माझं ठरलंय...
( मी माझं मला... असं सगळं काल्पनिक आहे.)
आज ११ जानेवारी २०२०. तब्बल १० दिवस खर्ची गेल्यानंतर नंतर... या वर्षी काय करायचं आणि काय करायचं नाही हे... माझं ठरलंय.
त्यात सर्व प्रथम... आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही हे एका कागदावर लिहावं, कारण २० डिसेंबर २०१९ पासून अशी यादी मी मनात ठेवली आणि ती मनातच हरवली... त्या नंतर आज काय तो मुहूर्त लागलाय.
जिम, व्यायाम, सूर्यनमस्कार, जोर बैठका... वैगरे वैगरे मध्ये तन, मन आणि धन गुंतवायचे हे २००७ पासून मी ठरवत आलेलो आहे पण शरीर फुगत जातं तेव्हा पाकीट अशक्त आणि पाकीट भरलेलं तेव्हा शरीराचं कोण ऐकतय? नववी मध्ये असताना विश्वास नांगरे यांचे व्हिडिओ पाहून एकदाच पहाटे ३ वाजता उठून अभ्यास केलेला... त्या सकाळी झालेली सर्दी मला दहावी पर्यंत पुरली. दहावीत सकाळी ५ ला उठायचा खटाटोप अजूनही चालूच आहे. पहाटे उठून मनात येणारे विचार अगदी जीव घेतात, त्यात अभ्यास काय होणार? त्यापेक्षा उशिरा उठलं की मनात प्रसन्नता जाणवते... अभ्यासच काय डायरेक्ट परीक्षा सुद्धा द्यावी वाटते. त्यामुळे व्यायाम आणि सकाळी उठणे यावर मोठ्ठी फुली.
शरीराला त्रास देयचा नाही असं ठरवलं की जिभेवर ताबा ठेवावा लागतो. आमचे मात्र खाण्याचे चोचले मुळीच नाहीत... पण फ्रिज मध्ये फरेरो रोशेर कायम असतं. खिश्यात काजू असतात, कोणत्या शहरात काय न कसं न कधी कोणता जिन्नस उत्तम मिळतो हे बदाम न खाता लक्ष्यात राहतं पण जिभे वर ताबा ठेवावा लागतो तो बोलण्याचा... कारण आम्ही खरं बोलतो . खरं बोलणाऱ्याचे दुश्मन हजार. खोटं अपल्याचाने बोललं जाणार नाहीच... त्यामुळे कमीच बोलणे उत्तम. हे या वर्षी करायचं यात लिहिलं.
माझा धंदा लिहिण्याचा, विचार म्हणजे भांडवल आणि शब्द म्हणजे कारागीर... पण अनेकांचे त्यावर ४४२३ सल्ले देऊन झाल्यावर “मला तुमच्या फिल्ड मधलं काही कळत नाही पण जे वाटतं ते बोलते/बोलतो" हे वाक्य नित्याचेच. त्यात आजकाल मी पण लिहिते/ लिहितो बरका... असं एक शेपूट पण लटकत असतं. अश्यांच्या संगतीत असताना तुम्ही जे सांगितलं तेच वेद सांगतात, उपनिषद तर यावरच आहेत... वाल्मिकी काय वेगळं नाही बोलले, अहो आपले रामदास तर हेच दिट्टो शब्द लिहून गेलेले. माझ्या चहा सिग्रेटची सोय होते आणि कधी कधी रात्रीची पार्टी देखील. (लेखकांना आपलं ऐकवायची पण फी द्यावी लागते आजकाल... जगात काही फुकट नाही.) तर ही फी आपण टाळत आलो पण आता ती घेयची ... बास आता ठरलच.
मोबाईल पासून लांब राहणं फार काळ टिकत नाही...
