Saturday, 29 April 2017

बलात्कार

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरच्यांनी शनिवार आणि रविवार चा  कार्यक्रम घोषित केला आणि आखलेल्या कार्यक्रमा  नुसार ते बरोबर शनिवारी ३:३० च्या सुमारास गावाला गेले आणि ५-६ च्या सुमारास त्याचे मित्र त्याच्या घरी ,जसे एक एक करून कावळे येऊन पिंड समोर  जमतात आणि कावकाव सुरु होऊन  चोच मारू लागतात , तसे ते आले .

एका सामान्य घरातले लोक जेव्हा गावाला जातात आणि घरीच थांबणाऱ्या व्यक्तीला जेव्हा  घर खायला उठतं आणि मग तो पेयला बसतो . तो आणि त्याचे ३ मित्र , अशे सगळे जमल्यावर ... एका ठरावाने एक खंबा चौघात असा थाटावं मंजूर झालेला तरी एक पावशेर राहूदे आपत्कालीन म्हणून त्यात भर पडली . मग काय होऊ लागलेल्या उशिराचा विचार करून साग्र  संगीत कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु झाली . पेले , पात्र , पत्रावळ्या ... मग काजू , चिवडा , दाणे ... आणि ३ वेळा ३० मिली मदिरा प्राशन झालेली असतानाच , बेल वाजली .

अश्या वेळी खरंतर दार उघडायलाच नको होतंस , पण आता काय करणार आलिया भोगासी , अरे पण तिचं  काय करावं  ? ... तिचे आई बाबा जरा वेडे आहेत का ? ए बाबा ती घरी तर काही सांगणार नाही ना ? तिने कुठे काही पाहिलंय पण ?
हॉल मधल्या टीव्ही चा रिमोट , एसी चा रिमोट , स्पीकर चा रिमोट जो आत्तापर्यंत मदिरा भक्तांकडे होता आता तिच्या कडे आहे . तिला खायला , पेयला पाणी दिलेलं , तिला आत मध्ये येऊ नको म्हणून ताकीद देखील दिली आहे , पण !

बेल वाजल्यावर दार उघडायला उशीर झाला त्यामाधे हॉल मधील  मेहेफील बेडरूम मध्ये स्थलांतरित झाली . तिच्या आई बाबांनी किंवा तिने सुद्धा , त्याला सोडून इतरांना आणि इतर काही पाहिलं नव्हतं .आई  वडील  कोणाच्या तरी मौतीला चालेले , घरात तो सोडून घरातले कोणीच नाही हे त्याने त्या शेजारच्यां पासून लपवले , किंभौना तोंडच उघडायला नको म्हणून तो शांत राहिला .

बेडरूम चा फुगा होऊन एसीच्या वातानकुलीत मद्याच्या भपक्याने भरला होता आणि तेवढ्यात ती धाडकन दार उघडून ती आत आली आणि तो फुगा फुटला . बाटल्या लपवल्या गेल्या , पण नजर ? जेव्हा जीभ बंद ठेवली जाते तेव्हा नजरा बोलक्या होतात . तिला एक्दम एवढे  दारू पिलेली पोरं  पाहून भीती वाटली आणि ती रडू लागली , पण ती जागची हालली नाही ,  जणु तीला माहीत होतं पुढं काय होणार आहे .

९-९:३० च्या सुमारास तिचे आई बाबा आले , तिला घेऊन गेले . त्या सर्वांने तिला बजावलं कि घरी आई ला किंवा कोणालाही ह्याबाबत काही सांगू नको . काही लागलं तर मला सांग किंवा कोणी काही बोललं तर मला सांग माझ्याकडे ये , बाबांनी काही विचारलं तर काही बोलु नकोस , जे काही झालाय ते विसरून जा , असा त्याने तिला चांगलंच आपलंसं केलेलं . तिचं वय पण कोवळं , ती पण भुलली त्याच्या शब्दाला .

तिला त्याच्या चांगलाच लळा लागला . घरी तिचे पाय टिकत नव्हते आता . बाबांच्या सावलीला ती थांबत नव्हती .
त्या रात्री पासून तिच्या स्वभावात विलक्षण बदल झालेला . अचानक तिचं आपल्या घरी त्याच्याकडे येणं वाढलय हे त्याच्या आईला पण जाणवलं . पण ते त्या दोघां मध्ये जे काही होतं ते वर्णन करण्या पलीकडचं होतं  , तरी सोक्ष मोक्ष लावायला तर हवाच होता .

अश्या बाबतीत संवाद साधून गोष्टी मिटतील अशी भाबडी माया मनातून काढूनच टाकलेली बरी . त्याने तिच्यावर बलात्कार केला असणार ह्या तिच्या आईच्या त्याच्यावरील फिर्यादी वरून  , त्याला पोलिसा कडून जाब विचारला तेव्हा मात्र ती मुलगी , धाय धाय रडून सांगू लागली कि दादाने मला काहीच केलं नव्हतं तो खूप चांगला आहे , तो वाचला , त्याचे चारित्र्य स्वच्छ राहिलं ते त्याच्या पुरताच , पण पैसे देऊन सुटलाय असं शेपूट त्याच्या मागे आयुष्यभर लागलं , त्याचे मित्र त्याची बाजू घेयला आले नाहीत आणि थोडा थोडा धीर गोळा करून २२ वर्षांनी ती  एका कॉऊंसेललेर समोर प्रथमच खरं बोलली कि माझे बाबाच दारूच्या नशेत माझे लैगिंक शोषण , माझ्यावर बलात्कार करत असे , माझा छळ करत असे ... त्यामुळे मला त्या दादाचा आधार वाटायचा अजूनही वाटतो ,अंगावरचे व्रण बाबाने दिलेले ते दादाच्या विरुद्ध उमटले ...  आई स्वता समोर असायची माझ्यावर अन्याय होताना ,हेच सगळं मी त्या वेळी दादाला बोललेले आणि त्या नंतर तुमच्या समोर  , पण हे सगळं कोणाला खरं वाटेल का ?



सच को तो साबूत.                      
का चुल्हा चाहिये,                    
झूट तो बिना आंच
भी पक जाता है !

-----------------------------------------------

   शराब बुरी शायद  होगी
पर इन्सान से तो कम ही होगी

No comments:

Post a Comment

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...