२०१८ च्या नवरात्री निमित्त ९ छोट्या कथा लिहिल्या... महिलांचे प्रश्न यावर लिहायला जणु आई भवानी जगदंबेनेच मला आशीर्वाद दिला, तुम्हा माता बहिणींनी याविषयी चांगला प्रतिसाद दिला... लवकरच महिलांचे प्रश्न संपोत आणि मी हे सदर लिहिण्याचे बंद होवो...
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय जुमांजी
#नवरात्री निमित्त रोज रात्री एक छोटीशी कथा पोस्ट करनार आहे. आजची कथा...
पहिली माळ
तिला दरवर्षी पैठणी नमागता मिळायची पण पिरिएड्स
आलेकी पॅड मात्र तिलाच धावत जाऊन
आणावे लागायचे.
दूसरी माळ
सकाळी भोळा भक्त होऊन त्याने सर्वशक्तिशाली माते च्या चरणावर डोके टेकवले मंदिरात जाऊन आणि
रात्री मात्र मदीरा पियून शक्तिप्रदर्शन करताना घरातल्या देवीचे डोके फोडले.
- दुर्गेश विवेक निसळ
तिसरी माळ...
"काय करणार ग छकुले, आमच्या येळी नव्हतं ग #metoo वैगरे" आजीने तिच्या यातना, 'हे' येताना दिसताच थांबवल्या आणि नववारीचा पदर डोक्यावरून घेतला. ते समोरुन स्वयंपाकघरातून बैठकीत गेले कळताच तिने उरलेलं वाक्य पूर्ण केलं "तो माझा मुलगा असला तरी तू माझी नात आहेस. तु ही विकृती सहन करू नकोस... घाबरू नकोस... मी आहे तुझ्या सोबत.".
दुर्गेश विवेक निसळ
चौथी माळ
'थायरॉइड ची टेस्ट करुन घे एकदा'
असे तीच्या मैत्रिणी, बहिणी अश्या अनेक देव्या तिला सांगत होत्या पण तिला ऐकावे लागले कोणाचे तर, राक्षस बेवड्या नवऱ्याचे...'काही नाही झालेलं तुला'... नंतर काहीच झालं नाही पण घरातली लहान लेकरं आई बिना वाढली.
- दुर्गेश विवेक निसळ
पाचवी माळ
वासना, मोह आणि गिधाड.
ब्रेक अप नंतर प्रथमच ती इतकी नटुन थटून, घरच्यांच्या संमतीने तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीं सोबत पब ला गेली...
ती सोडुन सगळे घरी परतले तरीही तिचा पत्ताच नाही. तिचा मोबाइल बंद.
"तिची एका मुला सोबत तिथे ओळख झाली, ती त्याच्याच सोबत रमली, आमच्यात टाइमच स्पेंड नाही केला तिने, तो तिला सोडणार होता असे तीनेच त्याच्याच समोर ठरवले, ती काही समजवून घेण्याच्या मनस्थितित नवती, मग मी काही समजवु शकले नाही" असे तिच्या बेस्ट फ्रेंड कडून हिच्या घरच्यांना समजले.
खुप उशीरा ती घरात परतली, पण फक्त कोमजलेल्या, ओरबाडलेल्या फुला सारखी.
- दुर्गेश विवेक निसळ
सहावी माळ
प्रत्येक पार्टी, भिशी, कॉन्फ़्रेन्स, पत्रकारपरिषदेत तीचे सोन्याने सजणे सर्वांच्या नजरेत भरायचे.
पण जणू कमी वेळेत बरच काही 'मिळालेल्या' तिला, प्रत्येक व्याभिचार, नकोसा स्पर्श, बलात्कार... यातून झालेल्या जखमा झाकायला एक एक अलंकार हा, तिला पारितोषिका सारखा मिळत अलेला होता , हे सत्य मात्र तिलाच माहीत होते.