आणि उशिरा पोहोचणं जमत नाही. त्यामुळे मनगटातील घड्याळ काढून... सतत मोबाईल पाहणे आणि त्यानिमित्त हातात मोबाईल घेऊन दुसरच काहीतरी पाहत बसणे आणि अरेच्च्या टाईम तर पहिलाच नाही म्हणून परत खिशातून मोबाईल काढणे... यात बराच वेळ जाऊन पोहोचायच्या ठिकाणी उशीर होईल. असा एक उपक्रम या वर्षी करणार आहे.
सल्ले घेणं याबाबत तर वर तपशील झालाच पण सल्ले देण्याबाबत... एक संकल्प मी करू इच्छितो, तो आहे... नसत्या भानगडीत पडू नये OR सरळ टोकाची भूमिका मांडून मोकळं व्हावं. त्यात होतं असं की गाडी चालवताना वळायची वेळ आली की मागे बसणारा फक्त उजवी कडे वळायला सांगतो आणि मी होतो confuse, अश्या माझ्या उजव्या डाव्या चा प्रॉब्लेम मोठा आहे, त्यामुळे कोणी उजवे आणि डावे याविषयी वाद, देगफेक जाळपोळ, बायका असल्यास जिंज्या उपटने अश्या प्रकारे संवाद साधत असले की मी जागेवरच थांबून घेतो. भारत देश इतका left right left right करतो पण माझ्याच सारखा जागेवरच आहे... त्यामुळे सल्ला देण्याबाबत नसत्या भानगडीत पडू नये.
एखादी गोष्ट फोर जी (4G) पेक्षा फास्ट पोहोचवायची असेल तर... त्या गोष्टीच्या आधी मी “फक्त कोणाला सांगू नको हा" हे वाक्य चीट कोड सारखं वापरायचे ठरवले आहे.
त्यात नातेवाईक... बिनबुडाचे मित्र यांना तर विशेष चीट कोड आहे... त्यांना काही सांगितले की संगणाऱ्याची पाठ वळू पर्यंत तो संदेश दुसऱ्याला गेलेला असतो. याच बरोबर मला कोणाच्याही good books मध्ये राहायचं नाही... कारण मी "चाटे" कोचिंग क्लास ला नव्हतो.
डोळ्यांना एखाद्याचे फक्त नाव वाचायची सवय लावत आहे.
ओठांना फक्त नाव सांगायची सवय लावत आहे.
मनात संकट काळी देवा पेक्षा... मदत करणाऱ्या मित्राचा नंबर पाठ करण्याचा मी अनुग्रह घेणार आहे. कोणी माझी जात विचारली तर सरळ idea, airtel, jio असे सांगून... काय तुमच्या जातीला आहे का रेंज असे बिनधास्त विचारणार आहे. राजकारण करण्यासाठी, कळण्यासाठी... माझं पोट भरलेलं नाही पण डोक्याला खाज आली की खाजवत राहायचं... उगाच झेंडा वंदन करायचं नाटक उभ करायचं नाही.
माझे होते नवते ते छटाक तत्व आता मी बाजारात ' चुलीवरची तत्व' म्हणून विकायला काढणार आहे.
कारण नोकरी आपल्या कडून होईल की नाही... हा प्रश्न माझ्या मनात आता अपक्ष उमेदवार म्हणून उभारहून सत्ता धारी पक्षाला पाठिंबा देत मंत्रिपद घेऊन कोट्याधीश होण्याच्या मार्गावर असून ईमेल ने पाठवलेले resume योग्य पत्तावर पोहोचत आहेत की नाही कळत नाहीयेत. तर यावर, कोणाचाही विचार न करता... मनाला येईल असं वागण्यात जी मजा आहे ती. 'नाही मी करणार नाही' या पेक्षा 'हो मी करतो... आणि मी विसरलो' या flexible असण्यात आहे.
खूप वाचायचं... जमेल तसं लिहायचं. २०२० चा अजेंडा असा आहे... वरील प्रमाणे माझं ठरलंय. दुसरं म्हणजे या ब्लॉग ची शंभारावी पोस्ट याच वर्षी करायची आणि मरायला मोकळं व्हायचं असं जगभर सांगायचं.
बरच ठरवलय... येवढं बरंय माझं ठरलय.

No comments:
Post a Comment