Freedom Writer's mood - Sailor
' आयुष्य एक समुद्र आहे … आपण एक जहाज … एक किनारा आपली सुरवात आहे … दुसरा किनारा आपला अंत आहे … सुर्य मात्र सिरिअल आहे … येत असतो जात असतो … आपण असलो तरी तो असणार … आपण नसलो तरी तो असणार … दुसर्या कडे इतका पहिल्याने स्वताकडे दुर्लक्ष होणारच न ? '
समुद्र हा माझा आवडता विषय आणि ठिकाण … अथांग , प्रचंड , अवाढव्य असला तरी … त्यावर कोणी काही लिहायला सांगितल की … चिमुटभर शब्द देखील किनाऱ्यावरच्या रेती प्रमाणे मुठीत टिकत नाहीत … की … कागदाच्या किनाऱ्यावर शब्द उमटलेच तर … नवीन येणाऱ्या समुद्रा विषयीच्या विचारांच्या लाटा … हाच समुद्र जुन्या साफ करून जातो !
समोर तो सुर्य … रोजचा लपंडाव एकटाच खेळत असतो ,रंगांची उधळण वैगरे त्याला काही माहित ही नाही … चंद्र समुद्राला खेळवत असतो … कोणाच्या साठी न थांबणारा समुद्र मात्र … मला माहिती आहे … माझ्याच साठी त्या किनार्यावर येरझार्या घालत असतो …
सिरिअल्स म्हणल तर Sherlock आणि friends सोडल्या तर मी कोणतीही सिरीअल पूर्ण पाहिलेली नाही … आणि पाहणार पण नाही . रोग किंवा लागण लागावी तशी सध्याची परिस्तिति आहे … एक झाली की दुसरी मग तिसरी हि सिरिअल्स ची लाट वाढतच चालली आहे … जंगलातून प्राणी पळवून … सापळ्यात अडकवावे … तेव्हा जशी अशांती पसरवली जाते … त्याच प्रमाणे … मनाची शांतता पळवून लावली जात आहे . शंख , शिंपल्यां प्रमाणे अश्या खुप देखाव्याच्या गोष्टी आहेत ज्या सीरियल्स आपल्याला देतात . सिरिअल्सच्या समुद्रात भरती आली आहे आणि ते खारे पाणी संसारात शिरत आहे ,त्यात आपला वेळ बुडत चालला आहे … तरीहि श्वास घेयचा उसंत नाही … ही एक तक्रार होऊन बसली आहे !
संसार समुद्र म्हणजे … पोहोता येत नसलं तरी उडी मारावी लागते , पोहोता येत असलं तर प्रवास काही खूप सोप्पा नसतो . किनाऱ्या वर घरं बनवावे … सावलीत झोपाळ्यावर … पडून रहावं …निवांत आयुष्य जगावं ! … पण त्याच किनाऱ्यावरची रेत … काही काळाने टोचू लागते … जबाबदारी सारखी चिकटून बसते … मग मात्र संसाराच्या समुद्रात उडी मारावीच लागते … मग कधी कधी मनोरंजनासाठी सिरिअल्स पहाव्यात … आपल्या लहानपणी च्या त्या समुद्र किनारी पुन्हा येऊन बसाव … पण घटकाभरच … कष्ट करायचे म्हणजे घाम आणि मासे खायचे म्हणल्यावर मासोळी चा वास सहन करावाच लगणार … त्या पासून लांब जाऊन जमणार नाही !
आयुष्य एक समुद्र आहे … आपण एक जहाज … एक किनारा आपली सुरवात आहे … दुसरा किनारा आपला अंत आहे … सुर्य मात्र सिरिअल आहे … येत असतो जात असतो … आपण असलो तरी तो असणार … आपण नसलो तरी तो असणार … दुसर्या कडे इतका पहिल्याने स्वताकडे दुर्लक्ष होणारच न ?

Nice!
ReplyDeleteThankyou very much !
Deleteअप्रतिम... दुर्ग्या...एकच नंबर भावा
ReplyDeleteThank you bhava
DeleteDurgya... well written 😊👍
ReplyDeleteHighly impressed by the conclusion 👌
Thank you very much ! Thank you !
DeleteDurgya... well written 😊👍
ReplyDeleteHighly impressed by the conclusion 👌
durgya mast re....aawadal mala....
ReplyDeleteThank very much !
DeleteProfessional writing ahe tuzi Durgesh. Carry on.
ReplyDeleteThank you very much
Delete