Friday, 14 April 2017

उन्हाळ्याच्या सुट्ट्या !

टीव्ही च्या रिमोटने चॅनेल बदलून बदलून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा दुखू लागलेला , त्याच बरोबर डाव्या हाताचा अंगठा मोबाईलच्या स्क्रीन वर फिरून  फिरून सुजायला आला होता . आधुनिक यंत्रा कडे पाहता पाहता डोळे लाल झालेले , मान आखडलेली , AC मुळे शरीर स्थूल झालेलं .
      तिकडे  काल रात्री मद्यपी बापाने त्याला मारायला चप्पल फेकलेली तेव्हा डाव्या पायाचा चपलेचा अंगठा तुटलेला आणि आत्ता  चालता चालता कोणतीतरी  गोष्ट मधेच कडमडलेली कि  ठेच लागून  उजव्या पायाच्या चपलेचा देखील अंगठा तुटला आणि पुढील प्रवास चपला हातात घेऊन चालू झाला ... दुपारच्या वेळी बहुतेक अश्या तुटक्या फाटक्या नशिबाला टाके मारून देणारे जेवून खाऊन वामकुक्षी घेत असावेत असा त्याच्या डोक्यात विचार आला .
                      शेवटी दोन्ही  हाथ मोकळे करून स्वतःच शरीर टीव्ही समोरून उचलून वाजणाऱ्या LANDLINE कडे त्याने पेललं  . अजून तरी कामवाली बाई आली नाहीये , असे त्याने आईला फॉन वर तिच्या प्रश्नाला उत्तरदेताना सांगितले . call संपताच तो परत अवाढव्य वाढलेल्या शरीराला घेऊन टीव्ही समोर बसला  , आई पण ना मोबाईलवर कॉल का करत नाही काय माहित , असा विचार करू लागला .
     जरा वैतागूनच त्याने तिसऱ्या इमारतीत त्या घराची चौकशी केली , नवीन पोर , ते पण दिसायलाच मुळी  चोरटं , त्यामुळे वॉचमॅन काका काय त्याला सहजा सहजी आत सोडत नव्हते . घराचा नम्बर , इमारतीचं नाव कि मालकांचा मजला  , नेमका काय ऐकताना घोटाळा झाला त्याला काही कळेना . तरी तो ते घर शोधत राहिला  .
                        अरे यार काय कट कट आहे ! आधी फोन आता दार आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात का नाही ... आता परत उठावं लागणार श्या ! तरी त्याला एक आशा वाटली की कामवाल्या मावशी आल्या असतील , म्हणजेच आता भांडी मला तरी घासाव्या नाही लागणार . पण seethrough मधून पाहताच  भ्रमनिरस .
    आतून दार उघडलं गेलं ... त्याने हातातल्या चपला खाली टाकून ... बाई आहेत का ? असा घामाने थिजलेल्या बारीक  तोंडाने विचारला ... हाल्फ चड्डी , अर्धा शर्ट चड्डीत अर्धा बाहेर , डोक्यावरच्या केसांचा आणि चेहेऱ्याचा सारखाच रंग . हा पोरगा कामवाल्याबाईचाच असणार ... त्याच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देताच , त्याची देखील निराशाच झाली . त्याच्या आईने त्याला सांगितलेला निरोप त्याने दार उघडणाऱ्या स्वच्छ कपडे , केसांना भांग पाडलेल्या , जरा फुगीर शरीराच्या पण सरळ स्वभावाच्या  मुलाला सांगितला  आणि तो परत चपला हातात घेऊन निघाला .
                          कामवाल्या मावशींना बरं नाही म्हणून त्या येणार नाही कळताच त्याने दार बंद केले , रिमोट ने टीव्ही बंद केला , ac बंद केला , हाताच्या सुजलेल्या अंगठ्यान कडे पाहत स्वयंपाक घरात गेला .  बिचारा किती उन्हात  बिन चपलेचा आलेला ... का तर फक्त त्याच्या आईचा निरोप देयचा म्हणून तो परत फिरला नाही , त्यांच्याकडे मोबाइल आहे पण वीज नसल्या मुले  त्याचा काय उपयोग  , आईची तारांबळ व्हायला नाकी म्हणून तो बिचारा इतका उन्हाचा आला  असा त्याच्या डोक्यात कामवाल्या मावशींच्या  मुलाचा विचार चालूच होता , तेवढ्यात त्याने स्वता फटाफट भांडी घासून टाकली .  परत landline वाजला आईचाच फोन होता ... हो कामवाल्या मावशी येऊन गेल्या त्याने तिच्या प्रश्नाला उत्तर दिले ... आईने देखील आनंदाने फोन ठेवला  .
                         
 अश्या असतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या ! 

1 comment:

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...