Friday, 19 February 2016

समुद्र , सिरिअल्स आणि संसार

Freedom Writer's mood - Sailor 

' आयुष्य एक समुद्र आहे … आपण एक जहाज  … एक किनारा आपली  सुरवात आहे  … दुसरा किनारा आपला अंत आहे  … सुर्य मात्र सिरिअल आहे …  येत असतो जात असतो … आपण असलो तरी तो असणार … आपण नसलो तरी तो असणार … दुसर्या कडे इतका पहिल्याने स्वताकडे दुर्लक्ष  होणारच न  ? '



समुद्र हा माझा आवडता विषय आणि ठिकाण … अथांग , प्रचंड , अवाढव्य असला तरी … त्यावर कोणी काही लिहायला सांगितल की … चिमुटभर शब्द देखील किनाऱ्यावरच्या रेती प्रमाणे मुठीत टिकत नाहीत …  की … कागदाच्या किनाऱ्यावर शब्द उमटलेच तर … नवीन येणाऱ्या समुद्रा विषयीच्या विचारांच्या लाटा … हाच समुद्र जुन्या साफ करून जातो !
समोर तो सुर्य … रोजचा लपंडाव एकटाच खेळत असतो  ,रंगांची उधळण वैगरे त्याला काही माहित ही नाही … चंद्र समुद्राला खेळवत असतो … कोणाच्या साठी न थांबणारा समुद्र मात्र … मला माहिती आहे … माझ्याच साठी त्या किनार्यावर येरझार्या घालत असतो …

 सिरिअल्स म्हणल  तर  Sherlock आणि friends सोडल्या तर मी कोणतीही सिरीअल पूर्ण पाहिलेली नाही … आणि  पाहणार पण नाही .  रोग किंवा लागण  लागावी तशी सध्याची परिस्तिति आहे … एक झाली  की  दुसरी मग तिसरी  हि सिरिअल्स ची लाट  वाढतच चालली आहे  … जंगलातून प्राणी पळवून … सापळ्यात अडकवावे … तेव्हा जशी अशांती पसरवली जाते … त्याच प्रमाणे  …  मनाची शांतता पळवून लावली जात आहे . शंख , शिंपल्यां प्रमाणे अश्या खुप देखाव्याच्या गोष्टी आहेत ज्या  सीरियल्स आपल्याला देतात  .  सिरिअल्सच्या समुद्रात  भरती आली आहे आणि ते खारे पाणी संसारात शिरत आहे  ,त्यात  आपला वेळ बुडत चालला आहे … तरीहि श्वास घेयचा उसंत नाही … ही  एक तक्रार होऊन बसली आहे !


संसार समुद्र म्हणजे …  पोहोता येत नसलं तरी उडी मारावी लागते , पोहोता येत असलं तर प्रवास काही खूप सोप्पा नसतो . किनाऱ्या वर  घरं बनवावे … सावलीत झोपाळ्यावर … पडून रहावं …निवांत आयुष्य जगावं ! … पण  त्याच किनाऱ्यावरची रेत … काही काळाने टोचू लागते … जबाबदारी सारखी चिकटून बसते … मग मात्र संसाराच्या समुद्रात उडी मारावीच लागते … मग कधी कधी मनोरंजनासाठी सिरिअल्स पहाव्यात … आपल्या लहानपणी च्या त्या समुद्र किनारी पुन्हा येऊन बसाव … पण घटकाभरच … कष्ट करायचे  म्हणजे घाम आणि मासे खायचे म्हणल्यावर मासोळी चा वास सहन करावाच लगणार … त्या पासून लांब जाऊन  जमणार नाही !



आयुष्य एक समुद्र आहे … आपण एक जहाज  … एक किनारा आपली  सुरवात आहे  … दुसरा किनारा आपला अंत आहे  … सुर्य मात्र सिरिअल आहे …  येत असतो जात असतो … आपण असलो तरी तो असणार … आपण नसलो तरी तो असणार … दुसर्या कडे इतका पहिल्याने स्वताकडे दुर्लक्ष होणारच न  ?

11 comments:

  1. अप्रतिम... दुर्ग्या...एकच नंबर भावा

    ReplyDelete
  2. Durgya... well written 😊👍

    Highly impressed by the conclusion 👌

    ReplyDelete
  3. Durgya... well written 😊👍

    Highly impressed by the conclusion 👌

    ReplyDelete
  4. durgya mast re....aawadal mala....

    ReplyDelete
  5. Professional writing ahe tuzi Durgesh. Carry on.

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...