Friday, 19 May 2017

कचरा

कचरा 



अन्नपदार्थचे पोषक तत्व कमी झाले असले , तरीही ते अजून चवदार आहेत आणि  त्याच बरोबर बातमीदारही बनत अाहेत . कारण  रस्त्यावरच्या गरमागरम पदार्थला वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून देणं वाढलं आहे . त्यामुळे शाई त्या अन्नावर पसरणे , उमटने आणि आपण त्याला तसच खाण्याआधी एकवेळ त्या कागदा कडे बघून नंतर मात्र  दुर्लक्षच करणे वाढत आहे . ती वर्तमानपत्रांची शाई जेव्हा लोकांच्या अन्नात शिरते तेव्हा लोकशाही फिकी होते असं ऐकलंय 


बटाटे वडा , वडापाव , भजी , सामोसा हे सर्वात चवदार आणि बातमीदार पदार्थ आहेत . परवा कुठूनसा वडापाव आणला तर तो खायला झाला थोडा उशीर , तर चक्क साहेबांच्या चेहेराचा फोटो वड्यावर उमटलेला आणि त्यांचं पोट पावावर ...  जसं  कि ते आता हा गरिबांचा वडापाव खाऊन संपवतीलच, त्या आधीच मी तो बातमीदार वडा आणि पाव कोणाशीच न वाटून फस्त केला  ... पण नंतर बरोबर १०वाजुन १०मिनिटांनी , मी ते एकट्यातच खाल्ल्या मुळे पोटाचे बारा वाजले  ... अश्या तह्रेने बऱ्याच राजकारण्यांनी गरीबाच्या अन्नावर तशी हजेरी लावलीच आहे पण आता त्यावर शिक्का देखिल बसला आहे ,  कारण खाण्याचा बाबतीत ते कुठेही असतात .


एकदा साखरेच्या गाठींवर मायावती उमटल्या होत्या . फुला मध्ये लपून शिवसेनेला हूल देणारे राजठाकरे कामळा सारखे उमलले  होते . कधी कधी निसटून जाणारे दरोडेखोर , चोर , अपराधी , भ्रष्टमंत्री , बडे अभिनेते , बडे व्यवसायिक ... वडा संपल्या नतंर त्यातून निथळलेल्या तेलाने थपथपल्या वर्तमानपत्राच्या  कागदला फाडून पसार होत असताना दिसतात  . 
कधी कधी जर तुमचं नशीब असेल तर माधुरी , ऐश्वर्या , कतरिना चे गाल, ओठ ,डोळे तुम्हाला काहोतारी खाताना , उघडताना , पुसताना  दिसु शकतात . 

हा एकदा तर जवळच्या खाणावळीतून चपात्या आणलेल्या , त्याही मिळाल्या वर्तमानपत्रात लपेटलेल्या ... इतक्या बातमीदार कि काय सांगू ... २८ मार्च २०१६ चा हवामान बद्दलचा पूर्ण लेख मी वाचला . तसं मी कधी उत्तप्पा , डोसा , इडली आणलं तरच आमच्या घरी त्या जिलब्या जिलब्या सारखे दिसणारे अक्षरांच्या भाषेचा पेपर येतात ... तरी  त्या उडप्यांची कमाल वाटते ... स्वतःच्या भाषे विषयी इतका अभिमान कि रद्दी देखील वापरणार तर त्यांच्याच भाषेतील वर्तमान पत्राची  . 
इंग्लिश वर्तमान पत्राचे कागदं शक्यतो  पाव , पॅटिस , केक , पेस्ट्री वैगरे  बेकरीचे पदार्थ आणले  तर घरी येतात . 
भेळ जर बाहेरून आणली असेल तर , तर तो विक्रेता शक्यतो मॅगझिन्स चे कागदात ती देतो , पण घरीच जर मुरमुरे , फरसाण , कांदा , टॉमॅटो टाकून भेळभत्ता खायला सुरु करायचा असेल तर ते खायला बसण्या आधी मात्र रद्दी मिळवावी लागते . मग काय ? राजकारणी , अभिनेते , खेळाडू , उपोषण  करते , पीडित वैगरे सगळ्यांना आपल्या कडे आ वासुन बघत बसण्या वाचून गत्यंतर नसतो  . 

