ज्याला क्षण साजरा करायला अवडत त्याला सण खोटे वाटतात. एकतर मिश्किल माणूस मुश्किलिने सापडतो, खट्याळ स्वभावाचा माणूस घड्याळात अडकलेला असतो, अनेक मनुष्य प्राणी वर्किंग अव्हर्स मधे chat करायला फ्री असतात आणि वीकेंड ला बिज़ी. हे अस का असेल?
आपण ज्या जातीत जन्माला आलों उदाहरणार्थ मुस्लिम , पण त्यासाठी बूंदी भर देखिल कर्तुत्व कोणाचच नाही. सुट्ट्या मिळतात म्हणून धर्म साजरा केला जातोय नाहीतर धर्मा ने गाजरा शिवाय दिलेच काय आहे? तर फक्त एक अदृश्य लेबल. ते लेबल प्रत्येकाच्या दृष्टिकोणात दिसते, ऐकू येते, बोलले जाते, रुजवले जाते, मिरवले जाते... तरीही उरते ते गाजरच आणि गाजरा चा होतो, हलवा.
धर्म जर गाजर मानले तर माझाच हलवा श्रेष्ठ, चविष्ट... मग खा किंवा वाटा भांडता का? नाही म्हणजे कसय मस्त पुस्तकांच्या डोंगरातून कथा, कविता यात मनसोक्त भिजायचे, डुमबायचे, अंग पुसायचे, व्यवहार करायचे, जेवायचे,ज़ोपायचे वैगरे पण मग येतात कुरान, बायबल, भगवद्गीता आणि मग येतो टीव्ही. धर्मग्रंथ ही व्यक्तिमत्व वृद्धिंगत करण्यासाठी आत्मसात करावी, एवढच. टीव्ही मनोरंजन व्हावे इतकाच पहावा, एवढच. होतय मात्र सगळं वेगळं. प्रमाण म्हणून काही नाही. अधुन मधून आठ मित्र चार दू चाकी वाहनावर किंवा 9 मित्र 3 दु चाकी वाहना वरुन रस्त्याने चालले असले की बोंबलत जातात, का? याला उत्तर नाही. ही बोंबलत जाणारी मूल ओरडत असतात अनेकांना हा आवाज ऐकून भीती वाटते, का? यालाही उत्तर नाही. बहुदा हीच स्वतंत्रा असावी, बोंबलत जाणे.
इतर सगळ्यांवरचे नियम शिथिल करुन फक्त राजकारणी आणि धर्म प्रसारकांवर इतके कडक नियम लादले पाहिजेत की... भ्रष्टाचार सोडाच. 24*7 त्यांच्यावर कैमरे, टेप केलेले कॉल्स, रस्त्यावर मोठ्या फ्लेक्स वर त्या भागातील मुखिया चा पत्ता, त्याचे टाइम टेबल... इनकम, गाड्या, गाड्यांचा नंबर... आणि सगळ्यावर नजर ठेवायला कॉम्प्यूटर. माणूस देवा पेक्षा कॉम्प्यूटर ला घबरतो. तशी दूसरी बाजु ही देखील आहे की zee मराठी वरील तुला पाहते रे मधल्या ईशा चे बाबा तिला लाडाने काय म्हणतात हे सर्वांना पाठ असते पण वर्षों वर्षे एकाच ठिकाणी राहत असलो तरी आपला वार्ड नंबर काही पाठ नसतो.
भारत हे एक मोठे हॉस्पिटल आहे... राज्य, जिल्हा, तालुका, महानगर पालिका, पालिका, पंचायत आणि वैगरे काही असल्यास... शेवट मात्र वार्ड. आपण भारत या हॉस्पिटलच्या ह्या ह्या वार्ड मधे त्रस्त नागरिक म्हणून जगत आहोत. राजकरण्यांना शिव्या, भारताला नाव ठेवणे आणि तुमचा वार्ड नंबर काय असे विचारले की प्रश्न चिन्ह.
