मन आहे न मन भोवऱ्या सारखे असते, ते जिथे जिथे जाते फक्त ते ते मी कागदावर उतरवतो.
'मला वाचायलाच वेळ मिळत नाही रे (pause)... तुझ्या कडे कोणते पुस्तक असतील तर दे न वाचायला'.
हे वाक्य मी अनेकदा ऐकले आहे पण ते जाणवले मात्र 'मला गाडी चालवायची सवय नाहीये पण तुझी गाडी मी नीट चालवेल दे' असे आहे.
दुसर्याच्या गोष्टी, वस्तू आणि आयुष्य वापरायचे म्हणल्यावर ज्या लोकांमध्ये विलक्षण आत्मविश्वास येतो ते लोक स्वताच्या बाबतीत मात्र बघू काहीतरी, करू काहीतरी, आण काहीतरी, खाऊ काहीतरी हे असे उदास सूर लावतात. 'काहीतरी' हा एक असा शब्द आहे, तो न वस्तू आहे, ना गोष्ट, ना ध्येय, ना कोणते स्पष्ट उत्तर तरीही किती बोलका आहे. नेहेमीच हा 'काहीतरी' भविष्याच्या अंधारात बिनधास्त पणे चक्कर मारून येतो. असा आत्मविश्वास सध्याच्या शहाण्या लोकां मध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, हा गुण वेगळ्य (वेड्या) लोकांचाच आहे.
असे वेगळे लोक, चहा मध्ये चहा पत्ती टाकायला विसरतील पण सोशल मिडीयावर स्टोरी टाकायला ते विसरणार नाही, तुमच्या परिघात असे वेगळे लोक तुम्हाला सापडतीलच, बहुदा आत्ता तुमच्या चेहेर्या समोर अश्यांचा चेहरा देखील आला असेल. असे मंडळी कायम त्यांच्याच दुनियेत रमलेले असतात, अश्यांना पाहून हसू आल्या शिवाय राहवत नाही. मान खाली घालून असलेले अचानक statue of liberty सारखा एक हाथ वर करतात आणि सेल्फी काढतात, पुढार्यांनी चौका चौकात फ्लेक्स लावावे तसे प्रत्येक सोसिअल मिडीयावर स्टोर्या लावतात. याच मुळे आताश्या चहा पिणे या गोष्टीला काही वेगळेच महात्म्य मिळत आहे आणि ते अजून वाढतच चालले आहे. त्यामुळे लवकरच घरा मध्ये चहा आता चाळणीतुन गाळला जाऊन गहू मात्र गाळणीतून चाळले जाण्याची शक्यता आहे आणि तंदूर चहा वैगरे गोष्टीमुळे मातीच्या चुली कडे कल जाऊ शकतो, हरकत नसावी फक्त काही दिवसांनी तंदुरी बटर रोटी सारखे तंदुरी बटर चहा वैगरे सारखं काही चालू होऊ नये.
त्याच बरोबर माणसाचा अतिशय होतकरू दोस्त म्हणजे कुत्रा, याचा वेगळाच थाट दिसून येत आहे. घरातल्या पाळीव कुत्र्याला होणारा जावई आवडला नाही म्हणून लग्न मोडल्याचे ऐकिवात आहे. एखाद्या समोर अखंड बोलत राहणे आणि समोरच्याने काय बोललेच तर त्या कडे दुर्लक्ष करणे या महिलांच्या स्वभावा मुळे नवरोबांची जागा या बाबतीत कुत्रा या पाळीव प्राण्याने घेतली आहे असे म्हणतात. बाकी कुत्रा हा घरातल्या माणसा पेक्षा किती हुशार आहे हे दाखवण्याची धडपड मला खूप हसवते. कारण इथे त्या कुत्र्याच्या मालकाने स्वताला बावळट ठरवून कुत्र्याच्या शेपटीच्या हालचालीवर नाचायचे ठरविले असते. अश्या वेळी एक अदृश्य पट्टा कुत्र्यानेच मालकाच्या गळ्यात घातलाय की काय असा भास मला होतो. बाकी कंपनी मध्ये गळ्यात id लटकावून राब राब राबणारे तो भास खरा ठरवतात हा भाग वेगळा.
