणच निवडायची!!
ReplyDelete