Monday, 30 May 2016

Advertisement 1

 Advertisement 1


 Freedom Writer's mood - Relaxed and Naughty !


" आलोच दोन मिनटात " हा माझ्या मित्रांचा गुण , टी . व्ही . वरील जाहिरातींनी देखील घेतला आहे , सरकारी कचेरीत आपलाच क्रमांक आला की कर्मचाऱ्यांची मधली सुट्टी होण … अश्या वेळी जे तुम्हाला वाटत तेच मला जाहिरात लागला की  वाटतं  … 

आताश्या पूर्वी सारख्या जाहिराती राहिल्या नाही …" हेमा रेखा जया और सुषमा  …. सबकी पसंद … " होय 'निरमा' ! किंवा " पेहेले इस्तमाल करे फिर विस्वास करे " ह्या जाहिराती आधी फक्त सकाळ च्या वेळी आणि संध्याकाळी  दिवे लागणीच्या आधी लागायच्या कारण त्या नंतर  गृहिणी खरेदी साठी बाहेर पडायच्या पण  ऐकायला , बघायला , बोलायला , सांगायला किती प्रांजळ होत्या त्या जाहिराती  . आणि आता मात्र जेवणाचं ताट संपवण्याच्या विचारात असतानाच समोर … तोंडात दातांमध्ये झालेल्या आळ्या साफ करणारं दंतमंजन , दोन मांड्यान  मध्ये  खाज खुजली नष्ट करणारे क्रीम , अपचन झालेली छाती च धौतीयोग  आणि बऱ्याच जाहिराती चुकीच्या वेळी मला दिसतात .
मी लहान होतो तेव्हा चा एक प्रसंग सांगतो … माझ्या घरच्यांना सांगू नका !
kingfisher आणि  Tuborg  हे सोडा असलेल्या बाटल्या आहेत अस जाहिरात बघुन वाटायचं आणि मित्रांनी सांगितल  …पण  वेगळ्याच काहीतरी असलेल्या ह्या बाटल्या आहेत  हे मला … एकदा पोट दुखत असताना … औषधे च्या दुकानात … अश्या बाबतीत दुकानदाराने जमेल तितकी माझी चेष्टा करून झाल्यावर कळालं . तेव्हापासून  मी मित्रान वर आणि जाहिरातीन वर विश्वास ठेवायचा टाळतो !
 " आलोच आत्ता " , " १०० रुपये दे तुला २०० करून देतो " "माझा काहीच अभ्यास झालेला नाही " आणि  " ती तुझ्या कडेच पाहत होती " ह्या गोष्टी  म्हणजे रात्री ११ नंतर ढेरी कमी करणाऱ्या यंत्रा  च्या जाहिराती सारख्या असतात … ज्यात आपण कधी कधी भर दिवसा उघड्या डोळ्याने फसतो !
अजून एक खंत म्हणजे … चार चौघात दिसू नये त्या जाहिराती … घरातल्या सगळ्या पिढ्या समोर असतानाच सुरु होणे  … ते म्हणजे कस माहितीये  ?   प्रवासात … आपण स्वताच्या गाडी मध्ये बसून आपल्या समोरच्या प्रत्येक  गाडी वर च सगळ मोठ्याने वाचून काढणे … आणि मागून S T चा लाल डब्बा येणे ! अनुभव कधी बोलू नये हे शिकवतो … पण एखादा लहान आगाऊ कार्टा नाही नाही ते प्रश्न  "काय जब जब ? " आणि "काय  तब तब ?" असा विचारून सतावून सोडतो !



बास  आज  एवढच !
 To be continued ...

1 comment:

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...