लेखक
लेखक म्हणजे … एक कोळी (स्पायडर) असतो . प्रत्येकाचा घरात तो असतो … कधी कधी सर्वां समोर बिंधास्त वावरतो नाहीतर कोणत्या तरी कोपऱ्यात लपुन-छपून … स्वताची कलाकारी निर्माण करत असतो .
कोळ्याला आठ पाय असतात आणि लेखकाला एकाच गोष्टी कडे किमान आठ वेग-वेगळ्या दृष्टी ने पहायचं कौशल्य असतं . कोळ्याच्या तोंडातून काही चिकट द्रव्य निघतात … तसच लेखाच्या लेखणीतून शाईच्या रुपाने… त्याचे विचार कागदाला चिकटतात , शब्दांची गुंतागुंत साधुन तोही आपलं जाळं निर्माण करतो .
कधी सूर्याच्या तिरक्या प्रकाशात कोळ्याच जाळं पाहिलंय ? … खुपच मोहक मोत्यांनी विणल्या सारखं दिसुन येतं ! तसच लेखकाला लिहिण्यासाठी प्रकाश आणि प्रकाषक दोघं लागतात , मग त्याच्या कलमाच्या निळ्या किंवा काळ्या शाई चा रंग सोनेरी अक्षरात बदलुन अजरामर होऊ शकतो .
कोळी आणि लेखक (सगळेच नाही) … बऱ्याचदा … शांत , सय्यमि ,एकलकोंडे , किळसवाने … वाटत . पण एकदा का तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात … की तुम्हाला त्यातुन सुटका नसते , त्यांच्या कडे सगळे खेचले जतात .
आईला जसा रोज काय भाजी बनवावी ? असा प्रश्न पडतो … तसाच आज काय लिहावं ? असा प्रश्न लेखकाला ही पडतो… आई स्वता शरीराने बाजारात जाते, लेखक मात्र मनाने … कुठेही जाऊन विषयाचा बाजारहाट करून येतो, कधी कधी पाऊस पडत असतो… तेव्हा मनही आळशी बनत, तेव्हा भिंती वरचा कोळी देखील … लेखकाच्या विषयाची पोळी होऊन जातो !
Agdi .. masst :-)
ReplyDeleteThank you !
Deleteजसं तुझ्या शब्दांनी आम्हाला गुंतवून ठेवले आहे.... एकदम मस्त !!
ReplyDeleteThank you
DeleteIn this article... #FW in and as #spiderman.
ReplyDeleteअसाच लिहित जा नवीन विचार नवा दृष्टिकोण दाखवत जा।
N ha Njoy life!!!
hahahha Thank you so much ... let me mention you too on FB ... for saying me #Spiderman ... lovely Thank you
DeleteIn this article... #FW in and as #spiderman.
ReplyDeleteअसाच लिहित जा नवीन विचार नवा दृष्टिकोण दाखवत जा।
N ha Njoy life!!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteEk no....
ReplyDeleteThank you
DeleteLast few lines...kadkadak
ReplyDeleteThank you
DeleteMast..keep it up
ReplyDeleteThank you Amar
DeleteJabardast!!
ReplyDelete