- दुर्गेश विवेक निसळ
सातवी माळ
अगदी लालबागच्या राजाची दर्शन रांग नसली तरी त्यात तिस्थट असताना, एकाही देवीचं 'दर्शन' घेयचे सोडायचे नाही, तेच अनेक महिलांचे तर पुरुषांना scan करणे चालु होते.
मूर्ति समोर... “चूकलं माकलं क्षमा करा”, मिटवून घ्या आणि दानपेटित मात्र वडापाव जेमतेम मिळेल येवढीच रक्कम पडते पण तेव्हड्या वर मात्र देवाने आपल्याला अंबानी बनवावे अश्या मागण्या आणि
परत निघताना घंटी वाजवणार्या पुरुष आणि स्त्रीयांच्या 'शरीरा' कडे नजरा...
- दुर्गेश विवेक निसळ
#Navratri #Dasara #Women #womenism #Marathi #Maharashtra
आठवी माळ
चांगली ऐटीतली नोकरी तिची आणि तसलसच राहणीमान. प्लेट मधे नसले तरी तीचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम नेहमी सारखा चालु होता. ती खिन्न, बरीच अस्वस्थ. कार्यक्रम उरकला. रात्री... "मॉम डैड मला तो मूलगा नाही आवडला"
आई "तुला आवडत तरी कोण?"
बाबा " कोण आहे तो तरी सांग एकदाचं"
ती मोठा श्वास घेऊन "Actually ती व्यक्ती तो नाहीं ती आहे" ... बराच वेळ शांतता.
- दुर्गेश विवेक निसळ
शेवटची कथा...
आई म्हणते "काय रे तू डब्बा खाल्ला नाहीस आणि तू ग...पाणी का पीली नाही ?"
तो म्हणतो "अ ग मम्मा तिथे खायला दिलेलं तेच खाऊन पोट भरलं पण मी बहेर च पाणी नाही पीलो बरका"
ती म्हणते "मंमा अग पिकनिक च्या ठिकाणी गर्ल्स टॉयलेटच नव्हते...मग मी पाणीच नाही पीले"
आई सुन्न.
- दुर्गेश विवेक निसळ
आता सिमोलंघन.
वाचकहो धन्यवाद !
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय जुमांजी
#नवरात्री निमित्त रोज रात्री एक छोटीशी कथा पोस्ट करनार आहे. आजची कथा...
पहिली माळ
तिला दरवर्षी पैठणी नमागता मिळायची पण पिरिएड्स
आलेकी पॅड मात्र तिलाच धावत जाऊन
आणावे लागायचे.
दूसरी माळ
सकाळी भोळा भक्त होऊन त्याने सर्वशक्तिशाली माते च्या चरणावर डोके टेकवले मंदिरात जाऊन आणि
रात्री मात्र मदीरा पियून शक्तिप्रदर्शन करताना घरातल्या देवीचे डोके फोडले.
- दुर्गेश विवेक निसळ
तिसरी माळ...
"काय करणार ग छकुले, आमच्या येळी नव्हतं ग #metoo वैगरे" आजीने तिच्या यातना, 'हे' येताना दिसताच थांबवल्या आणि नववारीचा पदर डोक्यावरून घेतला. ते समोरुन स्वयंपाकघरातून बैठकीत गेले कळताच तिने उरलेलं वाक्य पूर्ण केलं "तो माझा मुलगा असला तरी तू माझी नात आहेस. तु ही विकृती सहन करू नकोस... घाबरू नकोस... मी आहे तुझ्या सोबत.".दुर्गेश विवेक निसळ
चौथी माळ
'थायरॉइड ची टेस्ट करुन घे एकदा'
असे तीच्या मैत्रिणी, बहिणी अश्या अनेक देव्या तिला सांगत होत्या पण तिला ऐकावे लागले कोणाचे तर, राक्षस बेवड्या नवऱ्याचे...'काही नाही झालेलं तुला'... नंतर काहीच झालं नाही पण घरातली लहान लेकरं आई बिना वाढली.
- दुर्गेश विवेक निसळ
पाचवी माळ
वासना, मोह आणि गिधाड.