माणूस कितीही विद्वान असो तरी त्याने कन्डक्टर, ड्रायवर आणि रिक्षावाला याच्या नादी लागु नये. प्रवाश्याने केलेल्या प्रत्येक प्रश्नांना किमान शब्दात उत्तर देऊन त्यात थोडी अतिरेक माहिती मिसळून अक्कल शिकवणे यात त्यांची जीभ कोणीच धरू शकत नाही. कोणत्याही गोष्टीला इथे मीटर आहे पण पान वाल्याकडे अशी थेरं नाही, पानाला चुना लावावा तसा तो प्रत्येक गोष्टीला पाल्हाळ लावत लावत चघळून चोथा केल्या शिवाय थुंकत नाही. इथे शालीनता, स्वच्छता असा कसलाच मुलैजा नाही. तरी पानाला आग लावून पान खाऊ घालणारे पान वाले या सोशल मिडीयाच्या कोपर्या कोपर्या वर नजरेत येतात.
आधी हाहा म्हणता असं बोलल जात, आता मिमी म्हणता मिम तयार होऊ लागले. मिम देखील दुग्धजण्य पदार्था सारखे असतात एका दिवसा पेक्षा ज्यास्ती टिकू शकतील की नाही हे सांगता येत नाही. ताप, सर्दी, खोकला याही पेक्षा हे मिम हे वायरल होत आहेत. राहुल गांधी तर या बाबतीत viral किंग म्हणायला हवा. खरतर मी मिम बनवतो या पेक्षा तुला मिम बनवायला वेळ आहे या वरच लोक खूप हसतात. पण काही सांगता येत नाही माणूस खूप प्रगतीशील प्राणी आहे तो बहुदा हसवण्यासाठी एखादे app देखील बनवेल, ज्याने आपल्याला हवे तेव्हा स्वतालाच गुदगुल्या केल्या सारखे जाणवू लागेल. मी तर म्हणतो एक वेळ अशी येईल की यंत्र मानव जन्माला येईल आणि मनुष्य निर्माण होईल.
आपण काहीतरी नियोजन करावे आणि नशिबाने त्यावर ख्याक करून हसावे, हा stand up कॉमेडी चा कार्यक्रम सगळेच करत असतात, काहींना पैसे देऊन,हसून दाद देणारे प्रेक्षक मिळतात तर काहींना आपली आपली म्हणत होतो असेच लोक सोडून जातात.आजकाल inspiring video पाहिल्यावर स्वतावर हसू येते आणि कॉमेडी शो पाहिल्यावर आपल्याला स्पुरण चढते. आपले दुख हे कायम दुसर्या साठी हसण्याचे कारण असू शकते हे तुम्हाला मला सर्वांना माहित होते पण काहींनी त्याचे भांडवल करून पैसे कमावले तर कुठे चुकले? प्रत्येक गोष्टी मध्ये देव असतो की नाही मला माहित नाही पण नक्कीच आपल्याला हसवण्याची एखादी स्टोरी त्यात नक्कीच लपलेली असते.
फेसबुक मुळे प्रत्येक जण स्वताला आपण कोणीतरी आहे असा समजू लागला, सारखे काहीना काही अपलोड करू लागला. हे व्यसन एवढे वाढले की फेसबुक देखील आता सिगरेट सारखी हवा हवासा वाटू लागला आहे. टपरीवर जाऊन सिगरेट ओढणे आणि सारखे सारखे फेसबुक उघडने हे व्यसनच आहे, असे अनेकांना वाटते. बहुदा सध्याची परिस्थिती बघता २०५० साला पर्यंत अप्लोडकर, स्टोरीकर, सेल्फिक्र, फिल्टरनेकर वैगेर नवीन आडनाव उदयास येऊ शकतात. पण याला काही लोक अपवाद आहेत.अर्ध्या चहाच्या कपात कॉफी ओतून दिल्यासारखे ही मंडळी काम करत असतात. कलेक्टरच होणार होतो पण या देश्याच्या सुख सोयी नादुरुस्त असल्या मुळे इथे काम करतोय असे अविर्भाव असलेले लोक, स्टेट बँक मध्ये कामाची टाळाटाळ करताना खुशाल सापडतात. हे म्हणजे instagram च्या पंचायतीचे जगप्रसिध्द सरपंचाला फेसबुकवर कोणीच ओळखत नाही अशी पंचायत झाली आहे.
आताश्या कळतच नाही चालले आहे ते कश्या'साठी' आहे आणि आपली दुनिया कोणती ही जी काटेरी पण हसवी की मलमली पण फसवी?
----------------------------------------------------------------------
६० पोस्ट पूर्ण.
