संधान Valley
नेहा चा कॉल आला की काही तरी थ्रिल नक्कीच असतं “ आज रात्री ११ वाजता सनधान valley ला आपण जातोय ” ती बोलली “ चालेल मे तयार राहतो ”असं सांगुन ते थ्रिल मी स्वीकारलं .
११ चे साडे अकरा झाले ... आणि १७ सीटर निघाली ... त्यातले ५ जण माझ्या ओळखीचे होते ... पण साडे बारा वाजेपर्यंत सगळे १७ लोकं ओळखीचे झाले ! त्यात १४ जण म्हणजे आम्ही संदान ला चाललो होतो ,२ जण आमचे मार्गदर्शक होते आणि एक वाहन चालक होता .
रोहित च रोह्या , अपूर्वा च अप्प्या , धनराज च धुव्वा सिंग ... अश्या प्रकारे सर्वांचं पुन्हा बारसं झालं ! रोहन लाड यांचा वाढदिवस साजरा करण्या मध्ये गाडी पुण्यातून कोणत्या दिशेने बाहेर पडली आणि कोणत्या दिशेने चालली आहे हे मला कळालं नाही ... !
गप्पा , गाणी ,गोष्टी च्या नादात पुण्यातून बरेच पुढे गेलो . रात्री चा प्रवास ... छान प्रवास . ‘बोटा’ नामक गाव ह्या ब्रह्मांडात आहे ... हे रात्री ३ ला चहा पेयला गाडी थांबवल्यावर कळालं .
तरुण थकतात पण स्वीकारत नाही ... दंगा करत करत पहाटे ५ ला मला झोप लागली आणि ६ ला जाग ही आली ... वाहनचालक मात्र गाडी सरावाने हाकत होता ...
साडे सहा च्या सुमारास उजाडलं ... सारे तेव्हा जागे झाले ... तेव्हा निसर्गा च्या बराच जवळ पोहचल्याचं जाणवलं . साम्रद गावात शिरलो तेव्हा देहधर्म आठवला पण मोकळ्या वावरत कोणाची पोटं काही मोकळी झाली नाहीत ... त्यातून एकच हापसा असलेल्या गावात पाणी कमी वापरावं हे धोरण आम्ही अवलंबलं !
भारतीयांना त्यात तरुणांना त्यात माझ्या सोबत च्या वानर सेनेला कायम भूक लागते ... आणि ते काहीही , कधीही खाऊ शकतात ह्यात मला शंका नव्हती . गावातल्या एका घरातुन पोह्यांचा अस्वाद घेऊन ... ठीक सकाळी ७:३० ला आम्ही चालायला सुरुवात केली ... आम्हाला ‘ हारनेस ’ नामक सामग्री दिल्याने भरलेलं पोट आणि पाठी वर बरच ओझं होतं ...
पठारावरून ... चारी बाजुने डोंगरांनी वेढलो होतो ... ज्यांच्या सहयोगाने म्हणजेच Explorers च्या दोन तरुण मार्गदर्शकांनी त्यांची नावं सांगितली ... अलंग , मलंग आणि कुलंग ही त्या खट्याळ भावांची नावं होती ...
सपाट जमिनीवरून कधी उताराला लागलो आणि मुंग्यांप्रमाणे भिंत आणि कपाटाच्या मधल्या फटीतुन म्हणजेच दरीत शिरलो हे कळालंच नाही .
दगड दगड म्हणता ... निसर्गाने त्यांवर सुद्धा बरीच कलाकारी केलेली होती ... आकार , विकार , चेहेरे , नक्षी ची किमया त्यांवर करून वर्षोनुवर्षे तिथेच ठेवून कोणी कलाकार विसरून गेलेला असावा असं वाटलं ! संधान दरीत फक्त १२ ला दुपारी उन्हं येत ... त्याला येईला वेळ होता ... उतरून उतरून ही दमछाक झाली पण बराच अंतर पार झालेलं . थांबा असायचा की मागचे पुढे , पुढचे मागे ... अदलाबदल व्हायचे . छायाचित्रकार अजब असतात ... कधी कोणता फोटो काढतील म्हणुन मी कायम हसरा चेहेरा ठेवलेला ...
पड- झडी चा शुभारंभ केला तो अप्पू ने आणि शेवट पर्यंत टिकवून ही ठेवला . तसं अपूर्वा दोन होत्या पण एक स्वतः रडायची आणि दुसरी सर्वांना रडवायची . स्वतः रडणारी खरंच खूप रडत रडत पुढे चालत होती ... पण जिद्द अश्रूंच्या वाटे कमी होऊ दिली नाही ...
मागे वळून पाहिल्यावर बराच पुढे आलोय कळायचं ... आणि किती पुढे जायचंय माहीत नव्हतं ... रस्ता मात्र खडतर ...
अगदी आयुष्या प्रमाणे !
अगदी आयुष्या प्रमाणे !
दोन्ही बाजुने डोंगर आणि समोर दरी आली आणि त्याच बरोबर आयुष्यात पहिल्यांदा रॅपलिंग करायचा योग्य आला ... ते पण तब्बल ३ वेळा ... ७० फूट २० फूट आणि ३० फूट ह्या उंची वरून दोरी ,दगड आणि दम च्या सहाय्याने खाली येणं
मजेदार होतं ... तेव्हा मात्र माझी खरोखर फाटली ( पँट ) ...
मजेदार होतं ... तेव्हा मात्र माझी खरोखर फाटली ( पँट ) ...
पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसताना , पाऊल खुणा नसताना , अंगातून निथळणारा घामा चा थेंब दगडावर पडताच पाऊलखुन म्हणून थोड्या वेळा साठी अस्तित्वात येयचा . पायथ्याला दुपारचं जेवण पोटात ढकलून , जरा आढवे झालो , आणि बरोबर ३ वाजता सुरुवात केली ती उभे डोंगर सर करायला .
निसर्ग पाहुन ह्यात हरवून जावं वाटत होतं ... पण तो आनंद घेयला डोळे ... मार्गावरून हटवणं अवघड होतं ... अगदी आयुष्यातल्या ध्येया सारखं !
उभी चढाई , लहान आणि चकवा देणारी पाऊल वाट ... त्यात काही हरवत होते , थकत होते , घसरत होते , पुढच्यांना आवाज देऊन थांबवत होते ... आमची वानरसेना एकत्र नव्हती मात्र एकाच डोंगरावर होती ! जवळचं पाणी संपलं आणि नैसर्गिक स्रोतातून पहिल्यांदा पाणी पेयची वेळ आली ... तेव्हा पाण्याचं महत्व कळालं !
पठारावर एक एक जण पोहोचत होता आणि आता नको नको सा झालेला डोंगर आता सर्वांना नजरे आड जाताना हवा हवासा वाटत होता ! अलंग मलंग आणि कुलंग खट्याळपणे माझ्या कडे बघून हसत होते असं वाटलं जणू ते बसल्या जागेवरून आमची मज्जा , भीती , फजिती पाहत होते .
५:३० वाजता पुन्हा त्याच घरात चहा पयलो ... हाथ पाय तोंड धुतले तेही त्याच हापश्यावर ... त्याला चिकटलेली गर्दी मधमाश्यां प्रमाणे भासत होती ... त्याला गावकरी , आम्ही आणि अजून नवीन पर्यटक चिकटलेली आणि हापसा एक सुंदर मध देणारं फुल जाणवत होतं .
‘हारनेस’ परत करुन ... गाडीत बसलो ... गाडी निघाली ... वारा लागला आणि ... घाम , थकवा उडून गेला , मग आम्ही एकमेकांची उडवायला लागलो ...
७:३० च्या सुमारास भंडारदारा चा फलक दिसला ... आणि आमच्या पैके अनेकांच्या आयां चा फॉन येऊ लागला आणि माझ्या आई चा देखील आला आणि मला तिने झाप झाप झापलं ... कारण मी सगळं तिला हे नसांगता केलेलं ... पण नेहा कडे मोबाईल देताच तिने मला वाचवला ... त्या नंतर अनेक मित्रांचे कॉल आले ... मग गाडीत माझा चर्चेचा विषय झाला !
चंदनपूर ला थांबून जेवलो ... गाडीत त्यानंतर सगळे पोट भरलेलं असतानाही डुलक्या ‘खाऊ’लागले ! पण पुणे येऊ पर्यंत अश्विनी , पहिली अपूर्वा , पूजा , ह्रीश्या आणि मी भेसूर गाणी गाऊन सर्वांना हैराण करण्यात आणि वाहनचालकाला जागं ठेवण्यात दंग होतो !
पुण्यात पावसाने स्वागत केलं आणि पूर्ण प्रवासभर इतरां पेक्षा जरा शांत असलेली पूजा पुणे येण्या आधी खूप अस्वस्थ झाली . गाडीच्या काचेतून तिलाच कोण जाणे कुठून ... तिला भेटायला आलेला ओंकार दिसला आणि गाडी थांबताच तिने त्याच्या कडे धाव घेतली आणि सांगायला नको , पण मध्य रात्री ,भर पावसात , मित्राची गाडी घेऊन आलेला ओंकार हा पूजा चा बॉयफ्रेंड आहे . त्यांना दोघांना एकमेकांना आलिंघण देताना पाहिलं तेव्हा आमच्यावर पाऊस होता पण ते एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजत होते ... ते पाहून प्रेम म्हणजे काय असतं ... ते कुठेतरी परत ह्या प्रवासाच्या शेवटच्या वळणावर ह्या दोघं कडे बघून कळत होतं . सर्वात शेवटी आलेल्या ओंकार ने खऱ्या अर्था ने प्रवासाचा एका फिल्म प्रमाणे Happy Ending केला .
“ काही राहिलं नाही ना ? ” असा उतरताना विचारताच बरच काही राहून गेलेलं असतं ... अगदी आयुष्यातल्या स्वप्नांप्रमाणे , तरी एकाचा मोबाइल राहिलाच कुठेतरी ... पण तो नवीन कोणता घेऊ ? ह्या विचारात हरवलेला !
मी सर्वांना मिस करणार हे नक्की होतं तरी स्वतःच्याच रूमवर पावसाच्या घामाने भिजत पोहोचलो ... संधान valley आठवत ... झोपेचे डोंगर चढू लागलो !
चांगलाच आनुभव मिळाला !
Fakta tulach nahi mala pan call ale...😂😂😂 पण उत्तम प्रवासवर्नण👌👌👌👌👍👍
ReplyDeleteतुझं प्रवासवर्णन वाचुन मी नकळत संधान valley ला जाउन आलो ...जिवंत वर्णन !
ReplyDeleteBhari
ReplyDeleteBhari
ReplyDeleteअप्रतिम प्रवासवर्णन अन् सांधन दरी म्हणजे निसर्गाची अप्रतिम कलाकुसर
ReplyDelete