ब्रेक अप नंतर प्रथमच ती इतकी नटुन थटून, घरच्यांच्या संमतीने तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीं सोबत पब ला गेली...
ती सोडुन सगळे घरी परतले तरीही तिचा पत्ताच नाही. तिचा मोबाइल बंद.
"तिची एका मुला सोबत तिथे ओळख झाली, ती त्याच्याच सोबत रमली, आमच्यात टाइमच स्पेंड नाही केला तिने, तो तिला सोडणार होता असे तीनेच त्याच्याच समोर ठरवले, ती काही समजवून घेण्याच्या मनस्थितित नवती, मग मी काही समजवु शकले नाही" असे तिच्या बेस्ट फ्रेंड कडून हिच्या घरच्यांना समजले.
खुप उशीरा ती घरात परतली, पण फक्त कोमजलेल्या, ओरबाडलेल्या फुला सारखी.
- दुर्गेश विवेक निसळ
सहावी माळ
प्रत्येक पार्टी, भिशी, कॉन्फ़्रेन्स, पत्रकारपरिषदेत तीचे सोन्याने सजणे सर्वांच्या नजरेत भरायचे.
पण जणू कमी वेळेत बरच काही 'मिळालेल्या' तिला, प्रत्येक व्याभिचार, नकोसा स्पर्श, बलात्कार... यातून झालेल्या जखमा झाकायला एक एक अलंकार हा, तिला पारितोषिका सारखा मिळत अलेला होता , हे सत्य मात्र तिलाच माहीत होते.
- दुर्गेश विवेक निसळ
सातवी माळ
अगदी लालबागच्या राजाची दर्शन रांग नसली तरी त्यात तिस्थट असताना, एकाही देवीचं 'दर्शन' घेयचे सोडायचे नाही, तेच अनेक महिलांचे तर पुरुषांना scan करणे चालु होते.
मूर्ति समोर... “चूकलं माकलं क्षमा करा”, मिटवून घ्या आणि दानपेटित मात्र वडापाव जेमतेम मिळेल येवढीच रक्कम पडते पण तेव्हड्या वर मात्र देवाने आपल्याला अंबानी बनवावे अश्या मागण्या आणि
परत निघताना घंटी वाजवणार्या पुरुष आणि स्त्रीयांच्या 'शरीरा' कडे नजरा...
- दुर्गेश विवेक निसळ
#Navratri #Dasara #Women #womenism #Marathi #Maharashtra
आठवी माळ
चांगली ऐटीतली नोकरी तिची आणि तसलसच राहणीमान. प्लेट मधे नसले तरी तीचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम नेहमी सारखा चालु होता. ती खिन्न, बरीच अस्वस्थ. कार्यक्रम उरकला. रात्री... "मॉम डैड मला तो मूलगा नाही आवडला"
आई "तुला आवडत तरी कोण?"
बाबा " कोण आहे तो तरी सांग एकदाचं"
ती मोठा श्वास घेऊन "Actually ती व्यक्ती तो नाहीं ती आहे" ... बराच वेळ शांतता.
- दुर्गेश विवेक निसळ
शेवटची कथा...
आई म्हणते "काय रे तू डब्बा खाल्ला नाहीस आणि तू ग...पाणी का पीली नाही ?"
तो म्हणतो "अ ग मम्मा तिथे खायला दिलेलं तेच खाऊन पोट भरलं पण मी बहेर च पाणी नाही पीलो बरका"
ती म्हणते "मंमा अग पिकनिक च्या ठिकाणी गर्ल्स टॉयलेटच नव्हते...मग मी पाणीच नाही पीले"
आई सुन्न.
- दुर्गेश विवेक निसळ
आता सिमोलंघन.
वाचकहो धन्यवाद !
Nice 😊🙏👍🏻👍🏻
ReplyDeleteसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
ReplyDeleteसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ऊँ शांतिः शांतिः शांतिः
दुर्गेशजी पोस्ट खरच छान आहे