सर्व वाचकांचे आभार.
'मला वाचायलाच वेळ मिळत नाही रे (pause)... तुझ्या कडे कोणते पुस्तक असतील तर दे न वाचायला'.
हे वाक्य मी अनेकदा ऐकले आहे पण ते जाणवले मात्र 'मला गाडी चालवायची सवय नाहीये पण तुझी गाडी मी नीट चालवेल दे' असे आहे.
दुसर्याच्या गोष्टी, वस्तू आणि आयुष्य वापरायचे म्हणल्यावर ज्या लोकांमध्ये विलक्षण आत्मविश्वास येतो ते लोक स्वताच्या बाबतीत मात्र बघू काहीतरी, करू काहीतरी, आण काहीतरी, खाऊ काहीतरी हे असे उदास सूर लावतात. 'काहीतरी' हा एक असा शब्द आहे, तो न वस्तू आहे, ना गोष्ट, ना ध्येय, ना कोणते स्पष्ट उत्तर तरीही किती बोलका आहे. नेहेमीच हा 'काहीतरी' भविष्याच्या अंधारात बिनधास्त पणे चक्कर मारून येतो. असा आत्मविश्वास सध्याच्या शहाण्या लोकां मध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, हा गुण वेगळ्य (वेड्या) लोकांचाच आहे.असे वेगळे लोक, चहा मध्ये चहा पत्ती टाकायला विसरतील पण सोशल मिडीयावर स्टोरी टाकायला ते विसरणार नाही, तुमच्या परिघात असे वेगळे लोक तुम्हाला सापडतीलच, बहुदा आत्ता तुमच्या चेहेर्या समोर अश्यांचा चेहरा देखील आला असेल. असे मंडळी कायम त्यांच्याच दुनियेत रमलेले असतात, अश्यांना पाहून हसू आल्या शिवाय राहवत नाही. मान खाली घालून असलेले अचानक statue of liberty सारखा एक हाथ वर करतात आणि सेल्फी काढतात, पुढार्यांनी चौका चौकात फ्लेक्स लावावे तसे प्रत्येक सोसिअल मिडीयावर स्टोर्या लावतात. याच मुळे आताश्या चहा पिणे या गोष्टीला काही वेगळेच महात्म्य मिळत आहे आणि ते अजून वाढतच चालले आहे. त्यामुळे लवकरच घरा मध्ये चहा आता चाळणीतुन गाळला जाऊन गहू मात्र गाळणीतून चाळले जाण्याची शक्यता आहे आणि तंदूर चहा वैगरे गोष्टीमुळे मातीच्या चुली कडे कल जाऊ शकतो, हरकत नसावी फक्त काही दिवसांनी तंदुरी बटर रोटी सारखे तंदुरी बटर चहा वैगरे सारखं काही चालू होऊ नये.
त्याच बरोबर माणसाचा अतिशय होतकरू दोस्त म्हणजे कुत्रा, याचा वेगळाच थाट दिसून येत आहे. घरातल्या पाळीव कुत्र्याला होणारा जावई आवडला नाही म्हणून लग्न मोडल्याचे ऐकिवात आहे. एखाद्या समोर अखंड बोलत राहणे आणि समोरच्याने काय बोललेच तर त्या कडे दुर्लक्ष करणे या महिलांच्या स्वभावा मुळे नवरोबांची जागा या बाबतीत कुत्रा या पाळीव प्राण्याने घेतली आहे असे म्हणतात. बाकी कुत्रा हा घरातल्या माणसा पेक्षा किती हुशार आहे हे दाखवण्याची धडपड मला खूप हसवते. कारण इथे त्या कुत्र्याच्या मालकाने स्वताला बावळट ठरवून कुत्र्याच्या शेपटीच्या हालचालीवर नाचायचे ठरविले असते. अश्या वेळी एक अदृश्य पट्टा कुत्र्यानेच मालकाच्या गळ्यात घातलाय की काय असा भास मला होतो. बाकी कंपनी मध्ये गळ्यात id लटकावून राब राब राबणारे तो भास खरा ठरवतात हा भाग वेगळा.
