नगरच्या नागरिकांचं नगर - पुणे , पुणे नगर इतक्या वेळा प्रवास झाला असेल , कि त्याचं आत्तापर्यंतच अंतर मोजलं गेलं तर पृथ्वीला २ वेळा तरी प्रदक्षिणा झालीच असेल .
श्रीरामपूर हुन आलेल्या हिरव्या ‘ जलद ’ गाड्या नगरच्या ताराकपूर बस स्टँड ला येताच गाडीत शिरण्यासाठी होणाऱ्या गार्दी ला पाहून , काहीतरी खाता पडलेल्या गोड पदार्थाला लांबून लांबून येऊन चिकटलेल्या मुंग्या कश्या पुढे नेतात तसच काहीसं बस फलाटा लागताना वाटतं .
एकच जागा रिकामी राहिलेली असताना गाडी निघालीच होती ती परत थांबली आणि डाव्या बाजूला खिडकी जवळ बसलेल्या तेजश्री शेजारी एक पैलवान येऊन बसला .
जुन्या स्टॅन्ड ला फक्त उतरला तो चालक आणि चढला तो हि तोच चालक . आधीच बाकडं लहान त्यात रस्त्यातले खड्डे आणि वळणं वळणं त्यामुळे अंगचोरून बसावं लागलं ते पैलवाना ला , कारण तिकीट आधीच काढल्यामुळे , तेजश्री ला जागा राहण्याचं कारण नव्हतं , ती हेडफोन घालून गाणी ऐकतच झोपी गेलेली .
कुठे मोकळी जागा आहे का ? पाहून झाल्यावर मुलीच्या बाजूला बहुदा पहिल्यांदाच बसलेला कावरा झालेला पैलवान “ मॅडम उठता का ? ” तिला म्हणालाच ! दचकून उठून , तिने स्वतःला राग न येऊंदेता “ गाडी का थांबलीआहे ? जलद गाड्या थांबत नाहीत ना ?” सुज्ञ प्रवाश्या सुचतील ते प्रश्न तिने देखील केले , पण निष्फळ .
“ एक काम कराल का ? ” पैलवान हिम्मत जोडून म्हणाला
“ मी जागा बदलणार नाही आधीच सांगते , आणि मला का उठवलत तुम्ही ? बाकीचे प्रवासी कुठे गेलेत ? ” तेजश्री ने तोंडाची तोफ केली आणि शब्दांचे वार केले !
“ फक्त माझी बॅग इथे राहूद्या द्या , मी खाली जाऊन आलो ” नम्र पणे तो म्हणाला .
“ एवढ्याच साठी तुम्ही मला उठवलं ? ” त्रासिक चेहेरा करून तिने परत प्रश्न केला !
“ अजून कोणाकडे देणार ? सगळे उतरले बाकी झोपलेले ”
“ तंबाखु खाऊन येऊ नका मला उलटी येते ! ”असं म्हणुन केव्हाच मांडीवर पडलेले हेडफोन तिने परत कानात घातले “ मी तंबाखू खात नाही ” हे देखील तिने ऐकायलं नाही .
ढाब्यावरून गाडी सुटणारच आणि परत पैलवान बस मध्ये चढू पर्यंत बस थांबवावी लागली .
“ थँक यु ” पैलवान पिशवी सरकवून जागेवर बस ताना म्हणाला तरी तेजश्री च लक्ष नव्हतच .
भूक माणसाला क्रूर ही बनवते आणि कोमळ सुद्धा , पैलवानाच्या हातातल्या वेफर्स च्या पाकिटात तेजश्री ने कधी हक्क मिळवला हे त्याला देखील कळालच नाही . दोघांचं तोंड आता खात ही होतं आणि बोलत ही होतं .
“ पुण्याला काय विशेष मग आज ? ” पैलवानाने तिला विचारलं .
“ बहिणीला दुसरी मुलगी झालीये तिला भेटायला ... तुमचं ? ”
“ अरें वाह अभिनंदन ... माझं काय कारण एवढा चांगला नाही ... माझ्या बहीणीच पोर वारलं ” टायर च रस्त्याशी होणारं घर्षण , इंजिन चा आवाज , वेगाने वारं कापलं जाताना बनणारी शीळ , खिडक्यांचा खडखडाट ... एवढीच काय ती शांतते विरुद्ध होणार संघर्षाचा कोलाहल .
पाणी पेयचं म्हणून बॅग काढाताना तेजश्री कडून पैलवानाला धक्का लागला आणि परत पाण्याच्या बाटलीचं आदानप्रदान होताच परत संवाद सुरु झाला तेव्हा शिरूर मागे पडून बाराच वेळ झाला होता , प्रवासाचा उत्तरार्ध सुरु झालेला .
“ तुम्हाला वाटेल मी पिशवी घेऊन शकलो असतो , पण त्यात देवाची फोटो आहेत . ती सगळी कडे नाही नेता येत ” स्वतःशीच बोलल्या प्रमाणे तो तिला म्हणाला ”
“ कधी झालं निधन ? ”
“ आज पहाटे ! ... जन्म कधी झाला बाळाचा ? ”
“ आज पहाटे ! ”
“ एकच ठिकाण आहे आपलं पोहोचायचं पण प्रवास आणि कारण किती विरुद्ध आहे ”
“ मी तुमची मनस्थिती समजू शकते , मी डॉक्टर आहे ... तुम्ही काय करता ? ”
“ सावका... ” आणि अचानक वाघोलीच्या अडकलेली गाडी चा फायदा घेऊन एकाच दुचाकीवर तीन
तेजश्री च्या शेजारच्या खिडकीत येऊन काही काही बोलु लागले आणि क्षणाचाही विलंब न करता पैलवानाने तिला बाजूला येईला सांगून तिची जागा घेतली आणि ते तिघे कुठच्या कुठे फरार झाले ...
“ हराम खोर साले ” ... असे काहीसा पुटपुटत असताना तेजश्री ने “ थँक यु ” बोलल्याचं त्याला ऐकू हि गेलं नाही !
पुण्यात शिरताना दोघांना कॉल येऊ लागले , दोघांच्यातला संवाद परस्पर विरोधी होता .
पुण्याला उतरताच वारुळात पाणी शिरल्यावर जश्या मुंग्या बाहेर पडतात तशेच प्रवासी बस मधून बाहेर पडतात . प्रत्येकाचा वेगळा प्रवास सुरु होतो ... कोणाला कोणीतरी घेयला येत ... किणी कोणी स्वतःच वाटेला लागतं ... कोणी आपल्या वाटेला येऊ काळजी घेतं ... प्रवासी मग सहप्रवासी मग अनोळखी , हे रस्त्यापुरतं नाही , जन्मा जन्मा च आहे !
जिथे तेजश्री जगात आलेला नवं नाजूक बाळ खांद्यावर घेऊन खुश असेल तिथे पैलवान कुठेतरी अश्याच कोणत्यातरी हॉस्पिटल मधून आपल्या खांद्यावर एक शव वाहून नेत असेल ... आणी नेमक्या ह्याच आवस्थेत दोघांनी एकमेकांना पाहिलं !
ज्या गोष्टी खरंच सोडून देयच्या असतात त्या Awkward .
Waah bhau ... mast vaatl kharach vaachun ... happy reading at all😀
ReplyDeleteHmmm... Chaan !!
ReplyDeleteNehmicha pravas aaj veglyach valnala dakhavun gela...
ReplyDeleteThank you !
Delete