Friday, 15 April 2016

लेखक

लेखक 

लेखक म्हणजे … एक कोळी (स्पायडर) असतो . प्रत्येकाचा घरात तो असतो … कधी कधी सर्वां समोर बिंधास्त वावरतो नाहीतर कोणत्या तरी कोपऱ्यात लपुन-छपून … स्वताची कलाकारी निर्माण करत असतो . 

कोळ्याला आठ पाय असतात आणि लेखकाला  एकाच गोष्टी कडे किमान आठ वेग-वेगळ्या दृष्टी ने पहायचं कौशल्य असतं . कोळ्याच्या तोंडातून काही चिकट द्रव्य निघतात … तसच लेखाच्या लेखणीतून शाईच्या रुपाने… त्याचे विचार कागदाला चिकटतात , शब्दांची गुंतागुंत साधुन तोही आपलं जाळं निर्माण करतो . 

कधी सूर्याच्या तिरक्या प्रकाशात कोळ्याच जाळं पाहिलंय ? … खुपच मोहक मोत्यांनी विणल्या सारखं  दिसुन येतं ! तसच लेखकाला लिहिण्यासाठी  प्रकाश आणि प्रकाषक दोघं  लागतात , मग त्याच्या कलमाच्या निळ्या किंवा काळ्या शाई चा रंग सोनेरी अक्षरात बदलुन अजरामर होऊ शकतो . 

कोळी आणि लेखक (सगळेच नाही) … बऱ्याचदा … शांत , सय्यमि ,एकलकोंडे , किळसवाने … वाटत . पण एकदा का तुम्ही त्यांच्या जाळ्यात  अडकलात … की तुम्हाला त्यातुन सुटका नसते , त्यांच्या कडे सगळे खेचले जतात .

आईला जसा रोज काय भाजी बनवावी ? असा प्रश्न पडतो … तसाच आज काय लिहावं ? असा प्रश्न  लेखकाला ही पडतो… आई स्वता शरीराने बाजारात जाते, लेखक मात्र मनाने … कुठेही जाऊन विषयाचा बाजारहाट करून येतो, कधी कधी पाऊस पडत असतो… तेव्हा मनही आळशी बनत, तेव्हा भिंती वरचा कोळी देखील … लेखकाच्या विषयाची पोळी होऊन जातो !


15 comments:

  1. जसं तुझ्या शब्दांनी आम्हाला गुंतवून ठेवले आहे.... एकदम मस्त !!

    ReplyDelete
  2. In this article... #FW in and as #spiderman.

    असाच लिहित जा नवीन विचार नवा दृष्टिकोण दाखवत जा।

    N ha Njoy life!!!

    ReplyDelete
    Replies
    1. hahahha Thank you so much ... let me mention you too on FB ... for saying me #Spiderman ... lovely Thank you

      Delete
  3. In this article... #FW in and as #spiderman.

    असाच लिहित जा नवीन विचार नवा दृष्टिकोण दाखवत जा।

    N ha Njoy life!!!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...