Saturday, 3 June 2017

House of farmers

रात्री झोप न येण्या चे कारण तशे अनेक असतात . दुपारी झालेली झोप , रात्री पोटभरलेलं नसणं , गरम होणं , बाहेर कुत्र्याचं जोर जोरात भूंकणं आणि आत अपल्या शेजारी झोपलेला माणसाचं  घोरतच सूटण .पण बाप चातका प्रमाणे पावसाची वाट पाहत होता कारण बेशक तो कर्जबाजारी शेतकरी होता पण त्याचा मूलगा मात्र एका किल्ली प्रमाणे त्याच्या कुलपाची वाट पाहत होता . 

‘आला वाटतं ’ अस स्वताच स्वताच्या मनाला विचारुन मधे मधे बाप उठुन घराच्या बाहेर जाऊन दोन्ही हाथ पसरवुन पाऊस आला का बघायचा आणि ‘ आला वाटतं ' असा भास झाला म्हणुन मूलगा सरखा त्याचा मोबाइल कडे पहायचा . पण दोघांच्या नशीबी कोरडच वाहत होती . 

दोघांना हवी असलेली गोष्ट कोणती हे जर तुम्हाला आजुनही कळाली नसेल तर तुमचं काही खरं नाही . शेतकरी बापाला पाऊस आणि त्याच्या  मुलाला ‘ती’ . दोघं अापल्या आपल्या विचारांच्या शेतात रमलेले तरी परिस्थितीच्या कुंपनात अडकलेले आनी परिस्थिति मात्र आसुड घेऊन उभी . 

आई च मात्र त्या विचारांना वेगळच खत-पाणी घालणं सुरु होतं  . “ मांगल्या रगु ने इकलि जागा , घबाड पैका आला त्यांना , आता तुमच्या सारखं हाथ पसरवुन एकतर सावकारा कडे पैसा नाहीतर देवा कडं वर मान करुन , हाथ पसरवुन ... आला का पाऊस , आला का पाऊस न्हाय बघत ते ... ” “ हा एक बाप आहे , मान कटायची पारी आली तरी वर ढग पहातोय आणि ह्यो पोरगा मूंडी तुटून खाली पडायची वेळ आली तरी त्या मोबाइल मधे चेहरा लपवुन बसलाय . जा की बुड हलव ४ पैसे कमव एवध शिकिवल नोकरी चा काही पत्ता नाही ! ”

असं घरातल्या कडक लक्ष्मी च आख्यान सूरु झालं की ह्या दोघां कडे देखिल उत्तरं तयार असायची . “ पाऊस उशिरा येतो म्हणुन जमीन विकायची हा कसला नियम ? सरकार कर्ज माफी , खत अनुदान , मुलाचं अत्ता पर्यन्तच शिक्षण चा खर्च सगळा ह्या जामिनिने पहिलं,  अमचे वाड वाडील पाहिले अशीच इकायची व्हय?  . बर जिमीन इकलि तर आज पैका उद्या पैका पण पर्वाचांग काय उरनार ? तू ,मी , ह्यो सुशिक्षित बेकार आन अपलि भूक , बये ऐक माझं काय उपेग नाय जीमीं इकुन ! ” 


“ माय तू उगा चिंता करते प्हाय . नोकरी करू म्हंतो पण अपला ना वशिला ना लाच देयला पैका . शेतात राबु म्हंतो तर तुमचि इबरत घान पडते . दोन तीन ठिकानी अर्ज केला हाय . पाऊस येऊ पर्यन्त वाट पहनार नहितर सुशिक्षित शेतकरी म्हणुन राबनार !  मला पण जिमेदारी हाय , तुला आता सुन अनायची नाहीं का ? ” 

बापा च आणि पोरा च अस ऐकलं की त्यांच बरोबर वाटायचं . पण अज्ञानी बाई ती चार चौगीत गौर्या थापताना काही ऐकलं की तेच घरी ओकायची . रोज भांडण . कारण नसताना भांडण . 

“ जेवलास का ? ” 
“ हो ”
“ आज परत भंडलात का ? ” 
“ हो जेवन झाल्यावर पान , सुपारी ऐवजी आम्ही आसे एकमेकां सोबत भांडतो ” 
“ जाऊदे रे होईल सगळ नीट आय लव यू ” 
“ किती ? ”
“ खुप ” 
“ काल लवकर झोपलीस का ? ”
“ हो ”
“ का बर ? ”
“ तस मी तुला सांगणरच होते . काल एक मूलगा अलेला बघायला मला . त्याने मला पसंद केलय . ” 
“ अरे बापरे ! आणि तू मला हे अत्ता सांगत अहेस ? मग आता ? ”
“ माझ्या आई बाबांना पण आवडलाय तो ” 
“ म्हंजे तुला पण आवडलाय वाटत ” 
“ नाही तसं काही नाहीये ”

“ ठिके ! पण तुला जर आवडलाय असेल तर तू पण त्याला हो म्हणु शकतेस ” 
“ काहीही काय ? ” 
“ तूझ्या पासुन काही लपुन नाहीये ! ” 
“ हो माहीती आहे . तुझ्या कडे नोकरी नाहिये , तुला वेळ हवा आहे . पहिला पाऊस पडे पर्यन्त तु नोकरी शोधणार नाही तर शेतित काम करणार . माझ्या कडे तरी कुठे काय आहे तु सोडुन ? ” 
“ आय लव यु ! ” 
“ आय लव यु टु रे ” 

असा संवाद प्रेम करणार्यां मधे चालूच अस्तो ! पण जेव्हा भविष्यात अस्थिरता जानवु लागते तेव्हा असे संवाद कमी होतात आणि प्रेमकरी दूरावतात . 

