REMOTE
अनेकदा हाच रिमोट हिच्या अंगा खाली ऊब घेत
लपतो...आणि त्या तिच्या आळसावलेल्या शरीराला पाहून त्या आमच्या स्लिम स्क्रीनच्या
टीव्हीला कीव येते. रिमोट सापडला नाही या सबबी खाली ती टीव्ही चालूच ठेवते, बिचारा
4-5 तासाने स्वतःने बंद होतो.
ऑफिस मध्ये असू तेव्हा डब्या खाली पेपर लागतो,
हॉस्टेल
मध्ये तर जेवताना समोर मोबाईल किंवा लॅपटॉप लागतो आणि घरी जेवत असताना ताटात
काहीही असो पण समोर टीव्ही व एका हातात ‘रिमोट’ लागतोच...
यंत्र स्लिम झाली आणि माणसं lazy बॅग,
या परिवर्तनाला पुरेशी मदत केली ती एकाच गोष्टीने... माणूस आणि यंत्र या दोघां
मध्ये भरपूर बदल झाला पण मधल्या मध्ये ज्याच्यात फारसा बदल झाला नाही, तो
दुआ म्हणजे 'Remote'.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी माझ्या हिच्या सोबत
बाजारात गेलेलो. अर्थात ती माझा खिसा मोकळा करून माझ्या हातातल्या पिशव्या आणि
घरात पसारा वाढवत होती... तेव्हा तिला एका दुकानात ठेवलेला 'रिमोट' आवडला
... पण आधी एखादं यंत्र घेतल्यावर ते यंत्र एका जागी बसून वापरायला, रिमोट
मिळत. हे कळल्यावर, तिने काही दिवासांनी मला परत बाजारात नेऊन
रिमॊट असलेला उपकरण घेयलाच लावले. गणपती आणावा तसा रिमोट असलेला टीव्ही मिरवत
आणला.
‘तो अवाढव्य टीव्ही म्हणजे गणपती आणि रिमोट
म्हणजे उंदीर...’ असं ती आमच्या आणि जवळपासच्या मुलांना सांगायची. किती लांबून
रिमोट ऑपरेट होतो यावर तिची पि एच डी आहे. सेल लागल्यावर वेड्यासारखी साडी खरेदी
आणि गावाला जाताना रिमोट मध्ये सेल उलटेसुलटे करून बचत करणे... हा विचार माझ्या
डोक्याच्या Remote area मधला नाही.
अनेकदा हाच रिमोट हिच्या अंगा खाली ऊब घेत
लपतो...आणि त्या तिच्या आळसावलेल्या शरीराला पाहून त्या आमच्या स्लिम स्क्रीनच्या
टीव्हीला कीव येते. रिमोट सापडला नाही या सबबी खाली ती टीव्ही चालूच ठेवते, बिचारा
4-5 तासाने स्वतःने बंद होतो.
राजकारणात आणि आमच्या घरात पाहुणे आल्यावर
मुलाच्या लग्नाची फिल्म दाखवताना... कोणता रिमोट कधी आणि कसा वापरायचा हे फार अवघड
प्रकरण आहे. मग कधी ती फिल्म पाहताना, आवाजच मोठा... तर रुखवतातल्या गोष्टी
वर नजर ठेवणारा मामा, बुके पळवणारा आचारी... नारळ शबनम मध्ये टाकणारे
पेन्शनर काका, त्या स्क्रीन वर गारठतात, तर
कधी कधी... अनोळखी पाहुणे बचावाचा जेवताना वेग धरतात... सगळंच कॉमेडी होऊन बसतं.
आमच्या मुलांनी इतका मार नसेल खाल्ला तेवढा या
रिमोट ने खाल्ला असेल... याला हातावर आपटल्या शिवाय तो भानावरच येत नाही.
प्रत्येकाच्या घरात एका पिशवीत इतर अनेक पिशव्या भरून दाराच्या कडीला टांगल्या
जातात... तसेच आता एकाच रिमोट मध्ये सगळे रिमोट एकत्र करावे, कारण
त्यांचे सेलही आता स्वस्त राहिले नाहीयेत. हाताबाहेरच्या गोष्टी यंत्रणात
ठेवण्याच्या हेतूने तयार झालेल्या remote ने मात्र मोबाईल च स्वरूप घेऊन... सारं
जग मुठीत आणलं पण कधी कधी असं वाटत की आपणच आता हाताबाहेर जाऊन बसलो आहोत.
अचानक एकदा हा रिमोट खूप शोधल्यावर आमच्या
सोफाच्या फटीत सापडला... त्याची छाती दाबून त्याला जागं करण्याचा खूप प्रयत्न केला
पण तो गेला... काही दिवस मग बिना रिमोट चे गेले, पण नातवाने मोबाईलचा लळा लावला. सगळ्या
सिरीयल त्यावर दिसतात आणि मान देखील वर करावी लागत नाहीत. आता तर दिवस दिवस
वायफायच्या अदृश्य लक्षमन रेषेत ती आणि मी अजगरासारखे पडून असतो... मुठीत नाजूक जग
सांभाळत... मोबाईल काही रिमोट प्रमाणे धडधडकट नाही.
This is awesome.. . No one can think like that about the daily needed thing. . Nice one DURGESH
ReplyDeleteThank you
Deleteसध्याच्या युगात वेगवेगळ्या नवनवीन यंत्रणा येत आहेत यात रिमोट ची जागा भविष्यात कितपत टिकून राहील या बाबत मला शंका आहे 😄
ReplyDeleteThank you
Deleteसुंदर लिहिलंय
ReplyDeleteThank you
Deletekya bat nice
ReplyDeleteThank you
ReplyDelete