Sunday, 4 September 2016

Teacher's

Freedom Writer's Mood - Jo bhi likhunga sach likhunga ... nahi to bhi likhunga ! 

स्वतातला विद्यार्थी मेलाय असं समजुन .नावाच्या आणि आडनावाच्या मागे ‘ Sir ’ लावून घेणारे ,बरेच भेटले पण अजून काही ... नावाच्याही आधी ‘Sir’ उपाधी मिळालेले कोणी आयुष्यात भेटले नसल्याची खंत मला अजून आहे . 

शाळेत असताना पासुन मला काय काय वाटतं हे आज मी निर्भीड पणे बोलणार आहे . 
शाळेचा वर्ग ही फळाची पेटी  , त्यात शिकणारी मुलं म्हणजे बटाटी आणि त्यांना शिकवणारा शिक्षक म्हणजे आंबा , असली शाळा म्हणजे भाजीने भरलेलं पोतं  होतं  म्हणून सांगतो , आणि “ पेटीतला एक सडका आंबा पूर्ण फळाच्या पेटीला नासून टाकतो ” ह्या म्हणीच्या कलमातील रस कळाला तो शाळाच्या सुटल्या नंतर (उशीरच झाला).

ना शाळा ना शिक्षक ना शिक्षण काहीच बदलू शकलो नाही . शाळेपर्यंत खेळाचे तास हेरून त्यात अभ्यासक्रम पूर्ण करून , खुशाल सुट्टीवर जाणारे शिक्षक , अचानक कॉलेजात नाहीशेच झाले . पण कॉलेजात आल्यावर मात्र खेळ खेळले जातात ते निराळेच , ते कुठून शिकावे लागत नाही . काखा वर करणारे, पण खाली पडलेला खडु न उचलणारे शिक्षक पहील्यांदा दिसले ते इथेच .

‘ शिक्षक हा पेशा मी आवडीने निवडलेला आहे ' असं कोणाकडून मी ऐकलं नाही आणि भक्कम पगारा मुळे ‘ नाईलाज म्हणून करतोय  ’ असं देखील बोलताना ऐकलं नाहीये . विद्यार्थी आणि शिक्षकांत मैत्रीचा पूल निर्माण होण्याच्या आधीच ह्या अश्या शिक्षण पद्धती मुळे तो केव्हाच भीतीच्या दरारा वाढल्याने दरीत(खुन्नस मध्ये)  वाहुन गेला ...  . 

‘आता मी हुशार असतो तर का शिकलो असतो तुमच्याकडून ?’ असा प्रश्न मी शाळा ,कॉलेज ,इतर कुठेही मला शिक्षकांनी उत्तर देयला उभं केलं  की विचारायचो ...पण स्वतःलाच  ते हि मनातच ! 

कोणा शिक्षकाचं नाव घ्यावं आणि कौतुक करावं असं मला अजून पर्यंत कोणी भेटलच नाही असं मी दुर्दैवाने पण प्रामाणिक राहून सांगतो . तसं मी सुद्धा कोणाच्या तोंडातून माझ्यासाठी चांगले शब्द निघतील अशी भाभडी अपेक्शा ठेवणार नाही कारण तसा मी विदयार्थी देखील नाही ! दोघांना प्रगतीची गरज आहे ! 
तर मग म्हणलं खोटं खोटं गोड बोलण्यापेक्षा , कडू असलं तरी खरच लिहुयात !
तुमचं काय चुकलं नाही बघा मास्तरांनो , तुम्ही बसलात चिकटुन तया पुस्तकास फाटक्या , त्याच यत्तेत शिकवत पोरांना ,विद्यार्थीच राहुन पोरं मिळवतात दुसऱ्या देशाची कोरी कोरी नोट ... हातावर छडी मारल्यावर तात्पुरत्या वळा सारखे उमटता तुम्ही मास्तर , नवा तास चालु झाला कि फळ्यावरच्या अक्षरा सारखे पुसले जातात तुम्ही , कधी तुम्ही आईने केलेल्या लहानपणीच्या संस्कारान सारखे आठवणीत राहा ना ! 

मास्तरांनी नाही पण पुस्तकांनी , चुकांनी ,मैत्रीने आणि अनुभवाने बरच शिकवलं . त्यातून खूप काही नाही बारका आत्ता पर्यंत एवढच कळलं तुम्हाला  किंवा कोणाला आठवून चिडण्या पेक्षा ... 
गोष्टी वेळेवर आठवल्या की फक्त परीक्षा पास होता येतात , पण गोष्टी वेळेवर विसरता आल्या की आयुष्यात पास होता येतं !

आयुष्याचीच शाळा झालीये  , खूप दिवसां नंतर ‘फ्रीडम रायटर’ नावाला शोभेल अस लिहिलंय ! 


P.S. - Happy TEACHER's Day 
P.P.S. - Dont get Drunk and Drive 

5 comments:

  1. Good one....Bitter truth! But I am lil lucky I have got some great teachers.

    ReplyDelete
  2. Hmm.. yes bitter truth.. maybe u experienced it.. keep writing bas freedom writer..

    ReplyDelete
  3. तुमच म्हणन हा तुमचा अनुभव झाला, प्रत्येकाचा तो वेगवेगळा असु शकतो..
    पण तुमचा अनुभव सध्याच्या जगात जास्त आढळतो.
    सध्या नोकरी मिळत नाही म्हणून लोक शिक्षक होतात, मी लहान होतो तेव्हा असे २-४ शिक्षक होते जे जीवतोडून शिकवायचे अन त्यांना हे कधी सांगायची गरज हि पडली नाही की मला आवड आहे म्हणून मी शिक्षक झालो..
    तर अशी गम्मत आहे सगळी !

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...