"नाही रे अस नाही". "हो स्टेटस स्टोरी मधे पाहिलं की तुझ्या". "मला महितीये सगळ. तूला काही कळत नाही". हे असे वाक्य ना संवादांचा मर्डर करत आहेत. तोंडाच्या मसल्स ला पण द्या की जरा व्यायाम... करा की जरा बिनबुडाची बडबड... बघा की उगाच हसुन... कुठेही पैसे न देता.
एकतर आयुष्य म्हणजे, रॅक मधे ठेवलेले डबे. आपल्याला तिखट लागले म्हणून लाडू शोधावा तर लसणाची शेव सापडते. मटकीच्या भाजी वर बारीक शेव टाकावी म्हणले तर सुपरीच काय सापडते, नको त्या वेळी लाडु, करंज्या, अनारसे कुठे जातात? अगदी सापडलेच तर लाडु बोटांत धरुन तिला लाडाने भरवावा म्हणून तिच्या ओठांपर्यन्त न्यावा तर त्याचा भुगाच काय होतो.
माणूस कश्या चाही गुलाम होऊ शकतो. एखादी आठवण, प्रेम, पैसा, पद, pubg कश्याचाही. मनातल्या विचारांना ना.... पार्क करता आलं पाहिजे होत किंवा घरात मांजरीच्या पिलांची संख्या वाढली की जंगलात सोडून देत तसच जर या विचारांना लिहून ठेवायचे. व्यक्त व्हायच. विचार मांडले नाहीत तर त्या सारखे जड काहीच नसावे. तुम्ही हसले नाहीत तर इस्त्री सारखे दिसता. पडदे देखील बगडतात मोकळी हवा सुटली की, आपणच आपले गुलाम होतो, इतरांचे होतो, संसारचे होतो, सवयी, व्यसन आणि काय नाही?
"अड्यात नाही तर परसात कसे येणार?" याला आता अपडेट करुन "मनात नाही तर पुतळ्यात कसे येणार?" असे म्हंटले पाहिजे. भावनांचा खेळ आहे सारा हे पुतळे माणसांच्या सोबत खेळतात . परंपरे पेक्षा नियम पाळण्याला महत्त्व मिळाले की कल्याण होईल. मातीचा किल्ला बांधायचा आणि नंतर फोडायचा त्यापेक्षा पुस्तकांचा किल्ला बांधायचा, वाचायचा, प्रगल्भ व्हयचं, वाटायचा. मग का नाहीं प्रत्येक क्षण सणच असेल...
Nyc keep it up
ReplyDeleteThank you
Deleteएकतर आयुष्य म्हणजे.....uhhh..no words. Just😍
ReplyDeleteThank you
Deleteभाऊ नेहमीप्रमाणे च अप्रतिम ❤
ReplyDeleteHappy Reading 😊
Thank you bhau
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteदिवाळीच्या तोंडावर मस्तपैकी जे तोंडसुख घेतला आहे त्याची दाद सुद्धा तोंड भरून कौतुक करून द्यावी लागेल अस लिखाण आहे. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद !!!
ReplyDeleteजय जुमांजी🤘
Thank you
DeleteWow....very profound ...nice train of thoughts...
ReplyDeleteमस्तच......
ReplyDeleteThank you
DeleteMind blowing dada superb khup chan lihila aahes
ReplyDeleteThank you
DeleteEk number bhai lay bhari lihilay
ReplyDeleteWachun mood refresh zala yaar it's really awesome.
शेवटी उरतो तो फक्त गाजर, ज्याच्या त्याच्य आवडीनुसार.... !
ReplyDeleteमस्त लिहीलयस दुर्गेश :)
चौफेर फटकेबाजी. एका चेंडूवर षटकार तर पुढच्याच चेंडूला अलगद दिशा देऊन चोरून धाव घेण्याचं कसब वाचकांना गोंधळून टाकतं, क्षणभर थांबून विचार करण्यास भाग पाडतं. ३६०° ची फटकेबाजी अशीच चालू राहुदेत...
ReplyDeleteशुभेच्छा तुला...