शेतकार्य करणार्या सोबत सध्याच्या जमान्यात कोण लग्नकार्य करनार ? तो तर म्हणतोय मी काही शेत विकनार नाही . शेती साठी पाऊस पडे ना , पैश्या साठी नोकरी मिळे ना ! करणार काय आणि खाणार काय ? त्या मूली ने तिला पहायला अलेल्या मुलाला तीने होकार कळवला . 

पाऊस पडण्याचे दिवस पण आकाशाला आजुन काही पाजर फुटला नवता , शेत जमीनी कोरड्या आणि त्यामूळे खिसा मोकळा . सावकारा कडे गहान असलेली जमीन विकुन टाकावी म्हणुन गावातले लोक रेटा करू लागले . 

पण तेवढ्यात पहिला पाऊस चालु झाला . पोरगा प्रेमभंग विसरून शेत कसायला लगला , बाप पोराला शेतात पाहुन खुश झाला पण तितकाच ओशाळला सुद्धा कारण घर आसों की गावात त्याच्या कड़ुन सर्वांना अपेक्षा होत्या पण ह्या शेती ने ह्या शेतकार्यनां स्वप्न पूर्ण करू देयचे नाही असा काही श्राप च दिला आहे . 

बाप , पोरगा , आई सगळे वर वर खुश होते पण आत ?  बापाला हवा होता तो पाऊस मिळाला पण सगळ्या गोष्टी तिथेच सम्पत नाहीत . पाऊस आता वेळेवर थांबायला देखिल हवा , नंतर च्या गोष्टी जुळुन येयला हव्या ! नंतर १-२ महिन्याने पीक येणार मग काय भाव मिळनार तो घेयचा ! अन्न दाता काय “  सुखम भाव ” तु ? 

पोरगा तसा शांत शांत वाटत होता पण प्रेमात पडुन झाल्यावर सगळं विसरायला अवघड जातं कारण प्रेमा नंतर  स्मरण शक्ति चांगली होते पण लक्ष लागत नसल्या मुळे बापाच्या बोलणी त्याला  खाव्या  लागत . गावात अधिच विज नसते , आता पाऊस अाल्यावर तर विचारुच नये ! छताला लागलेला पंखा दिवस दिवस विज नसल्याने फिरत नसे . बाप आता दारू पीत नाही म्हणुन बर आहे .पण आइची कटकट काही कमी होत नाही . संपून जावं वाटत एकदाच ! 

आई आता कडक लक्ष्मी राहिली नसुन कडकड लक्ष्मी झाली होती . तीच्या प्रमाणे गावातलं लोक काय चुकिच सांगतयत ?  काय करायची ज़मीन ?  तेरव्यात दुष्काळ ! सरकार तर काय धावुन येणार नाही , तरी बर गुरं ढोरं विकली म्हणुन पाऊस येऊपर्यंत पोट भरू शकलो . पण पुढे ? पोरगा बिनकामाचा , बाप पेटाड तरी बरय सध्या कमी झालिए ! मी विकते आहे ते सोनं आणि जाऊ गाव सोडुन  म्हणलं तर ते पण नाही ! 

पण ह्या वेळी बळीराजा शेतकार्या च्या बाजुने होता . पाऊस बोरोबर थांबला . नाहितर असला ग़रीब शेतकरी पावसाच्या मुतात पण वाहुन जातो पण ह्या वेळी  शेती ला आकाशाने पाणी पाजुन तृप्त केलं ! सगळं नीट चालेलं ! घरात पैसा येऊच लगला होता पण ह्या वेळी ना निसर्ग ना सरकार पण शेतकरीच संपावर गेला होता . 

शेतकरी लाखमोलाचा घाम गाळुन पिकवलेल खाद्य रसत्यावर फेकून देत होता . तर कुठे हाच माल कोणी चांदी च्या भावाने विकुन खिसा भरत  होता . कोणाचा तोटा तर कोणाचा फायदा म्हणुन तर जग चालतय पण एक कृषिप्रधान देश मागे पडत होता . 

आता विज होती पण पंखा लागत नवता , पोरा चा ‘ तीच्या ’ सोबत चा फोटो भिंतीला टांगला होता  . बाप सकाळीच ‘लावुन’ बसायचा  . पोरगा शेतावर जाऊ लागला . आई आता खरोखर लक्ष्मी सारखी वावरत होती ... घराच्या बाहेरच पडत नवती .पळुन अालेली सुनबाई आहे त्यात खुश होती  .

आयुष्यभर गरीब म्हणुन जगवणार्या शेती ने त्याला रातोंरात शेठ बनवला होता ! 

एकच संप बरच काही संपवतो ! 

गरीबी सुद्धा ! 



6 comments:

  1. Wahh������ kharach ahe...samp barach kahi samapvto..... Changla suddha ani vaiet suddha !

    ReplyDelete
  2. दुर्गेश सुंदर,
    याला नेमकं काय म्हणायच उपरोधात्मक की स्तुती ?

    ReplyDelete
  3. अप्रतिम दुर्गेश भाऊ

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...