Saturday, 24 June 2017

हेडफोन आणि कापूस




आजकाल गोष्टी लिहायच्या असतील तर लहान मुलं आणि जिवंत असल्यास त्यांच्या आजी आजोबांवरच लिहाव्या लागतात , कारण आई बाबा तर पैश्याच्या मागे धावताना ट्रॅफिक मध्येच अडकलेले असतात . त्या मुळेच कि काय जाहिरातींमध्ये देखील म्हाताऱ्या किंवा अगदीच जन्माला आलेल्या बाळांचे प्रमाण वाढले आहे . आसों ! 

सकाळी अचानक लवकर उठल्यामुळे आजोबा इतक्या थंडीत बागेत व्यायाम करायला देखील जातात तेही मला सोडून हे तेजश्री ला प्रथम कळताच धक्का बसला . “ कुठे गेलेलात मला सोडून ? ” तिने बाहेरून येऊन बूट काढणाऱ्या आजोबांना निक्षून विचारले . 
आजोबांना मात्र काही ऐकू गेले नाही वाटतं . 
“ आजोबा ऐकू येत नाहीये का ? अहो कुठे गेलेलात ”
“ अरे वाह लवकर उठला माझा बोका ... ” अचानक तेजश्रीला पाहून आजोबा खुश झाले . 
“ अहो पण मी काय विचारतीये तुम्ही कुठे गेला होतात मला सोडून ? ” तेजश्री असं त्यांना विचारात असतानाच आजोबांनी त्यांच्या कानातून हेडफ़ोन प्रमाने कापूस काढला “ हा आता बोल काय म्हणत आहेस तू ? ” 
“ आईल्ला ! नवीन हेडफोन ?  आजोबा तुम्ही बऱ्याच गोष्टी लपवायला लागले आहेत बरका ... वायरलेस दिसतोय ...  बघू ”  
“ अगं ए  आधुनिक माकड ! कापूस आहे तो साधा ... ” तेजश्रीला कापूस म्हणजे कळालं नाही पण “ cotton cotton ” असं आजोबांनी सांगताच कळालं . 
“ मला वाटलं हेडफोन आहेत . ह्या कॉटन चा काय उपयोग ? ”  तेजश्रीने आजोबांना विचारलं . 


आता पुढचा मीच सांगतो ... काही दिवसां पुरवी आजारी पडलो होतो ... तेव्हा आईने तिच्या कानात हेडफोन किंवा कापूस दोन्हीही नसताना कोणाचच न ऐकता माझ्या कानात कापूस टाकला (कोंबला) . 

सतत कानात हेडफोन लावणारं आपलं वय आणि काय काका , आजोबा टाईप , कानात कापूस घालून हिंडायचं ? पण खरं सांगतो कानात कापुस म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग ! 

हेडफोन घातल्याने हाथ मोकळे राहतील ह्याच एका कारणाने ह्याचा शोध लागला पण ... कानां नंतर मनाच्या पडद्यावर किती भार पडला काय सांगावं ! 
कॉल , गाणी , रेडिओ , गाडी चालवताना , व्यायाम करताना , चालताना  ... कायम कोणाचा ना कोणाचा , कश्याचा ना कश्याचा तरी आपल्या कानां मध्ये सतत चालू असणारा हा आवाज ... जर ! जर कधी मोबाइल ची बॅटरी संपली असेल , हेडफोन चा गुंता सोडवायचा कंटाळा आला असेल , किंवा हेडफोन हरवले असतील तरच हा कानात वाजणारा आवाज बंद होतो ! कानातल्या हेडफोन चा आवाज कमी ज्यास्त किंवा चालू बंद करता येतो ... पण कानातले हेडफोन काढले कि लोक , समाज, शिक्षक , घरातले ह्यांची किर किर ऐकावी लागते हे वेगळच दुखणं . 

पण आपण ? आपला आवाज ?  दोन गाण्यांच्या मध्ये असणाऱ्या मोकळ्या शांत वेळ तो आपला ! तो पण अगदी काही क्षण,  नंतर नवीन गाणं त्याचं नवीन संगीत आपल्याला परत वेगळ्या जगात नेयला तयार असतं ! हेडफोन ने जगातले सर्व आवाज आपल्याला स्पष्ट ऐकवले पण आपलाच मनाचा आवाज आपल्याला आता त्याच्यामुळे स्पष्ट ऐकू येत नाही ! 

... आणि इथे ह्या बहिऱ्या होणाऱ्या शहरी कानांना वाचवायला काळ्या मातीतला ‘ढवळ सोनं ’ म्हणून ओळखला जाणारा कापूस येतो ! थंडी वाऱ्या पासून कानांना वाचवण्यासाठी कापूस खूप प्राचीन काळा पासून प्रसिद्ध आहे पण त्याच बरोबर कापूस आपल्या साठी शांतता आणतो ! ह्या आवाजाच्या दुनियेत कापूस कानात घालणे म्हणजे खरच स्वर्ग आहे स्वर्ग ! बरेच अनावश्यक आवाज बंद होतात , आपण स्वतःचा मनातला आवाज ऐकू लागतो , स्वतः सोबत संवाद साधू लागतो .... थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आपल्या मनात घर करून बसतो , ज्यात आपण आपलेच असतो , त्यात बाकी कोणाचा आवाज नसतो . 

हेडफोन  आणि  कापूस ह्या दोन्ही चा अतिरेक झाल्यास कानांना हानिकारकच पण , आपण काय आणि कोणाचं ऐकतो आजकाल ? आणि माझं तरी काय तुम्ही ऐकणार ?  पण खरंच कधीतरी हेडफोन घालून ठेका धरण्या पेक्षा कापूस घालून रम्य शांततेत स्वतःला शीळ घाला ! रोजच्या साच्या तुन बाहेरपडून असे मी तरी प्रयोग करत असतो ! 



2 comments:

  1. Kadak ch bhau ... kharr tar aaj kal he praman vadhlay re jastach ... music lavtat nd saata samudra palikadchi kadhi na kalnari english songs aikt bastat.....

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...