प्रेम आणि परीक्षा म्हणजे … जाळ अन धुर संगटच …
Freedom Writer's मूड - सैराट झालं जी …
परीक्षा माऊ पावलांनी जवळ आली की तोंडा समोर कधीच न उघडलेलं पुस्तक धराव लागतं … त्याचा नवीन असल्याचा सुगंध मोहून टाकतो … बघणार्यांना वाटत आपण अभ्यास करतोय … पण आपण ते पुस्तक खरच वाचत असतो का ?
खरतर … आपल्या डोळ्या पासून पुस्तकाच्या अंतर मध्ये आपली वेगळीच दुनिया चालू असते . एकतर आपल्या आठवणींचा चित्रपट आपण एका अद्रुश्य पडद्यावर पाहत बसतो … नाहीतर … आपल्या येणाऱ्या भविष्यकाळा च दिग्दर्शन करत बसतो … गेलेला काय न येणारा काय … आयुष्य एक चित्रपटच होऊन बसतो … कारण आपणच त्यातले नायक असतो … आणि आपल्या आयुष्यात पण एखादी नायिका असतेच … असा काहीतरी वाहय्याद विचारात असताना … बाप खोलीत येतो … आणि त्याची नजर नायकाला , नालायक ठरवून जाते . मन पुन्हा पुस्तक वाचु लागतं
लहानपणी पर्यंत असते ती फक्त परीक्षा आणि तरुणपणी अजुन एक येते ती म्हणजे प्रेमाची परीक्षा . “ तु भीड रे ” हेच तीन जादुई शब्द मित्रांचे येतात … आणि आपला प्रेमाच्या परीक्षे चा फॉर्म आपोआप भरला जातो . प्रेमाच्या परीक्षेत असो किंवा पुस्तकाच्या परीक्षेत … अभ्यास लागतोच .आयुष्यात आपण नेहेमी चुकीच्या वेळी आणि चुकीच्याशी पाहिलं प्रेम केलेलं असतं (हेच कटु सत्य आहे ) आणि होते काय तर आपण आयुष्य भर प्रेमाची परीक्षाच देत बसतो . प्रेमिकेच्या गालावरून कधी आणि पुस्तकाच्या पानावरून कधी हाथ फिरवायचा हे आपल्या लक्ष्यात येयला हवे पण आपण तेव्हाच पुस्तका पासुन लांब जाऊ लागतो आणि आपलं बरच काही वाया जातं … अगदी कधी कधी आयुष्यही .
आताश्या झालय असं की प्रेम आणि परीक्षा दोन्हीही गोष्टी आयुष्यात … चौक चौकात आणि महिन्या महिन्याला समोर येतात , त्यामुळे कधी कधी लव लेटर च्या जागी HALL TICKET दिलं जातं ,लव लेटर चा मजकूर पेपरात लिहिला जातो !
काही काही नशीबवान होतात पास दोन्ही परीक्षेत … काहीही आई बाबा म्हणतील त्या विषयात हाथ आणि डोकं ( नंतर बरच काही ) घालतात , काही एकटेच आयुष्याची परीक्षा देत राहतात … पैसा नावाचं certificate गोळा करत , कारण त्यांनी प्रेम आणि पुस्तकांना परिस्तिति मुळे नाकारलेलं असतं … तर
काहींना पुस्तकं आणि प्रेम नाकारतात त्याच्या परिस्थिती मुळेच !
प्रेमाच्या परीक्षेत नुसतं propose करणं ही परीक्षा नसते … समोरच्याचं 'हो' मिळाल्यावर खरी परीक्षा सुरु होते कारण … प्रेम निभावाव लागतं आणि पुस्तकांच्या परीक्षेत नुसतं वाचून नाही आठवून पास व्हायच असत . असो !
काही कळे न झालाय !
अजून किती लव लेटर आणि किती HALL TICKET लागणार आहेत पास व्हायला !
तो पर्यंत आयुष्य म्हणजे … जाळ अन धुर संगटच …
अप्रतिम
ReplyDeleteसही एकदम
ReplyDeleteभाऊ आता खरच शब्द नाहीत उरले...
Bhau tuch
ReplyDeleteNice....
ReplyDeleteNice....
ReplyDeleteHa ha ha ..lai gwaad lihilay leka ... !!
ReplyDeletedurgesh laich zingaat lihila ahes....ekunach kay satya paristithi sangitlis!!!
ReplyDeleteNice
ReplyDelete