पण कधी कधी ... समोर मस्त पाऊस , एका हातात चहा , दुसऱ्यात सिगरेट आणि तेव्हड्यात एका ‘कागदात’
गरम तेलात नाहून आलेली कांदा भजी ची ‘ प्लेट ’ , जरा कमी गरम झाल्यावर एक भज उचालावा तेच खाली ... कुपोषणा वर लिहिलेला लेख  डोळ्यांना दिसतो . 
मूडच जातो राव . 

असाच एकदा घरच्यां सोबत दुकानातून नुकतेच आणलेले फुटाणे खात होतो ... टीव्ही समोर असताना ते कधी संपले काही कळलंच नाही ... पण त्या कागदावरच काँडोम ची जाहिरात मी घरच्यां पासून लपवु शकलो नव्हतो हे  विसरू शकलो नाहीये .

बऱ्याचदा कपातून चहा बशीत ओतावा . कपाच्या बुडाला लागलेला चहा कुठे चिकटून राहायला  नको म्हणून शेजारी असेल त्या वर्तमानपत्रावर ठेवावा आणि हमखास , नेमका , डोळेझाकुन , बेशक  तो मोदीजींच्या चेहेऱ्या भोवतीच स्तिरावणार आणि कप उचलताच ओलसर वर्तुळाकार  त्या फोटो भवती झालेला दिसणार  . 
चहा ने एकेकाळच्या चहा वाल्याचा केलेला सत्कारच  जणु  !

तरी हागणदारी मुक्त गाव च्या जाहिराती , बातमी , घोषणेवरच आई पोराला शी करायला  बसवते . 
स्वच्छ भारत अभियानच्याच कागदाने टेबल , काच , बाक पुसून तो कागद कुठेही टाकला जातो . 
हे सगळं फक्त सगळेच बघतात . पण काय कागदावर लिहून वर्तमानपत्रात छापतात नाहीतर फेसबुक च  स्टेटस करतात .   हेच चक्र गोल गोल फिरत राहतं . 

एकदा असच जुन्या वर्तमानपत्राच्या कागदावर काहीतरी खाताना २६/११ ची बातमी दिसलेली , काय सांगू बराच वेळ काही सुचलं नव्हतं . चव देखील त्या पदार्थाची त्या बातमी मुळे जरा रक्ताळली होती , काही चेहेरे डोळ्या समोर येत होते , काही अश्रू त्या गोष्टीवर श्रद्धांजली वाहत होते ... आणि तो आचारी विचारत होता ... खूप गरम आहे ना ? भाजली का जीभ ? ... पण पाणी पाजण्या पर्यंतची माणुसकी त्याकडे नव्हती . 

खरंच म्हणायचं तर 
आपण कचऱ्यात जगतोय . कचरा करतोय . कचरा खातोय . कचरा ऐकतोय . कचरा बोलतोय . 
 त्या सगळ्यांसाठी  ज्यांना अक्कल नसताना पदं आणि गरज नसताना ताकद मिळाल्याने खाज सुटलीये . राजकारण अश्या लोकां साठी खाजकारण आणि भ्रष्ट लोकशाहीची कीड देशात आपल्याच लोकां मुळे  दहशतीचा कचरा वाढवत आहे . 
आपले विचारांचा कचरा होऊदेऊ नका , आधी स्वतः स्वच्छ होऊन ,  ह्या कचऱ्याला संपवण्याचा विचार करूया , देश प्रगत करूया . 

2 comments:

  1. Bhau sarcasm at its best....
    Devnagri shuddh lekhan jara...

    Content awesome...

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...