माणूस कितीही विद्वान असो तरी त्याने कन्डक्टर, ड्रायवर आणि रिक्षावाला याच्या नादी लागु नये. प्रवाश्याने केलेल्या प्रत्येक प्रश्नांना किमान शब्दात उत्तर देऊन त्यात थोडी अतिरेक माहिती मिसळून अक्कल शिकवणे यात त्यांची जीभ कोणीच धरू शकत नाही. कोणत्याही गोष्टीला इथे मीटर आहे पण पान वाल्याकडे अशी थेरं नाही, पानाला चुना लावावा तसा तो प्रत्येक गोष्टीला पाल्हाळ लावत लावत चघळून चोथा केल्या शिवाय थुंकत नाही. इथे शालीनता, स्वच्छता असा कसलाच मुलैजा नाही. तरी पानाला आग लावून पान खाऊ घालणारे पान वाले या सोशल मिडीयाच्या कोपर्या कोपर्या वर नजरेत येतात.
आधी हाहा म्हणता असं बोलल जात, आता मिमी म्हणता मिम तयार होऊ लागले. मिम देखील दुग्धजण्य पदार्था सारखे असतात एका दिवसा पेक्षा ज्यास्ती टिकू शकतील की नाही हे सांगता येत नाही. ताप, सर्दी, खोकला याही पेक्षा हे मिम हे वायरल होत आहेत. राहुल गांधी तर या बाबतीत viral किंग म्हणायला हवा. खरतर मी मिम बनवतो या पेक्षा तुला मिम बनवायला वेळ आहे या वरच लोक खूप हसतात. पण काही सांगता येत नाही माणूस खूप प्रगतीशील प्राणी आहे तो बहुदा हसवण्यासाठी एखादे app देखील बनवेल, ज्याने आपल्याला हवे तेव्हा स्वतालाच गुदगुल्या केल्या सारखे जाणवू लागेल. मी तर म्हणतो एक वेळ अशी येईल की यंत्र मानव जन्माला येईल आणि मनुष्य निर्माण होईल.
आपण काहीतरी नियोजन करावे आणि नशिबाने त्यावर ख्याक करून हसावे, हा stand up कॉमेडी चा कार्यक्रम सगळेच करत असतात, काहींना पैसे देऊन,हसून दाद देणारे प्रेक्षक मिळतात तर काहींना आपली आपली म्हणत होतो असेच लोक सोडून जातात.आजकाल inspiring video पाहिल्यावर स्वतावर हसू येते आणि कॉमेडी शो पाहिल्यावर आपल्याला स्पुरण चढते. आपले दुख हे कायम दुसर्या साठी हसण्याचे कारण असू शकते हे तुम्हाला मला सर्वांना माहित होते पण काहींनी त्याचे भांडवल करून पैसे कमावले तर कुठे चुकले? प्रत्येक गोष्टी मध्ये देव असतो की नाही मला माहित नाही पण नक्कीच आपल्याला हसवण्याची एखादी स्टोरी त्यात नक्कीच लपलेली असते.
फेसबुक मुळे प्रत्येक जण स्वताला आपण कोणीतरी आहे असा समजू लागला, सारखे काहीना काही अपलोड करू लागला. हे व्यसन एवढे वाढले की फेसबुक देखील आता सिगरेट सारखी हवा हवासा वाटू लागला आहे. टपरीवर जाऊन सिगरेट ओढणे आणि सारखे सारखे फेसबुक उघडने हे व्यसनच आहे, असे अनेकांना वाटते. बहुदा सध्याची परिस्थिती बघता २०५० साला पर्यंत अप्लोडकर, स्टोरीकर, सेल्फिक्र, फिल्टरनेकर वैगेर नवीन आडनाव उदयास येऊ शकतात. पण याला काही लोक अपवाद आहेत.अर्ध्या चहाच्या कपात कॉफी ओतून दिल्यासारखे ही मंडळी काम करत असतात. कलेक्टरच होणार होतो पण या देश्याच्या सुख सोयी नादुरुस्त असल्या मुळे इथे काम करतोय असे अविर्भाव असलेले लोक, स्टेट बँक मध्ये कामाची टाळाटाळ करताना खुशाल सापडतात. हे म्हणजे instagram च्या पंचायतीचे जगप्रसिध्द सरपंचाला फेसबुकवर कोणीच ओळखत नाही अशी पंचायत झाली आहे.
आताश्या कळतच नाही चालले आहे ते कश्या'साठी' आहे आणि आपली दुनिया कोणती ही जी काटेरी पण हसवी की मलमली पण फसवी?
----------------------------------------------------------------------
६० पोस्ट पूर्ण.
सर्व वाचकांचे आभार.
Thank you
ReplyDeleteMast
ReplyDeleteThank you
Delete